STORYMIRROR

Arun Gode

Crime

3  

Arun Gode

Crime

तिकडम

तिकडम

8 mins
183

एका छोट्याशा गांवातील दोन मित्र बारावीं नंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी जवळच्या शहरातील महाविद्यालत अलग –अलग शहरात प्रवेश घेतात. गणित आणी मॅक्रोबॉयोलॉजी एकाच ठिकानी नसल्यामुळे त्यांची असलेली लहान-पना पासुनची जुगल- बंदी तुटलेली असते.दोघेही साधारण आर्थीक परिस्थितित वाढलेले असल्यामुळे आपले कॉलेज रोज रेल्वे गाडीने मासिक पास काढुन जाने-येने करून कॉलेजला हजरी लावत होते. दोघांसाठी आनंदाची व सोयीस्कर बाब अशी होती कि दोन्हीं विपरित दिशेने जाणा-या गाड्यांचा येण्याच वेळ जवळ पास एकच होता. त्यामुळे त्यांची रोजच भेट होत असे. ज्याची गाडी पहिले येत होती तो टाटा बॉय-बॉय करुन दुस-याचा निरोप घेवुन आपली दैनंदिन कॉलेजची दिनचर्या पूर्ण करत असे. ते दोघेही एकाच माळीचे मणी होते.मनाने एक असलेले दोघे ही मित्र पहिले सारखे एका-मेका सोबत वेळ घालवु शकत नव्हते त्याची दोघांनाही खंत होती. पण प्रत्येका समोर आपले भविष्य घडविने, ते ही व्यक्तिगत योग्यता व क्षमतेनुसार मोठे आवाहनच होते.त्यामुळे त्यांना आपला मार्ग बदलवा लागला होता.जेव्हा कधी त्यांना वेळ मिळत असे ते एक-मेका सोबत आपल्या नविन कॉलेजच्या गंमती-जमंती शेअर करत होते. कधी- कधी ते गंमतीने मनायंचे जर आपले कॉलेज एकच असते तर किती झान झाले असते !. तेव्हा अरुणचा मित्र म्हणायचा एखाद्या दिवशी मला तुझ्या महाविद्यालयात यावयाचे आहे !. तो म्हणतं होता, तु जेव्हा म्हणशील तेव्हा आपण जावु यां की !. दोघांचे कॉलेज सुरु होवुन बराच काळ लोटला होता.

    प्रत्येकाने आप-आपल्या कॉलेज मधे साख बनली होती.रेल्वे ने प्रवास करण्यात ते पारंगत झाले होते. त्यांनी रेल्वेचा बारकाईने अभ्यास केला होत.रेल्वे प्रशासनाच्या ज्या कमजोर बाजुंची त्यांना सविस्तर जाणीव झाली होती. टिकिट चेकर वैगरेची भीती मिटली होती. दोघांचा आत्मविश्वास आता खुपच उंचावला होता.

        एके दिवशी दोघेही रेल्वे स्टेशन वर आले होते. एक्मेकांशी गप्पा -गोष्टि मारत होते. अरुणच्या मित्राला त्याच्या मित्राने सांगितले अरे आज आपली गाडीचा काहीही भरोसा नाही. ति अनिश्चित वेळेसाठी लेट दाखवत आहे. हे ऐकुन त्याच्या पायाखालचे जमिन सरकुन गेली होती. तो अरुणला म्हणाला कि आज इतक्या लेट कॉलेज मधे जाण्यात काही अर्थच उरला नाही. तु गेला कि मी पण घरी जावुन आज मस्त झोपणार !. तेव्हा अरुण त्याला म्हणाला ,अरे हे काही आपले झोपा काढावयाचे दिवस आहे कां ?. अरे तु तर आता जवान सांडच आहे. ताचा मित्र अर्ध्या हळकुंडीने पिवळां झाला होता.चल आज दोघेही माझा कॉलेजला जावुन येवु. अरुण त्याच्या म्हणातलचं बोलत होता. तरी औपचारिकता म्हणुन तो म्हणालां तुझे कॉलेज आहे. मी येवुन विनाकारण तुला अडचणीत कशाला आनु ?. तेव्हा अरुण त्याला गंमत करित म्हणाल, अरे तु आज गणित शिकुन घे !. आडात नही तर पो-ह्यात कूठून येणार. अरे मला गणित जमले असते तर तुला घटस्फोट कशाला दिला असता ?. आमच्या अख्या परिवारत कधीच कोणाला गणित जमले नाही. कसले कायं आणी फाटक्यात पाय अशी माझी गणिताची अवस्था आहे.तितक्यातच अरुणची गाडी आली होती. जे दोघांच्याही म्हणातं होते त्या साठी दोघेही गाडित आत शिरले होते. ते गमंत-जमंत करित वर्धेला पोहचले होते. त्यांच्यासोबत अजुन रोजची मित्रमंडळी पण होती. पास म्हणुन सर्व स्टुडंट रेल्वे स्टेशनाच्या बाहेर निघाले होते.जेव्हा त्यांनी कॉलेजच्या परिसरात प्रवेश केला होता. तिथे अरुणचे वर्गमित्र झुंड मधे उभे होते. त्याच्या सोबत अज्ञात नविन मित्राला दुरुन बघुन त्यांच्या कडे मोठ्या कुतुहलाने टक लावुन बघत होते. एक–मेकांना इषारे करत होते. त्यांना अंदाज झाला होता कि अरुण सोबत त्याचा लंगोटीमित्र पण आला आहे. अरुणनी आपल्या मित्राचा सर्वांन सोबत गर्म जोशीने परिचय करुन दिला होता.नंतर तो मित्रांचा झुंड कॉलेज भ्रमणासाठी निघाला होता. त्यंनी त्याच्या मित्राला वेग-वेगळ्या शास्त्राच्या प्रयोगशाळा दाखविल्या होत्या. भव्य-दिव्य प्रयोग -शाळा आणी महाविद्यालयाचे इमारत पाहुन तो भारावुन गेला होता. थोड्या वेळेसाठी त्याचे पण कॉलेज ऐवढे अवा-ढव्य असते तर किती छान !. नंतर त्याला खेळण्याचे पटांग दाखवण्यात आले होते. पुढच्या टप्पात ते सांस्कृतिक भवनात गेले होते. जिथे विविध कार्यक्रम वर्ष भर होत होते. शेवटी ते कॉलेजच्या ग्रंथालयात पोहचले होते. ते बघने झाल्या वर अरुणने त्याच्या मित्र आगमना निमित्त सर्व मित्रांना नाश्ताची पेशकश केली होती. ती त्या मित्रांनी लगेच हातो-हात मान्य केली होती. पूर्ण झुंड कॉलेजच्या बागेतुन रेल्वे स्टेशनावर पोहचले होते. तीथले दाल-वडे खुपच प्रसिध्द होते. मित्रांनी स्वादिष्ट दाल-वड्यांचा चाह सोबत आनंद घेतला होता. त्यांनी मग ठरविले होते आता कॉलेजला बुट्टी मारायंची !. त्यामुळे ते सर्व आप-आपल्या घरी निघुन गेले होते.आणी त्यांना पण आग्रह केला होता की तुम्ही पण आपल्या गांवी परत जावे.

         आम्ही दोघेही आमच्या गांवाला जाणा-या गाडीची गोष्टि मारत वाट बघत होतो. अरुणचा मित्र इतका खुश झाला होता जसा कोल्हा काकडीला राजी. तितक्यातच नागपुरला जाण्या-या गाडी येण्याची घोषणा झाली होती. दोघांचेही मन विचलित झाले होते. त्यांच्या डोक्यात नागपुरला जावुन राजेश खन्नाचा “ रोटी “हा सिनेमा बघण्याची तीव्र इच्छा बरेच दिवसा पासुन होती. त्यांना आज ही संधी मिळाली होती. संधीचे सोनं केलेचं पाहिजे म्हणुन त्यांनी नागपुरला जाण्याचे ठरविले होते. तेवढ्यातच नागपुरला जाणारी गाडी फलाटावर येवुन ठेपली होती. सर्व काही त्या दिवशी मना सारखे घडत होते. जनु आपाला हाथ जगन्नाथच होता. गाडीत प्रवेश करुन आम्ही नागपुरला ज्याणा-या रोजच्या मित्रांना आम्हाच्या सुरक्षेतेसाठी शोधत होतो .व शोध घेतल्यावर , त्यांच्या सोबत आम्ही जावुन बसलो होतो. कॉलेज मधे घडलेल्या घडामोडींची दोघेही आप-आपल्या परिने उजळणी करत होतो. उजळणी करत-करता अचानक गाडीचा वेग मंदावला होता. नागपुर येण्याचा बेतात होते. लगेच काही रोजचे रेल्वे पास धारक नेहमी प्रमाणे लोहा पुल आला असे ओरडु लागले होते. उतरणा-यांची एकदम झुंबड झाली होती. ते पटा-पट उतरु लागले होते. आलीया भोगाशी असावे सादर. आम्ही पण त्याच प्रयत्नात होतो. सराव नसल्यामुळे आम्ही गाडीचा वेग़ अजुन मंदावण्याची प्रतिक्षा करत होतो. पण गाडीने तेव्हा वेग़ पकडने आरंभ केला होता. त्यामुळे आम्ही लगेच उतरण्याचा प्रयत्न केला होता. पण आम्ही कसे तरी तंगडत-फेंगडत उतरलो होतो. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. काही विशेष असे घडले नव्हते. पण संकटातुन नक्कीच बाहेर पडलो होतो. त्यामुळे दोघांनीही समाधानाच्या श्र्वासचा फुसकारा घेत-घेत समोरची वाट पकड्ली होती. शेवटी सिनेमा गृहाच्या प्रांगणात आमचे पदार्पण झाले होते. रांगेत उभे राहुन फिल्मची दोन टिकटे घेतली होती.

       सिनेमा सुरु होण्यासाठी बराच विलंब आहे म्हणुन आम्ही शेजारच्या प्रसिध्द हॉटेल मधे गेलो होतो.त्या हॉटेल मधील दही-वडे खूपच प्रसिध्द होते.त्यामुळे आम्ही दही-वड्यांचा आर्डर केला होता.विशेष गर्दी नव्हती. लगेच दही-वडे लंपास करुन, तर-तरी येण्यासाठी चहा पण घेतला होता. वाढ्प्या आता बिल घेवुन आला होत. बिल घेवुन आम्ही काउंटर वर गेलो होतो.पण काउंटर वर असणार गृहस्थ अति महत्वपूर्ण फोन असल्यामुळे तो व्यस्त होता. आम्हला सिनेमा सुरु होईल म्हणुन घाई होती. त्यामुळे बिलाचे नेमके पैसे काउंटर वर ठेवुन त्याला तसा सांकेतिक इषारा केला होता. आणी मग आम्ही सिनेमा गृहात लगेच प्रवेश केला होता. सिनेमा आरंभ होण्याच्या बेतातच होता. लगेच चित्रपट सुरु झाले होते. आम्ही आमची मान व पाठ सरळ करुन सिनेमाच्या पडद्या कडे आम्हचे डोळे वटारले होते. खूप ध्यान पूर्वक आम्ही राजेश खन्नाचे संवाद ऐकत होतो. चित्रपटाचा पुरे-पुर आनंद घेत होतो. आनंदात लगेच अचानक मध्यांतर झालामुळे खलल पडली होती. तीतक्यातच खरमुरेवाला आपल्या रोजच्या तो-यात आमच्या पर्यंत येवुन पोहचला होता. खरमुरे घेनासाठी मी खिशात हात टाकला होता,तोच पैसा सोबत हॉटेलच्या बिलाचे टोकण पण निघाले. नियमप्रामाने त्याला पैसे देतांना काउंटर वर जमा करावयला पाहिजे होते. ते टोकण पाहुण आमच्या दोघांच्या ही खोडकर डोक्यात एक विलक्षण लख्ख प्रकाश पडला होता. अळी-मळी गुपचळी. आपण ताचे आता, या संधीचे सोनं करु अशी दोघांनी ही ठरविले होते. अति-बुध्दिमान एक सारखा विचार करतात.

       सिनेमा संपल्या नंतर स्वतःला व्यवस्थित करुण संध्याकाळी आम्ही आमच्या गुप्त योजनेला साकार करण्यासाठी त्याच हॉटेल मधे पुनः प्रवेश केला होता आम्ही अक्षरशाः मांजरीच्या गळ्यात घंटी बांधायला निघालो होतो.हॉटेल मधे खूच भिड जमली होते. आम्ही कॅश काउंटरच्या मागे एकदम शेवटच्या टेबल वर धावा घेतला होता. लगेच एक वाढ्प्या मेनु सोबत आम्हच्या सेवेत हजार झाला होता. त्याला आम्ही थोड्या वेळेने येण्यास सांगितले होते. मेनु मधील सर्वात महागडे आणी दोघांनाही आवडनारे स्वीट आम्ही त्याला आर्डर केले होते. ते संपले की अजुन दोन स्वीट आर्डर करित होतो. असा आम्हचा कार्यक्रम पोटाची व जीभेची संपूर्ण संतोष्टि होई पर्यंत सुरु होता. शेवटी वाढ्प्याला चहा आणी बिल आण्यासाठी सांगितले होते.चाहा संपे पर्यंत वाढप्या बिल घेवुन आला होता. त्याला आम्ही चांगली श्रीमंत पार्टी आहे हे समजुने तो काही टिपची अपेक्षा करित होत. तो चुकीचा नव्हता. जरी आम्ही श्रीमंत घरात जन्म घेतला नव्हता पण प्रकृतिने आम्हाला राजकुमारा सारखे सौंदर्य नक्कीच दिले होते. आम्ही त्याला बॉथरुम विषयची चौकशी केली होती. त्याने आम्हला मार्ग दाखवली होता. बिल उचलुन आम्ही खिशात ठेवले होते. व त्याला काही टिप देवुन मोकळे केले होते. तो दुस-या ग्राहाकात व्यस्त झाला होता. आम्ही बॉथरुमला गेलो होतो. तीथे ताजे-तवाने झालो. माझ्या मित्राने मी कदाचित काही घोटाळा करु शकतो म्हणुन जुन त्याच दिवसाचे दुपारचे टोकन आणी नेमके पैसे घेवुन शावा सारखा काउंटर गेला होता. गर्दी असल्यामुळे तो टोकन बघुन पैसे घेवुन ग्राहकांना धन्यवाद देत होता. माझा मित्र पण त्याचा धन्यवाद घेवुन बाहेर पडला होता. बाहेर पडतांना आम्ही कोणता तरी किल्ला फत्ते करुन छाती चौवडी करुन अभिमानाने रेल्वे स्टेशन वर हाजरी लावली होती. तीथे काही विघ्न येवु नये म्हणुन मधे मार्गावर पडणा-या टेकडीच्या विघ्नहार्ताचे दर्शन पण घेतले होते. आम्हलां त्याने सदबुध्दी दिली होती म्हणुन आम्ही दोन प्लॅटफार्म विकत घेतले व गाडीची वाट पाहत त्या फलाटावर गप्प-गोष्टि करित बसलो होतो. गाडी आल्यावर दोघंनी संपूर्ण गाडीचे निरिक्षण केले होते. रोज-येणे जाने वाले कुठे बसले आहेत ताचा शीध घेतला होता व गाडी सुरु होताच त्यांच्याच बोगित प्रवेश करुन त्याच्या सोबतच आमचा प्रवास फार पाडला होता. गांवी पोहचल्या वर आम्ही शेर झालो होतो. तो दिवस आमच्या पराक्रमाचा दिवस होता. आमची जीवावर बेतनारी तिकडम यशस्वी झाली होती.

     आम्ही आतुन जरी नसलो तरी वर-वर आनंदीत आणी खुश होतो. हे न विसरणारे कार्य म्हणजे न कर्त्याचा वार म्हणजे आमच्या साठीच शनिवार होता. त्या दिवशी आम्ही दोघांनी न कळत अनेक घोड चुका केल्या होत्या. त्या दिवसाची आमची अवस्था म्हणजे उताविळ नवरा अन गुडघ्याला बाशिंग असीच होती. आमच्या मुळे माझ्या कॉलेजच्या मित्रांचे अभ्यासचे नुकसान झाले होते ते वेगळेच. रेल्वे ने बिना टिकट प्रवास करने कायदाने गुना होता. कदाचित पकडल्या गेलो असतो तर पोलिस केस झाली असती. चालु गाडित उतरतांना जर अपघात होवुन अपाहिज झालो असतो. आणी श्रम न करता बिना मुल्य स्वादिष्ट स्वीट खाने म्हणजे दुस-याच्या श्रमाचा अपमान करनेच होता. हपापाचा माल गपापा असतो हे विसरुन गेलो होतो. रोटो सिनेमा जरी आमचा आंबट शौक होता तरी एखादी जरी घटना आम्हच्या विपरित झाली असती तर आम्ही दोघेही मित्र जीवन भर रोटी साठी म्हणजे अन्नासाठी लाचार झालो असतो !.जीवन भर एक- मेकावर आरोप –प्रत्यारोप केले असते. त्या दिवसाची आमची कृति म्हणजे काम न धाम अनं उघड्या अंगाला घाम म्हणजे व्यर्थच होती.


Rate this content
Log in

Similar marathi story from Crime