arun gode

Inspirational

3  

arun gode

Inspirational

स्वप्नपूर्ती

स्वप्नपूर्ती

6 mins
296


          एक उर्जावान तरुण जीवनात येणा-या सर्व प्रकारच्या अडी-अडचनीला तोंड देत त्यातुन कसा तरी बाहेर निघतो. हे सर्व करतांना जीवणात येणा-या सर्व प्रेम संधींना मोठ्या कष्टाने दूर ठेवुन आपल्या समोरच्या जीवणाचा मार्ग प्रशस्त करतो. शिक्षण पूर्ण करुन एक सरकारी नौकरी नागपुर शहरात स्वीकारतो. आपल्या शिक्षणाचा भरपुर उपयोग व्हावा म्हणुन काही आवश्यक अभ्याक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या या सर्व हाल-चालीवर कार्यालया काही मधील सहकर्मी सारखे लक्ष्य ठेवत असे.स्वतःचे झाकुन पण दुस-याचे वाकुन, मानसिकतेचे लोक असतातचं. या जगात नौकरी करतंना जर आपल्या पेक्षा मोठ्या अधीका-याला खुश करुन आपला स्वार्थ साधायचा असेल तर चुगल्या करने व साधारण बाबींना खूप वर-चढ करुन बॉसला सांगने हा एकदम साधा, सरळ उपाय असतो.त्यासाठी काही कर्मचारी अन्य निःपक्ष सहकर्मीला मोहरा बनवतात. तो मग त्यांच्या सापळ्यात सापडतो.असाच प्रकार कथेतील नायका सोबत घडला.


त्याची अवघ्या दोन वर्षाच्या आंत काही कारण नसतांना भोपाळला बदली करण्यात आली होती. त्यामुळे त्याला जावे लागले होते.नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्न. पण नौकरी लागल्या नंतर त्याचे प्रथम स्वप्न हे संत्री नगरात एक छोटासा बंगला बनवण्याचे होते. अचानक नागपुरला असतांना काही वरिष्ठ सहकर्मियांचे पण आपला स्वतंत्र बंगला किंवा घर बांधण्याची ईच्छा होती. ती स्वाभाविक होती. नागपुर सारख्या शहरात स्वतंत्र प्लॉट विकत घेने हे जवळ-पास सगळ्यांच्या आवक्या बाहेरचे होते. म्हणुन काही सहकर्मियांचा प्रस्ताव होते कि आपण एक सोसायटी बनवुन, नंतर एक शेत घेवुन त्याचे प्लॉट पाडु .ते प्लॉट सर्वांना स्वस्त पडतील आणी ऑफिसची एक कॉलोनी पण तयार होईल.ठरल्या प्रमाने एका समितीचे गठन झाले. त्यात स्वतः कथेचा नायक पन असतो. सोसायटिच्या सदस्यांनी कार्य करने सुरु केले होते. सर्वच कामात नायक फार जीद्दीने सहकार्य करत होता.करण त्यामुळे त्यानी बघितलले स्वप्न पूर्ण होणार होते. परंतु त्याची बदली झाली. त्यामुळे त्याला भोपाळला जावे लागले होते.बाकी सहकर्मि सोसायटीचे कार्य करत होते. शेवटी तो दिवस उगवला. शेत विकत घेण्यात आले होते. त्यात नायक फार सक्रिय कार्यकरता असल्यामुळे त्याने एकदम कॉर्णरचा मोठा प्लॉट ठेवला होता.


    जेव्हा –जेव्हा तो आपल्या परिवारा सोबत आपल्या जन्मगांवी जात येत असे. तेव्हा आपल्या परिवाराला प्लॉट गाडितुन दाखवण्याचा प्रयत्न करित असे. प्लॉट्ची रजिस्ट्री पण करने सुरु झाले होते. जेव्हा नायक आपली पण रजिस्ट्री करण्यासाठी गेला. तेव्हा त्याच्या लक्ष्यात आले कि त्याला जो आवंटीत प्लॉट होता. तो बदलवुन त्याला त्याच रांगेत दोन प्लॉट सोडुन दुसरा प्लॉट देण्यात आला होता.चैकशी नंतर समजले कि तो जुना आवंटीत प्लॉट सोसायटीच्या सचिव ने हडपला होता.गोगल गाय व पोटात पाय. तकरार केल्यावर सांगण्यात आले कि हा सोसायटीच्या प्रबंधंनचा निर्णय आहे. नायकाने विचारले कि तो पण सोसायटी प्रबंधंनचा सदस्य आहे. त्याला न बोलवता कसा निर्णय घेण्यात आला.त्यावर सांगण्यात आले, आपली बदली झाल्यामुळे, त्या जागी दुस‌-याला घेण्यात आले आहे. सध्या तुम्ही सोसायटी प्रबंधंनचे सदस्य नाही आहे. शेवटी काही सहकर्मियांचा सल्यानुसार त्याने त्या प्लॉट्ची रजिस्ट्री करुन घेतली होती. शेवटी ती सोसायटी मिहान प्रकल्पामुळे वादग्रस्त झाली. दुष्काळात तेरावा महिना अशी गत झाली.


बरेच सदस्यांनी घाबरुन आपले प्लॉटस विकुन टाकले होते.मला पण असे करण्यास काही सहकर्मि प्रवृत्त करत होते. बाजारत तुरी व भट भटनीला मारी. फार मेहनतीने ही सोसायटी बनवण्यात आली होती. मोठ्या आशेने हा प्लॉट परिवाराच्या स्वप्नपूर्ति साठी घेतला होता. आमच्या सारख्या अनेक सोसायट्या या मिहान प्रकल्पात अडचनित आल्या होत्या. मी शेवटी नाराज होवुन समोर जे काही होईल, ते बघुन घेवु. आली अंगावर तर घेतली सिंगावर. समोर काय जे होईल त्याची वाट बघायचे ठरविले होते. काही काळ उलटण्या नंतर, मिहान प्रकल्पाच्या आवंटीत क्षेत्राची सिमा कमी करण्यात आली होती. व त्यामुळे ब-याच सोसायट्या त्यातुन सुटल्या होत्या. त्यात आमची पण सोसायटी होती. त्यामुळे सर्वांना खुप खुशी झाली होती. देव तारी त्याला कोन मारी.

       वर्तमान सचिव सेवानिवृत्त झाला होता. त्यामुळे त्याने आपले घर बांधण्याचे कार्य आरंभ केले होते. अचानक तो एके दिवसी घराचे काम बघत असतांना बाजुच्या सोसायटी मधील काही सदस्य मोज-माप करत होते. तेव्हा त्याने चिकित्सा म्हणुन विचारपुस केली. तेव्हा माहित पडले कि सोसायटी मधुन 120 फुटचा रस्ता जाणार आहे. त्यामध्ये त्यांचे काही प्लॉट जाणार आहे. असे त्यांनी त्याला सांगितले होते. याचा परिणाम त्याच्यावर पण होणार होता.करु गेले काय,अन वरते झाले पाय. त्यामुळे त्याने काम बंद केले होते. चौकशी नंतर माहित पडले कि त्याचा पण त्यात अर्धा प्लॉट गेला आहे. नागपुर नगर सुधारण्यास नियमाप्रमाने 50 प्रतिशत खुली जागा सोडल्या नंतर उरलेल्या जागेत घर बांधनी करता येते. आता माजी सचिव संकटात सापडला होता. गोगल गाय व पोटत पाय.काय करावे त्याला समजत नव्हते.


शेवटी त्याने त्याच सोसायटी मध्ये री-सेलचा दुसरा छोटा प्लॉट घेतला. हे माहित पडल्यावर मी आनंदाने सुखावलो. अरे आपन फार मोठ्या संकटातुन वाचलो. काही सदस्यांनी तीथे घर बांधने सुरु केले होते.माझी पण इच्छा झाली.आपण पण घर बाधांवे. त्यासठी नागपुरला बदली होने जरुरी होते. तसे मी प्रयत्न करित होतो. पण मला यश आले नाही. स्थानीय राजनीति मुळे मला नेहमी डावलण्यात येत होते. शेवटी कार्यालयाने बदमाशी करुन माझ्या मुळगांवा जवळ असलेल्या कार्यालयत बदली केली.त्यामुळे माझ्या मुलांच्या शिक्षनाचे नुकसान होणार होते. शेवटी मी माझ्या परिवाराला नागपुरात ठेवले होते. नंतर घर बांधनीची कामी लागलो होतो.


    नायक एका मध्यम साधारण परिवाराचा सदस्य होता. थेंबे –थेंबे तळे साचें.त्याने पै-पै जोडुन आणी अनेक ठिकानावुन कर्ज घेवुन घर बांधले होते. घर बांधताना अनेक अडचनी आल्या होत्या. बाजुला राहणारा शेजारी-याने, विद्युत कार्यालयाच्या सबंधीत अधिका-याला कदाचित लाच देवुन आपाल्या साठी फार दुरुन केबलच्या मदतीने विद्युत आणली होती. परिचीत असल्यामुळे घर प्रमुखाने त्याच्याशी चर्चा करुन घर बांधनी साठी विद्युत देण्याचे कबुल करुन घेतले होते. त्यामुळे घर बांधण्याचे कार्य सुरु झाले. कॉलोनीत अजुन दोन-चार सेवानिवृत्त सहयोग़ी होते. ते सर्वजन दूर असलेल्या विद्युत खंबावर तार टाकुन विद्युत घेत होते.घराचे जवळ-पास पहिल्या छत टाकण्याच्या इतके काम पूर्ण झाले होते. अचानक ज्या दिवशी छत टाकाण्याचे ठरविले होते.त्याच दिवशी ऐन वेळी शेजा-याने विद्युत देने बंद केले. चर्चा करण्या पूर्वी काहीही पूर्वसुचना न देता तो घराला कुलुप लावुन निघुन गेला होता. सुर्य लाजेल अन चंद्र लपेल अशी यांची थोरवी होती.


    इतरान प्रमाने खंबावर तार टाकुन विद्युत घेवुन कार्य पूर्ण करण्यात आले. शेजा-याला काय समस्या आहे हे जानुन घेण्यासाठी, तो त्या शेजा-याच्या घरी गेला. बरिच चर्चा झाली.पण कारण समजु शकले नाही.कदाचित आवळा देवुन भोपळाची तो अपेक्षा करत असावा. शेजा-याने उलट सल्ला दिला कि तुम्ही पण खंबावर तार टाकुन इतरान प्रमाने विद्युत घ्या. घराचे कार्य अशा प्रकारे प्रगती वर होते.अचानक एक दिवस काम बंद असतांना विद्युत मंडळाची टिम तपासनी साठी आली. तपासनी नंतर सर्वांना दंडनिय अपराध केल्या बद्दल भारी- भक्क्म आर्थिक दंड भरण्याच्या नोटिस दिला.दंड् न भरल्यास कानुन शिक्षा देण्याचा सुचना पण नोटिस मध्ये होती. घरचे झाले थोडे अन व्यहांनी पाठवले घोडे. सर्वांनी दंड भरला होता. दंड बसल्यामुळे शेजा-याचे कारस्थान सफल झाल्यामुळे तो फार खुश होता. कॉलोनी सोसायटिची असल्यामुळे विद्युत मिळवण्या साठी त्यावेळस नियमाप्रमाने ट्रांसफार्मर व विद्युतीकरनाचे पूर्ण कार्यसाठी सोसायटिला लागणारा खर्च विद्युत मंडळात जमा करने बंधनकारक होते.पन सोसाटितील अन्य बरेच सदस्य आवश्यक रकम सोसायटिला देत नव्हते. त्यामुळे विद्युतीकरणाचे कार्य रखडले होते.

 

     अशा कठिन परिस्थितित मकान बांधनीचे कार्य कसे-बसे प्रगतीवर होते.एक दिवस घर मालक व त्याचा मुलगा. प्लास्टर केलेल्या रुम मध्ये भितींना पानी देत होते.पाणी देत असतांना फ्लोअर वर चांगले पानी जमा झाले होते. अचानक बल्ब बंद पडला होता. मोटर सुरुच होती.पाहिले तर ओढ-ताण करतांना जोडलेला तार सुटला होता.लगेच लक्ष्याता आल्यावर आम्ही दोघानी बाजुच्या लाकडी दरवाज्याला पकडले होते. जो तार तुटला होता त्याला कसे-बसे काडीच्या मदतीने पाण्याच्या बाहेर फेकले होते.नंतर अंधारातुन बाहेर जावुन बोर्डची बटन बंद केली होती. काळ आला होता पण वेळ आली नव्हती .जर दैवाने साथ दिली नसता, तर घराचे जीवणातील एका मोठे स्वन्प पूर्ण होण्या आधीच त्यांचा काळ आला होता. म्हातारी गेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो. हा प्रसंग जेव्हा-केव्हा आठवतो,तेव्हा आजपण शरिरावर संकटाचे काटे उभे राहतात.पण आता मृत्युची जास्त भिति वाटत् नाही. कारण एक वेळस जर मृत्युला जवळुन बघितले आणी त्यातुन निसटले तर मग मृत्युची जास्त भिति वाटत् नाही.गरज सरो व वैध मरो. सर्व संकटावर मात देवुन कसे-बसे राहण्या योग्य घर उभे झाले होते.पण घराला ब-याच काळा पर्यंत कुलुप लावुन बंद ठेवावे लागले होते. कारण आवश्यक असणारी विद्युत पुरवठची सोय अजुन झाले नव्हती. घर प्रमुकाने सोसायटिच्या बरेच सदस्याना आपला अंशदान भरण्यासाठी प्रेरित केले होते. त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. जर सोसायटि मध्य विद्युत आली तर तुम्हा सर्वांना घर बांधने सोपे जाईल. चिंध्या वेचलेल्या अन गोदडया शिवलेल्या,खुप प्रयत्न करुन घर बांधनीचे कार्य पूर्ण केले होते.


    तुम्हाला जर घर बांधायचे नसेल तर तुमच्या जागेची चांगली किंमत येवु शकते.बरेच प्रयत्ना नंतर व काही महिण्या नंतर प्रयत्नला यश आले होते. सोसायटीमध्ये विद्यतीकरणाचे कार्य पूर्ण झाले होते.परिवाराने पाहिलेले स्वताःच्या घराचे स्वन्प पूर्ण झाले. शेवटी आवश्यक धार्मिक विधी पूर्ण केल्या नंतर परिवाराने गृह प्रवेश केला होता. घर बंद असताना कोनतेही चोर घरात घुसले नाही.वह काही नुकसान झाले नाही. नविन घराचा आस्वाद पति-पत्नी घेत होते.मुलांना फार दिर्घ काळासाठी नवीन घराचा आनंद घेता आला नाही.मुलीला लगेच एका कंपनी मध्ये पुण्याला ऑफर मिळाली होती.मुलगा पोस्ट-ग्राड्युवेशन साठी बेंगलरुला गेला होता. नंतर तीथेच एका कंपनी मध्ये त्याला जॉब मिळाला होता. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational