स्वप्नं..
स्वप्नं..
"अहो चला लवकर.. किती वेळा सांगु तुम्हांला उशीर होतोय..उठा पण एका जागी जे बसलात उठायला तयार नाहीत तुम्ही... माझं कधीच झालंय आवरुन,आशुला ही तयार केलंय मी.. तिला स्कूल ला सोडून.मला कॉलेजला सोडा आणि मग तुम्ही जा तुमच्या कामाला.".
अवनी ची न थांबता बडबड चालू होती. अविनाश न राहवून जोरात ओरडला.
"अवनी... भानावर ये...कोणतं कॉलेज , कुठे जायचं तुला? कोण आहे तु ? आठवण आहे का तुला? मारण्यासाठी हात उचलून तो तिच्या अंगावरुन चालुन गेला..पण भानावर येत तिथेच थांबला.आपला हात पाठीमागे घेतला. "अवनीचा हात हातात घेऊन हळुवारपणे बोलु लागला.हे बघ अवनी.तुला सांगितले ना डॉक्टरांनी तुझी तब्बेत बरी नाही. तोवर तु आराम करायला हवा.आणि कॉलेज ला सुट्टया पण चालु आहेत काही दिवसांनंतर जा ना मग तु? आता आराम कर.. ही गोळी घे तुला बरं वाटेल हा.."
अविनाश शिताफीने गोळी अवनी च्या तोंडात ठेवतो तिला पाणी देतो.गोळीमुळे तिला लगेच झोप लागली.
अविनाश ति झोपली की, नाही याची खात्री करून
बाहेर जाऊन सतीशला फोन करतो. सतीश अवीनाशचा मित्र आणि एक डॉक्टर सुद्धा मानसोपचारतज्ज्ञ .
"हॅलो सतीश. काय हे अवनी ची अवस्था जास्तच बिघडत चालली आहे. कधी बरं वाटणार आहे तिला? असं किती दिवस ति या स्वप्नाच्या दुनियेत जगणार आहे? या काल्पनिक जगाच्या विळख्यातुन तिला कसा बाहेर काढु मी..तिला अशा अवस्थेत बघवत नाही रे मला. अवीनाश रडकुंडीला येऊन सतीशशी बोलत होता."
सतीश बोलला तु लगेच हॉस्पिटलमध्ये ये.एक उपाय सापडलाय. बघु काय करता येतं का??
अवीनाश मुलगी आशुला शाळेत सोडुन सरळ हॉस्पिटलमध्ये जातो. .
सतीश - अरे ये अवी बस...
अविनाश - बसायला वेळ नाही मला. गोळीची पॉवर आहे तोवर अवनी झोपली आहे.ती उठण्याच्या आधी मला घरी जावे लागणार. हे बघ अजुन पुढची ट्रिटमेंट असेल तर ती करुयात का आपण. अवनी मध्ये काही सुधारणा दिसत नाही मला...
सतीश - हे बघ अशी चिंता करू नकोस. वहिनी लवकरच बऱ्या होतील. बरं ज्या ठिकाणी त्यांचा अपघात झाला होता. ती जागा तुला माहित आहे का?
अविनाश - हो तेच कॉलेज जिथे जाण्यासाठी ती रोज सकाळी तयार होऊन बसते. त्याच्या अगदी समोरच्या रोडावरच झाला तिचा अपघात.
सतीश - कसा झाला सांगु शकतोस का तु?
अवीनाश - मी एकदोन जणांना विचारले तर
रस्त्याच्या मधोमध पाण्याचे मोठे डबके होते.त्याच्यात अवनी ची स्कुटी स्लीप झाली होती. एवढीच माहिती मिळाली मला..
सतीश - आपण त्यांना परत त्या ठिकाणी घेऊन जायला हवे आणि पुन्हा एकदा त्याच पद्धतीने तो अपघात घडवून आणला पाहिजे. काही तरी इंप्रुमेंट नक्कीच दिसेल आपल्याला.. आणि हो आपल्याला त्यांच्या काही जुन्या मैत्रिणी, क्लासमेट त्यांचे आईवडील यांच्याशी सुद्धा बोलावं लागले कदाचीत काही तरी मदत नक्कीच होईल ट्रिटमेंट मध्ये.
अवीनाश आणि सतीश अवनी च्या मैत्रिणी आणि आई वडील तसेच काही नातेवाईकांना भेटले. तेव्हा त्यांच्या लक्षात काही गोष्टी आल्या..
अवनी आज एक गृहिणी आहे एका तीन वर्षांच्या मुलीची आई आहे . तिच्या लग्नाला चार वर्षे झाली.
पण लग्नाआधी ती एक हुशार विद्यार्थीनी होती
मन लावून अभ्यास करणारी. नेहमी पहिल्या नंबराने पास होणारी. शाळेत, कॉलेजमध्ये सर्व शिक्षकांची आवडती विद्यार्थीनी. आदर्श विद्यार्थी म्हणून पुरस्कार ही मिळाला होता. तिचे एक छोटेसे स्वप्न होते.प्राध्यापिका बनण्याचे. मराठी विषयातुन बि.ए. करत होती. नंतर एम.ए. बि.एड.आणि मग पि.एच.डी.करुन लेक्चरर होण्याचे तिचे स्वप्न ते स्वप्न च राहिले. घरची परिस्थिती गरिबीची होती. अवनी घरातली मोठी मुलगी. चांगले स्थळ स्वतः हुन चालुन आले.म्हणुंन कुठलाही विचार न करता आईवडिलांनी बिए.ए. च्या शेवटच्या वर्षाला असतांनाच अवनीचे लग्न लावून दिले.
अवनीने आईवडिलांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला.मला शिकु द्या. मला शिक्षीका बनायचे आहे.पण आईवडिलांना हातचे चांगले मागणे सोडायचे नव्हते.
अवनीने गपगुमान लग्न केले. सासरी एकत्र कुटुंब.
सर्वात अवनी छान रमली. सर्वांची आवडती सुन बनली. एक कर्तव्यदक्ष बायको, आई सर्वाच गोष्टीत अगदी निपुण होती. तिला पाहून कुणालाही वाटणार नाही.तिच्या मनात एवढे मोठे दुःख लपवुन ती बसली होती.
मुलगी तीन वर्षांची झाली.ति प्ले ग्रुप ला होती. रोज तिला सोडायला अवनी स्कुटी ने जात असे.रस्त्यातच एक सिनीयर कॉलेज होते.अवनी मुलीला सोडुन परत जातांना रोज या कॉलेजच्या गेटजवळ थोडा वेळ थांबत असे.येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना पहात असे. काही तरी विचार करुन लगेच घरी निघून जात असे.हे तिचे रोजचेच होते... जिल्ह्याच्या ठिकाणचे ते सर्वात मोठे कॉलेज होते.. याच कॉलेजात प्राध्यापक बनुन शिकवण्याचे स्वप्न तिने कधीतरी पाहीले होते.जे ती पुर्ण करु शकली नव्हती...
आठ दिवसांपूर्वी मुलीला शाळेत सोडुन परत जातांना तिचा याच ठिकाणी अपघात झाला होता.
तिच्या डोक्याला मार लागला होता .. अपघात तसा छोटा होता.पण डोक्याला मार लागल्याने अवनी च्या वागण्यात बदल झालेला दिसून येत होता.
शुद्धीवर आल्या पासुन ती स्वतः ला प्राध्यापिका समजत होती.डॉक्टरांच्या म्हणन्यानुसार ती एका अशा स्वप्नात आहे.जिथे तिचे अपुरे राहिलेले स्वप्न पूर्ण झाल्याचा तिला भास होतोय. काही काळापुरते तिला
असे वाटते आहे की,ती एक उत्तम शिक्षीका बनली आहे.आणि तिने कायम जे स्वप्न पाहिले होते.ते सत्यात उतरले आहे.आणि तिच्याच वेगळ्या जगात जगते आहे. हे सर्व दुसरं काही नाही तर तिच्या मनाच्या भावना ज्या इतकी वर्षे दाबुन ठेवल्या आहेत.त्या अशा पद्धतीने बाहेर पडल्या आहेत.
अपघातामुळे तिला थोडा स्मृतीभंशाचा परीणाम झाला आहे.पण ते फक्त काही वेळा पुरता असेल.ती लवकरच यातुन बाहेर येईल. ती तिच्या बनवलेल्या काल्पनिक दुनियेत जगत आहे.
तिला वाटते मी एक प्राध्यापिका बनली आहे.त्याचप्रमाणे ती रोज सकाळी तयार होते. वेगवेगळ्या फाईल, पुस्तके आपल्या पर्स मध्ये ठेवते. छान छान साड्या नेसून तयार होते.आणि अवीनाशला सा़गते मला कॉलेज ला सोड.आज माझे पहिलेच लेक्चर आहे. विद्यार्थी माझी वाट पाहतील.वगैरै..वगैरै... अवनी काही दिवसांनी बरी होईल. डॉक्टरांनी सांगितले आहे..
अवनी ही एक काल्पनिक जगात एका अशा स्वप्नात जगते आहे.जे तिने कधीतरी पाहीले होते.पण हुशारी असुनही ती ते स्वप्न पुर्ण करु शकली नाही.आणि त्या गोष्टीचा परिणाम तिच्या मनावर झाला होता.पण तिने आपल्या त्या भावना कधीच बाहेर पडु दिल्या नाहीत.आतल्याआत तिची घुसमट होत होती.हे तिच्या जवळच्या माणसांनाही कधी कळले नाही.पण तिची ती घुसमट अशा प्रकारे बाहेर आली.आणि त्याचा परिणाम तिच्या डोक्यावर झाला. आपल्या आजुबाजूला अशा अनेक अवनी असतात. ज्या आपल्या इच्छा आकांक्षा ना मुरड घालून समाजाचा,घरच्यांचा विचार करून जगत असतात. पण त्यांच्या त्या अपुऱ्या राहिलेल्या आकांक्षाना त्या आपल्या काल्पनिक दुनियेतजगण्याचा प्रयत्न करतात. एखादे स्वप्न जेव्हा सत्यात उतरेल तर आपल्याला किती आनंद होईल.अशा कल्पना विश्वात त्या रमतात.. कधी कधी याचा परिणाम त्यांच्या मेंदुवरही होतो आणि एकुणच त्यांच्या पुर्ण आयुष्यावरही होतो.
म्हणून मुलींना त्यांची स्वप्ने, इच्छा पूर्ण करण्याची आईवडिलांनी मुभा दिली पाहिजे, पाठींबा दिला पाहिजे. मुला़प्रमाणेच मुलींच्या हुशारी ची ही किंमत केली पाहिजे..
(वरील कथा आणि कथेतील पात्रे पुर्णपणे काल्पनिक आहेत तरी कुणाच्या आयुष्याशी मिळता जुळता प्रसंग असेल तर केवळ योगायोग समजावा कथा आवडल्यास एक लाइक करा कमेंट करा अजुन नवनवीन कथा वाचण्यासाठी नक्कीच फॉलो करा.)
