The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Tejashree Pawar

Tragedy

4  

Tejashree Pawar

Tragedy

सलाम त्या जीवांना !!

सलाम त्या जीवांना !!

2 mins
16.2K


काळजाचा थरकाप उडवनारी ती काळरात्र आजही आठवली की मन सुन्न होऊन जाते. सर्वत्र उठणाऱ्या त्या अग्नीच्या ज्वाळा,धुरांचे लोट आणि रक्ताच्या थारोळयात तडफडनारे ते हतबल जीव.सर्वकाही अगदी स्वप्नातही घडू नये असे.त्या अमानुष हल्यात आपल्या प्रयतनांची पराकाष्टा केलेल्या प्रत्येक देशसेवकाला सलाम आणि त्या मातेसाठी आपले प्राण पणाला लावून बलिदानाचे धाडस केलेल्या प्रत्येक देशभक्ताला शतश: प्रणाम!हल्याची बातमी कळताच आपल्या तोंडाचा घास ठेवून तडक निघलेले हेमंत करकरे,पत्नी आणि मुलांना सोडून निघालेले अशोक कामटे आणि क्षणाचाहि विलंब न करता आपल्या प्रयतनांची पराकाष्टा करण्यास सज्ज झालेले विजय साळसकर म्हणजे देशभक्तीचे उत्तमोत्तम उदहारण.आपल्या कर्तव्याची क्षणोक्षणी जाण असण आणि कुठल्याही दुसऱ्या गोष्टीचा क्षणभरही विचार न करता,कुटुंब मोहात न अडकता,कुठल्याही सुखाचा उपभोग न घेता या मातेच्या सेवेसाठी दिवासरात्र तत्पर असणारे हे अनमोल रत्न.

२६ नोव्हेंबर २००८,या दिवशी छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे अतिरेक्यांचा मागोवा घेत पोहोचलेल्या या तिघांनाही अतिरेकी कामा हॉस्पिटल परिसरात आहेत हे कळल्यावर क्षणात तिकडे धाव घेतली ती या अतिरेक्यांचा कुठल्याही अवस्थेत फडशा पाडायचा या निर्धारानेच……परंतु या निर्धारासोबतच कसाब सारख्या नाराधमालाही क्षणात नमविण्याचे साहस बाळगणाऱ्या या तिघांवरही अतिरेक्यांनी गोळयांचा वर्षाव करून भारतमातेसाठी वाटेल ते करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या नयनांना,केवळ गुन्हेगार आणि गुन्हे यांचाच विचार धुमसणाऱ्या त्या मस्तकांना आणि फक्त या तिरंग्याच्याच नावाने धडधडणाऱ्या त्या ह्रदयांना क्षणात छिन्नविछिन्नकरून सोडले.तरीही त्या तेजस्वी चेहऱ्यांवरचा या मातेविषयी आदर,त्यासाठी याच धरणीवर बलिदान दिल्याचा अभिमान आणि त्या आनंदाने भारावलेले देह हसतमुखाने या जगाचा निरोप घेत होंते. फक्त तळमळ तेवढी एकच राहिली की या मातृभूमीसाठी काहीतरी करून जाण्याची…

मेरे लहू का कतरा कतरा तेरे काम आए

तेरे लिये जिऊ तो लाखो जनम कम पड जाए!!!!

या तीन रत्नांना गमावून भारतमातेने काय गमावले आहे याची किंमत फक्त या देशवासीयांनाच आहे.फक्त स्वराज्यासाठी लढणारे टिळक,सावरकरच नव्हे तर आज कालच्या जातियवाद,गुन्हेगारी,नक्षलवाद या विरूद्ध लढणारा प्रत्येक पोलिस अधिकारी,आपल्या कुटुंबापासून वर्षानुवर्ष दूर राहणारा आणि केवळ या धरणीच्या संरक्षणासाठी शत्रूशी सीमेवर दोन हात करणारा प्रयेक जवान,संपूर्ण देशाच्या अन्नाची जबाबदारी शिरेवर घेऊन अहोरात्र झटणारा बळीराजा,आपल्या रूगणाचा अतिशय ममतने इलाज करणारा डॉक्टर,भारताच्या सर्वागीण प्रगतीसाठी झटणारा इंजिनिअर,देशातील विद्यार्थाच्या मनात ज्ञानाची ज्योत तेवत ठेवणारा प्रयत्नशील शिक्षक आणि देशाच्या भविष्याचा विचार करणारे प्रत्येक तरूण मन हे सर्वच देशप्रेम व देशभक्ती यांची जिवंत उदाहरणे आहेत.या सर्वांना खऱ्या अर्थाने सलाम!!!!!


Rate this content
Log in

More marathi story from Tejashree Pawar

Similar marathi story from Tragedy