Nilesh Desai

Fantasy

3  

Nilesh Desai

Fantasy

"तो की ती" - भाग दूसरा

"तो की ती" - भाग दूसरा

3 mins
1.3K


नेहमीप्रमाणे नयन ऑफिसला आल्यावर आपल्या डेस्कवर जाऊन बसला. आपल्या कंप्युटरवर लाॅगीन करून आलेले काॅल्स अटेंड करू लागला. त्याच्या आवाजात नेहमीप्रमाणे सौम्यपणा होता. कस्टमर कितीही रागात असला तरी नयनच्या शांत आणि लाघवी स्वभावामुळे त्यांचा राग शांत व्हायचा. नयन आपल्या कामात मग्न होता कोपऱ्यातून एक नजर मात्र त्याच्यावर लक्ष ठेवून होती.


सीमा... नुकतीच आठ दिवसांपूर्वी जाॅईन झाली होती. अजून तिचा ट्रेनिंग पीरियड संपला न्हवता. पण सिनीयर्सचे लाईव्ह रेकाॅर्डींग अनुभवन्यासाठी एक तास तिला भेटायचा. सीमा कोड्यात पडलेल्या नजरेने नयन कडे सुरूवातीपासूनच पाहायची. आजही तिची नजर नयनवरून हटत न्हवती. आज तसा सीमाने मनाशी निर्धार केला होता की काही झाले तरी आज काहीनाकाही करायचेच. कदाचित् सीमाला नयनबद्दल कळून आले असावे. म्हणूनच त्याच्याबद्दल विचारावेसे असे तिला वाटत असावे. 


लंचब्रेक साठी दुपारी दोन वाजता नयन उठून कॅन्टीनमध्ये जाऊ लागला. त्याच्या मागावर असलेल्या सीमाने तो कॅन्टीनमध्ये पोहोचायच्या आतच त्याला गाठले. त्याचा हात पकडून सीमा बोलली, "तुला काही विचारू का ? हं म्हणजे पर्सनल आहे..." 


खरंतर नयन अशा अचानक झालेल्या प्रश्नाने बावचळला होता. आपले काही हीला कळले तर नाही ना, किंवा आज आपला मेकअप जास्त तर झाला नाही ना असा विचार करत नयन चेहरा उगाचच पूसू लागला. किंचचितशी लाज मनात यायला लागली. आता काय करायचे. या मुलीने कोणाला सांगितले तर काय होइल असे एक ना शंभर प्रश्न नयनसमोर आले. आणि त्याहूनही मोठा प्रश्न हा होता ही आहे तरी कोण?...

इतके दिवस कधी ऑफिसमध्ये दिसली नाही. तसेही आपण कधी कोणालाही नीटसे पाहीले आहे.


नयन काहीच बोलत नाही हे पाहून सीमानेच सुरूवात केली.. "हाय.. मी सीमा.. अजून ट्रेनी आहे. आठ दिवसांपूर्वीच जाॅईन झालीय इथे. तूला पाहीले तिथपासून तू मला आवडायला लागला आहेस. तूझा होकार यावा अशी अपेक्षा आहे....." 


धडाधड कानावर पडलेल्या या वाक्यांनी नयनला काय बोलू हे सूचत नव्हते. पण वेळ मारून नेण्यासाठी नयन म्हणाला.. "आपण ऑफीस सुटल्यानंतर भेटू या का? सीमा ने होकार देताच नयन जेवायला निघून गेला. नयन ने पाहीले होते की त्यांच जे काही संभाषण चालू होते त्यावर एक दोन कोपर्यातून बारीक लक्ष आणि कान लागून होते. 


संध्याकाळ होईपर्यंत सीमा बैचेन होत होती. त्याने लगेच का सांगितले नाही आपल्याला. संध्याकाळपर्यंत वाट पाहायला का लावली. त्याला नक्की काय सांगायचं असेल, तो नकार तर नाही ना देणार. खुप काही असे सीमाच्या मनात चालले होते. एक मात्र नक्की की त्याची कोणी गर्लफ्रेंड नसावी नाहीतर मला कशाला भेटला असता संध्याकाळी. सीमा आपल्याच विचारात गुंतत होती.


सीमा दिसायला छान होती पण तिचा चेहरा फारसा गंभीर असायचा त्यामुळे मुलीच्या चेहर्यावर जे गोड स्मितहास्य असावे तसे तिच्या चेहर्यावर नसायचे. सीमाला विविध विषयांवर वाचायची खुप आवड होती. जीवनाच्या अनेक पैलूंवर तिने वाचन केले होते. आणि म्हणूनच ति कमी वयातच मॅच्यूअर्ड झाल्यासारखं वागायची. आपल्या ग्रुपमध्ये ती लिडरप्रमाणे पुढं असायची. स्ट्रेट-फाॅरवर्ड बोलणे, बोलताना समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात पाहणे. बिनधास्त राहून मनातले व्यक्त करणे. अश्या बर्याचशा बाबी सीमाच्या प्लस पाॅईंट मध्ये येत होत्या. तिचे राहणीमान, कपडे, हावभाव यांतून तिचा आत्मविश्वास झळकत असायचा. नयनला प्रपोज करताना तिला हाच स्वभाव कामी आला होता. आता सीमा ऑफिस सुटण्याची वाट पाहत होती. नयन काय बोलणार याविषयी तिला उत्सुकता होती.


इकडे नयन संध्याकाळी काय सांगायचं याची तयारी करून बसला होता. नाही म्हणायला त्यालाही सीमा आवडलेली. पण तिला जेव्हा आपल्याबद्दल कळेल तेव्हा ती कसे रीअॅट करेल याचाच विचार नयन करत होता. तिच्यातला निर्भिडपणा त्याला विशेष भावला होता. सीमाला कसे सर्वकाही सांगायचं या विचारसत्रात नयन असताना ऑफिस सुटन्याची वेळ जवळ आली. आज वेळ जरा लौकरच गेला असे म्हणत नयन आवरायला लागला...



Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy