Tejashree Pawar

Inspirational

2.5  

Tejashree Pawar

Inspirational

तो एक क्षण……

तो एक क्षण……

6 mins
23.6K


ङगेला अर्धा तास ऑपरेशन थिएटरचा बल्ब बंद होण्याचे नावच घेत नव्हता. ढळणाऱ्या प्रत्येक सेकंदाला सलीलच्या ऋदयाचे ठोके गती घेतच होते.आपल्या हातून हे नक्की काय घडले आहे आणि याची परिणती पुढे कशात होणार आहे याच्या केवळ विचारानेच त्याच्या काळजाचा थरकाप उडवून दिला.त्या जीवाचे जे काही बरेवाईट होणार होते त्याची जबाबदारी सर्वस्वी त्याच्यावरच येणार होती. घामाने डबडबलेल्या अंगावर शहारे आले जेव्हा मन गेल्या दोन वर्षांच्या सर्व आठवणींनी भरुन आले.

दोन वर्षांपूर्वी आई वडीलांच्या अन् सर्व गावाच्या अपेक्षांची मूठ घट्ट आवळून,सर्वांच्या आशीर्वादाची शिदोरी अलगत जपत,नानाविध स्वप्ने उराशी बाळगून यशाकडे उंच भरारी घेण्यासाठी निघालेला सलील तो हाच….शहरात पहिले पाऊल अन् नानाविध चेहरे समोर. उंचच उंच इमारती, गजबजलेले रस्ते आणि आपल्याच विश्वात रमलेली माणसे!!! सर्वच नवीन होतं.मनात एक प्रकारची भीती दाटून आलेली;परंतु तितकीच उत्सुकता शिगेला पोहोचलेली.सर्वकाही अचंबितपणे बघता बघता होस्टेलचे प्रवेशद्वार समोर आले.आत जाण्यापूर्वी क्षणभरासाठी अगदी पोटात गोळा उठून आला आणि पुढच्या क्षणी निर्धाराची एक वीज अंगभर संचारली.

काॅलेजचा पहिला दिवस.भीती,आनंद,घरच्या आठवणी अन् पराकोटीची उत्सुकता सर्वच भावना संमिश्र होऊन अगदी शिगेला पोहोचलेल्या.काॅलेजच ते. रंगीबेरंगी जीवन…..विचार केलेला त्याहीपेक्षा अधिक सरस! स्वप्ननगरीच जणू.भटकायला अमाप जागा अन् वळणे तर इतकी की सावरत सावरत चाललं तरी तोल जायला क्षणाचाही विलंब नाही. अशा आयुष्याच्या वळणावर काहीतरी जगावेगळ करण्याची उर्मी नसेल तर नवलच की ते……. नजर भिरभिरु लागली.ओळखीचे चेहरे शोधण्यात गुंतली.कोणी सारखंवारखं दिसताच क्षणभर खिळली अन् बोलावं की नाही हा विचार करू लागताच फुलपाखरागत पुन्हा भिरभिरु लागली.नियमित काॅलेजचे दिवस सुरु झाले.अनोळखी चेहरे आता पाहिल्यागत वाटू लागले.ओळखींचे रुपांतर मैत्रीमध्ये होऊ लागले.मोठ्या शहरातलं नावाजलेलं काॅलेज.त्यात खाजगी म्हटल्यावर बड्या बापांच्या पोरांचा तर सुळसूळाटच . त्यांच्याकडे ईर्षेने पाहणारी नजर आता अनपेक्षितपणे त्यांत मैत्रिचा एखादा हात शोधू लागली होती.पाहता पाहता मनाजोगतेच झाले आणि गावाकडच्या मित्रांमध्ये रमणारे मन आता चारचाकींमध्ये हिंडू फिरु लागले.शिक्षकांच्या पकाऊ तासांपेक्षा कँटीन आणि कट्ट्याटटवरची मस्ती फारच भारी वाटायला लागली.2 चॉकलेटही आईला विचारुन घेणारं पोर आता सिगारेटच्या झुरक्यामघ्ये खरी चव शोधू लागलं…….

क्लासच्या नावाखाली खात्यावर येणारे पैसे आता जोरानेच खपु लागले.महिन्याला नव्या पुस्तकाची वाट बघणारं मन आता बार अन् पब च्या सस्त्यांवर भरकटू लागले.व्हिस्की अन् वोडकाच्या फक्त नावाने अंगात तरतरी यायला लागली. महिनाभराचा हिशोब असणारे खिसे आता सिगारेटच्या पाकिटांनी भरू लागली आणि बघता बघता ही रंगीबेरंगी दुनिया या बेरंग जीवनात हवे नको ते सर्व रंग अलगद भरू लागली!!! स्वप्ननगरीने आशेच्या किरणांसहित गरूडछेप घेऊ ईच्छिणार्या पाखराचा एका गडद अंधारात सुंदररित्या कायापालट केला होता…..

आई वडिलांची स्वप्ने आता धुळीत मिळाल्यागत जमा झाली होती. त्या सर्व आशा आकांक्षांना ,स्वप्नांना या नव्या दुनियेने पार झाकोळून टाकले होते अन् कधी कल्पनाही न केलेल्या गोष्टींची अगदी जोरात अंमलबजावणी चालू होती…..अशीच ह्या महिण्याची पार्टि आली अन् सगळाच ग्रुप आपल्या लाडक्या पब मध्ये उशिराने का होइना पण हजर झाला. मजा मस्ती झाली. नाच गाणी रंगली .मनसोक्त व्हिस्की घेतल्यावर नशेला एक वेगळीच रंगत चढली….बघता बघता सगळा घोळका जमला अन् खेळ चांगलाच रंगात आला….रात्रीचे बारा वाजून गेले होते. रस्त्यावरची वर्दळही कमी असेल असे वाटून की काय कुणास ठाऊक एकाच्या डोक्यात आपल्या सवार्यांची शर्यत लावण्याची भन्नाट कल्पना आली. जिथे तिथे पुढे असणारा सलील यात मागे राहिल तर नवलच…..मग काय चार गाड्यांमधे सर्व जण बसले अन् सुसाट वेगाने गाड्या रस्त्यावर धावत सुटल्या. केवळ पंधरा मिनिटाच्या अंतरावर अचानक झालेल्या आवाजाने सर्वांचाच थरकाप उडाला…. कोणाला काही कळण्याच्या आतच खूप काही घडून गेले .समोरचे द्रूश्य पाहून सर्वांचीच नशा क्षणार्धात उतरली……..

इतका वेळ बेशुद्ध अवस्थेत असलेल्या त्या स्त्रीला जाग आली अन् तिने जीवाच्या आकांताने एकच हंबरडा फोडला. त्या आवाजाने सलीलही भानावर आला. जागेवरून उठून तो तिच्याकडे गेला. जगभराची दूषणे ऐकून घेत तिला शांत करू लागला. थोड्या वेळात हा सर्व प्रकार थांबून वातावरण शांत झाले. या धक्क्यातून त्या थोड्या सावरल्या आहेत याची खात्री करून त्याने विचारपूस सुरू केली. त्यावर सलीलला जे कळले त्याने तो पुरताच हेलावून गेला।। शहरात शिकत असलेल्या आपल्या मुलाला भेटायला हे आईवडिल गावावरून आले होते. शहरात नुकतेच प़ोहोचून थांबण्यासाठी जागा शोधत असतानाच हा अपघात झाला होता. गेले 15 दिवस झाले मुलाशी काही संपर्क नाही अन् महिने उलटले तरी मुलाला पाहिले नाही म्हणून हे मायबाप एवढ्या दूरवर आले होते. क्षणार्धात सलीलला आपल्या आईवडिल़ांची आठवण झाली आणि डोळे अश्रूनी दाटून आले. सलीलचे ते पालटलेले रूप पाहून त्या माऊलीने त्याच्या चेहर्यावर हात फिरवला आणि त्यालाच समजावू लागली. आपल्या नवर्याच्या या अवस्थेला जबाबदार असणार्या या मुलाला ती आई गोंजारत होती….शांत करत होती. आईचेच र्हुदय ते।।।।

तेवढ्यात ऑपरेशन थिएटरचा दरवाजा उघडला आणि सर्वांनीच तिकडे धाव घेतली.प्राण वाचले होते पण अवस्था चिंताजनक होती. सर्वांनाच थोडे हायसे वाटले. थोड्याच वेळात सर्व घरी गेले. सलील मात्र तेथेच होता.कसल्याशा विचारात मग्न….आईच्या आठवणीने गलबलून गेलेला सलील तेथेच झोपी गेला होता. सकाळ झाली तरी त्याच्या चेहऱ्यावरची चिंता काही कमी झाली नव्हती. अचानक झालेल्या कचल्यातरी जाणीवेची चिन्हे त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती. भिरभिरणारं वादळ घरात थैमान घालून गेल्यावर व्हावी तशी अवस्था त्याची झाली होती. तेवढ्यात त्याच्या हातावर एक कोमल हात अलगद आला. एक विश्वासाची झालर त्याच्या चेहर्याने पांघरली.

दरवेळीच तिला पाहिल्यावर एक वेगळाच आत्मविश्वास जाग्रूत होई. नवीन काहितरी करण्याची ऊर्मी निर्माण होई. आपणही काहीतरी करू शकतो असे वाटे. पण आज हे सगळे खूप प्रकर्षाने जाणवत होते. रात्री झालेला हा सगळा प्रकार कळताच प्रिया अगदी धावतच आली होती. सलीलला तिच्या इतके कोणीच ओळखू शकत नव्हते. ‘काळजी करू नकोस सर्व ठीक होईल’, असे तिने म्हणताच आता खरंच कसलीच चिंता उरली नाही असे भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटले. सोबत झालेल्या प्रकाराबद्दल त्याची खरडपट्टी काढायलाही ती विसरली नाही. हे मात्र तिचे नेहमीचेच।।। ती बडबडत होती अन् हा तिच्या चेहऱ्याकडे पाहातच होता. दोन वर्षांपूर्वी झालेली त्यांची पहिली भेट आणि त्यावेळी ही अगदी अशीच झालेली त्याची कानउघाडणी त्याला आठवली. त्या दिवसापासून अगदी आजपर्यंत तिने त्याला क्षणोक्षणी साथ दिली होती. प्रेक्टिकल असेल तर प्रिया , सबमिशन्स करायचेत प्रिया, परिक्षा आलीय नोट्स हव्यात प्रिया…. त्याच्या लहानसहान प्रत्येक गोष्टीच्या केंद्रस्थानी होती ती।।।। आनंद असो वा दुःख त्याचे मन मोकळे करण्याचे हक्काचे ठिकाण म्हणजे तिच. पण त्याच्या सवयींची, आवडीनिवडींची , स्वभावाची काळजी घेणार्या या मैत्रिणीचे मन त्याला कधी कळलेच नाही. सलील कॉलेजला एक दिवस नाही आला तरी चिंतातूर होणारी, हा आजारी असेल तर जीवाची तगमग करणारी, याला हव्या नको त्या गोष्टी न सांगताच पुरवणारी , याला अगदी खरचटले तरी जीव खालीवर होणारी प्रिया त्याने कधी ओळखलीच नाही. गेल्या एक वर्षात तो तिच्यापासून बराच दूर गेला ह़ोता; पण ती मात्र तेथेच होती. त्याच्यासाठी वाटेल ते करणारी……

या नव्या मित्रांच्या संगतीत आल्यापासून सलीलचे बदललेले वागणे तिला अजिबातही पटत नव्हते. वारंवार समजावूनही दरवेळी पालथ्या घडावर पाणी। या सर्वांची परिणती एक दिवस अश्याच एखाद्या घटणेत होणार याची जाणीव तिलाही होती. आणि म्हणूनच ती त्याच्या समोर होती. त्याला सावरायला, समजावयाला, त्याच्या मनातील भावना कल्लोळाला वाट मोकळी करून द्यायला. त्याला खूप काही सांगायचे होते , मन अगदी दाटून आले होते. परंतु काहीही न सांगताच ती सर्वकाही समजून गेली.अगदी नेहमीसारखीच. खरंच किती समजूतदार होती ती।।।स्वभावाने अल्लड पण वेळ आल्यावर तितकीच समजूतदार. नको त्या गोष्टींचा हट्ट धरणारी, त्याने ऐकले नाही तर हिरमूसणारी, त्याच्या काळजीपोटी रागावणारी आणि तितकंच त्याच कौतुकही करणारी।।।। तिचे ते बोलके डोळे अन् सदैव हसरा चेहरा. दिसायला जेमतेमच पण चेहर्यावरचे तेज अप्रतिम। गुलाबाच्या पाकळ्या वार्याने अलगद खाली पडाव्यात तशे शब्द तिच्या ओठांतून बाहेर पडत होते अन् हे सर्व आज प्रथमच त्याला जाणवत होते …तेही या अशा वेळी।।। त्याला स्वतःलाच काही उमजत नसताना.

तो काही बोलण्याच्या आतच ती दुसऱ्या कोपर्यात उभ्या असलेल्या त्या स्रीकडे गेली. त्यांची विचारपूस करून बाहेर घेऊन गेली. थोड्या वेळात परतली अन् ‘तू काळजी करू नकोस ह्यांना मी घरी घेऊन जाते’, म्हणत त्याच्या समोर उभीही राहिली. खरंच प्रिया असेल तर सगळं किती सुरळीत होतं ना….. त्याला पुन्हा एकदा कळून चुकले अन् त्याने फक्त होकारार्थी मान हालवली. ती आली तशी निघूनही गेली पण चित्र पूर्णपणे पालटून….काही वेळापूर्वी काय चालू आहे अन् काय होणार आहे याचा विचार करत असलेला सलील आता कसलासा निर्धार करून सज्ज होता. या मातापित्याला त्यांच्या मुलाला भेटवण्याचे त्याने मनोमन ठरवून दिले……


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational