Poonam Waghmare

Tragedy

3  

Poonam Waghmare

Tragedy

हे ही दिवस जातील

हे ही दिवस जातील

2 mins
331


जगन्नाथ आणि पार्वती रोजप्रमाणे वडपावच सगळं सामान तयार करुन, तोंडावर मास्क घालून आपल्या धंद्यावर जायला निघतात. त्यांची दोन लहान मुलं असतात. मुलगी ८ आणि मुलगा ५ वर्षाचा असतो. पार्वती मुलीला सांगते, "भाएर कोरोनाए, भाएर जायचं नाय हं बाळांनो, काळजी घे पूजा दोघांची", पूजा मान हलवून "हा आई, नाय जाणार", असं म्हणून पूजा दरवाजा लावून घेते. रोज प्रमाणे पार्वती गरमागरम वडे तळून ठेवते. पण नेहमी सारखे गिऱ्हाईक आज नव्हते. दिवसभरातून जेमतेम २०० रुपये जमा झाले होते. दोघेही एकमेकांकडे हताश होऊन बघतात आणि घरी जायला निघतात. वडापाव जास्त प्रमाणात विकले गेले नाही म्हणून आज घरी सगळ्यांना तेच खाऊन झोपावं लागतं. दुसऱ्या दिवशी पुन्हा दोघे वडापावची गाडी चालवायला निघतात पण आजतर कालपेक्षाही कमी कमाई झाली होती.


कोरोनामुळे हे सगळं होतंय ह्याची कल्पना दोघांना होतीच पण करणार काय मुलाबाळांसाठी कामधंदा करावाच लागणार म्हणून बिचारे रोज धंदा होत नसतानाही कामावर जात असत. त्यात आता सगळीकडे लोकडाऊनची चर्चा होऊ लागली. जगन्नाथ आणि पार्वती दोघे अजूनच चिंतीत होऊ लागतात. जेवण झाल्यानंतर दोघे बोलत असतात, जगन्नाथ बोलता बोलता अगदी रडकुंडीला येतो, "आपलं हातावरच पोट हाय, आसच चालू ऱ्हायल तर पोरा बाळांचं कसं व्हायचं? यकवेळ आपण पोटाला फडकं बांदून झोपू गं, पर ह्या पोरांना काय खायला घालायचं, माझं तर डोकं काम कर ना झालंय बग". पार्वती त्याला समजवण्याचा प्रयत्न करते, "नका काळजी करु, व्हईल सगळं नीट, वरच्यावाल्यानी जन्माला घातलंय ना मग तोच करील आपली बी काळजी", काळजीतच बोलते. तेवढ्यात पूजा भिंतीवर एक कागद चिकटवते त्यावर लिहिलेले असते "हे ही दिवस जातील", ते ती दोघांना वाचून दाखवते आणि सांगते, "आई - बाबा, हे रोज बघत जा". दोघांना मिठी मारते आणि सांगते, "घरात जे काही असेल ते आपण थोडं थोडं वाटून खाऊ, हे ही दिवस जातील आणि आपले पण चांगले दिवस येतील". दोघेही रडता रडता तिच्याकडे बघून थोडं हसू लागतात, पार्वती तिला जवळ घेऊन तिचा पापा घेते आणि जगन्नाथ मुलाला कवटाळून घेतो. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy