Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Tejashree Pawar

Others


3  

Tejashree Pawar

Others


आजोबा

आजोबा

3 mins 16.8K 3 mins 16.8K

आज समर्थ शांत बसला होता. एकदमच शांत. आजोबा लांबूनच त्याला न्हाहाळत होते. मोठा झाला आपला समर्थ आता. समजदारही झालाय भरपूर, आजोबा मनातच विचार करत होते. तसेच पुढे चालत गेले आणि त्याच्यासमोर जाऊन उभे राहिले. त्यांना पाहिले आणि समर्थचा चेहरा आनंदून गेला. त्याने सवयीप्रमाणे त्यांना मिठी मारली. आजोबांचे डोळे पाणावले. दोघेही खाली शांत बसले आणि आजोबा समर्थला गोष्ट सांगू लागले; पण आज शेवटची.

समर्थ.....एक सामान्य कुटुंबात फार प्रतीक्षेनंतर जन्मलेलं एकुलतं एक बाळ. झाल्यानंतर घरात प्रचंड आनंद. हवं तितकं कौतुक. काळजी देखील तितकीच घेण्यात आली. सुरुवातीचे काही दिवस गेले आणि नंतर मोठाच पेच निर्माण झाला. आईचे सुट्टीचे दिवस संपत आले होते. बाळाला सांभाळणारं घरात कोणीही मोठं माणूस नाही. विभक्त कुटुंब पद्धती. नवरा बायको दोघेही कामाला. शहरात राहायचं म्हणजे खर्च अमाप. त्यात आता बाळाचाही खर्च. नोकरी सोडणे तर परवडणारे नाही. पण बाळाला सांभाळणार कोण? कोणाला कामावर ठेऊन घ्यावे, तर कितपत विश्वास ठेवावा आणि पुन्हा पैशांचाही प्रश्न.

त्यात मैत्रिणीने एक कल्पना सुचवली. शहरात नवीनच सुरू झालेल्या 'साथ' या केंद्राची माहिती तिने दिली. वाढते शहरीकरण आणि त्याबरोबरच वाढणाऱ्या समस्या लक्षात घेऊन सुरू केलेली ही संस्था. लहान मुलांना सांभाळणारं कोणीतरी आणि दिवसभर घरात एकटेच बसणाऱ्या वृद्धांना सोबत करणारं कोणीतरी! या दोन्ही समस्यांची सांगड घालत एकत्रित मार्ग याद्वारे शोधण्यात आला होता. कामामुळे किंवा इतर कारणांमुळे मुलांचे संगोपन करू न शकणाऱ्या पालकांनी आपल्या मुलांना निश्चिंतपणे इथे सोडवायचे आणि मुले नोकरीसाठी बाहेर, आयुष्याचे जोडीदार साथ सोडून गेलेले, एकटेपणाला कंटाळलेले अशा वृद्धांनी दिवसभर यावे, या चिमुरड्यांसोबत मनसोक्त बागडावे, त्यांच्याशी गप्पागोष्टी कराव्या, त्यांचे संगोपन करावे आणि येणारा प्रत्येक दिवस आनंदात घालवावा. आयुष्याच्या वाटेवर सोबतीची सर्वाधिक गरज असणाऱ्या दोन घटकांना येथे एकत्र आणण्यात आले होते. त्यांच्या गरजा पूर्ण करण्यात आल्या होत्या....

समर्थ अशाच काही मुलांमधील एक आणि आजोबा अशाच काही वृद्धांमधील एक. येथे आणायला सुरुवात केली तेव्हा अगदी पाळण्यात होता. इवलंसं ते लेकरू. पहिल्याच भेटीत आजोबांचे एक अक्खे बोट आपल्या पूर्ण हातात पकडले होते आणि अगदी त्या दिवसापासूनच दोघांची गट्टी जमून गेली होती! रात्रभर काय तो फक्त आपल्या आईबाबांसोबत असे. बाकी त्याचा संपूर्ण दिवस आजोबांसोबत जात असे. त्याला जेऊ घालण्यापासून त्याला सांभाळण्यापर्यंतची सारी कामे आजोबा करत. समर्थला हात धरून चालायला त्यांनीच शिकवले होते. त्याच्या तोंडून उच्चारलेला पहिला शब्द आजोबा हाच होता.

पाळण्यातला समर्थ नकळत रांगायला लागला आणि आता तर चालायलाही लागला होता. दिवसभर खेळणे, गप्पा मारणे, राजा- राणीच्या आणि परीकथा ऐकवणे, यात वेळ केव्हा निघून जाई कळतच नसे. समर्थाच्या निमित्ताने आजोबांना त्यांचे सुरुवातीचे दिवस आठवून गेले. मुले लहानाची मोठी केली, त्या प्रत्येक पायरीवर त्यांसोबत असणाऱ्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळत असे. त्याच्याबरोबर त्यांचा दिवस कसा निघून जात असे, याचाही थांग लागत नसे. आयुष्यातल्या एकटेपणाचा पूर्ण विसर त्यांना पडला होता. पुन्हा एकदा एक नवा उत्साह जागृत झाला होता. रात्री घरी गेल्यावर पुन्हा उद्याचा दिवस कधी येतो याची वाट पाहत, समर्थसाठी काय काय करणार हे ठरवतच झोपी जात. तो त्यांच्या आयुष्याचा एक भाग बनला होता. दोघांनाही एकमेकांची प्रचंड सवय झाली होती. दोघेही एकमेकांच्या सान्निध्यात अत्यंत खुश राहात.

ह्या सर्वात दिवस कसे झरझर निघून गेले कळलेच नाही. समर्थ आता मोठा झाला होता. शाळेत घालण्याची वेळ आली होती. आता मात्र त्याला आजोबांची साथ सोडावी लागणार होती. उद्यापासून आपण आजोबांना भेटणारच नाही, हा विचार करतच तो लहानगा शून्यात हरवला होता. तो दुःखी होता. आजोबांना पुन्हा एकदा नवीन समर्थ मिळणार होता पण समर्थला आजोबा मिळणार नव्हते. त्याच्यासाठी ही सोबत इथपर्यंतच होती...


Rate this content
Log in