Lata Rathi

Romance

3  

Lata Rathi

Romance

"ती"पहिली भेट

"ती"पहिली भेट

3 mins
316


सुजल आफिस मधून घरी आला.... पण हे काय ! Door bell वर हात ठेवणार इतक्यात लक्षात आलं..... आज मात्र दार उघडच... दार ढकलताच घरात त्याच्या आवडीच्या मोगऱ्याचा सुगंध दरवळलेला... नक्कीच आज काहीतरी विशेष असणार, त्याने खूप आठवायचा प्रयत्न केला.... विचार करतच सुजल आत आला... हॉलमध्ये पोहोचताच light पण बंद... अरे बापरे!!! घरात अंधार... दार उघडच टाकून कुठे गेल्यात मॅडम...  त्याने light लावला ... आणि काय आश्चर्य ????   समोर मस्त टेबल सजवलेला, त्यावर सुंदर असा चॉकलेट केक...बलूनस, बाजूच्या कॉर्नरवर त्याच्या आवडीची पिवळ्या गुलाबाची फुल फुलदाणीत सजलेली..... घरभर सुवासिक सुगंध दरवळलेला...त्याला घामच फुटला....आज काय विशेष!!! आपण काही विसरत तर नाहीं ना....  सुजल ने आपली बॅग सोफ्यावर ठेवली...आणि अनुजा (त्याची पत्नी) म्हणून आवाज देणारच, एवढ्यात पिंक colour ची साडी नेसून अनुजा हळूच बाहेर आली.   

सुजल तिच्याकडे बघतच राहिला...तीने त्याच्या गालावर हलकेच टिचकी मारली. सुजल- अनुजा, हे काय ग ! आज काही विशेष.... अनुजा- विसरलास ना... अरे आज आपल्या दोघांच्या भेटीचा दिवस...   आठवतोय तुला तो दिवस मी नवीनच कॉलेज ला जॉईन झाले होते. बारावी नंतर इंजिनीयरिंग साठी मी इथे आले होते.एका छोट्या गावातून प्रथमच शहरात शिकायला आले होते, खूप साध सरळ राहणीमान माझं... कॉलेज मध्ये मुलां-मुलीना एकत्र फिरतांना, त्यांचे ड्रेसेस बघून मी माझ्याकडे बघायची. त्यांच्यामध्ये मिसळायचा प्रयत्न करायची...पण नाही जमलं रे मला त्यांच्यात ऍडजस्ट होणं. कदाचित त्यांना नसेल आवडलं माझं साधपण.   काही दिवस खूप त्रास झाला या गोष्टीचा. पण नंतर मात्र रुळत गेले मी.... मी आणि माझा अभ्यास. पुस्तकांशीच मैत्री केली मी. प्रत्येक परीक्षेत topper. ज्या मैत्रीनि मला टाळायच्या , त्याच आता माझ्या मागे फिरू लागल्या. प्रॅक्टिकल, नोट्स यांची देवाणघेवाण सुरू झाली. पण माझं साधपण मात्र तसंच होतं.   अश्यातच कॉलेजच् gathring आलं, मला गाण्याची भारी हौस. सहज म्हणूनच मी भाग घेतला...आणि प्रेक्षकांनी इतकं डोक्यावर घेतलं.... once more....... once more नि संपूर्ण हॉल गुंजला...  खरच नाही वाटलं, मी इतकं छान गाते म्हणून.    मला पहिलं पारितोषिक मिळालं...   दुसऱ्या दिवशी कॉलेज मध्ये अचानक तू समोर आला...आणि मला विचारलं ,"तुम्हाला हरकत नसेल, तर आपण सोबत कॉफी घेऊया"... जाम घाबरले रे मी...कारण आतापर्यंत मी मुलांशी कधी बोलले सुद्धा नव्हते.. पण...माहिती नाही कसं!!! पटकन हो...च निघालं माझ्या तोंडून. आणि पहिल्यांदाच मी एका मुलाबरोबर कॅन्टीन मध्ये बसून कॉफी घेत होते. 

तोच तो आजचा दिवस रे.... आपल्या दोघांच्या भेटीचा पहिला दिवस.कसं विसरेन मी.  ती त्याच्या बाजूला बसली, त्याचा हात हातात घेतला...आणि.. अनुजा आणि सुजल परत भूतकाळात शिरले...  पुढे पुढे मी थोडी मोकळी होत गेले. आपण दोघे छान मित्र झालो. दोघांच पण अभ्यासावर खूप प्रेम म्हणून पहिलं प्राधान्य अभ्यासालाच दिल. दिवसामागुन दिवस सरत गेले. आपलं शिक्षण संपल, आता दोघेही carrier च्या शोधात... आपल्या वाटा वेगळ्या झाल्या. पण मैत्री मात्र टिकून होती. फोनवर सुद्धा बोलणं सुरूच होतं. तुला एका MNC मध्ये चांगली नोकरी मिळाली. मला सुद्धा नोकरीची ऑफर आली.... पण अचानक भावाचा accident , त्यानंतर आईची खालावलेली तब्येत बाबांना एकट्याना झेपेना म्हणून मी नोकरी सोडून घरी परत आले.  आणि अचानक तुझा फोन आला ," अनुजा, तू लग्न करशील माझ्याशी" खर सांगू सुजल , तू मला खूप आवडायचास, पण माझ्या सारखी साधी-सरळ मुलगी तुला जीवनसांगिनी म्हणून आवडेल का? हाच प्रश्न सतावायचा. म्हणून कधी मनातलं बोललेच नाही मी.  पण...तू मागणी घातलीस, तुझ्या घरचे मला बघायला आले,पसंती झाली...लग्नही झालं.

सुजल- " अहो मॅडम... खूप भूक लागलीय, जे बनवलय ते देणार की नाही"....की फक्त वासानीच पोट भरायचं आम्ही... अनुजा-" हो.......हो.....देते ना. धावतच किचनमध्ये गेली....त्याच्या आवडीचं... Pure veg.... कटलेट... तुरीच्या दाण्याची कचोरी.... शुद्ध तुपातली जिलेबी.... आणि सोबतीला पहिल्या आठवणींची इलायची वाली गरम गरम कॉफी....  तीन वर्षे होतील त्यांच्या लग्नाला.... पण पहिल्या भेटीचा तो प्रसंग... गरम गरम कॉफी... असते नेहमीच सोबतीला....पण बाकीचे मेनू मात्र वाढलेय हं...  कोणी wedding anniversary करतात... पण पहिल्या भेटीचा प्रसंग आठवून celebration करण्याचा आनंद मात्र अवर्णनीयच हं... (कसा वाटला हा पहिल्या भेटीचा प्रसंग....आवडल्यास like, comment करून नक्की कळवा हं) Share पण करता येईल पण माझ्या नावासह ही नम्र विनंती.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance