स्वप्नात तुझं येणं...
स्वप्नात तुझं येणं...


स्वप्नात तुझं येणं, स्वप्नात का होईना तू माझी होणं सार सार विलक्षणच. तुझं बोलणं जणू वसंतात प्रितीलतेच बहरणं, सप्तसूराचं झंकारणं. तुझं वागणं जणू निरागस झ-याच मन्सोक्त खळाळणं. स्वप्नात तू मला भेटणं म्हणजे दूर कुठेतरी आकाश-धरतीचं मिलन झाल्याच भासतं त्या क्षितीजासारखंच. स्वप्नात तुझं येणं स्वप्नात का होईना माझं होणं म्हणजे सागरानं सरीतेला कवेत घेणं, रजनीच्या बाहूपाशात जणु अवघ्या विश्वाच विलीन होणं.
स्वप्नात तुझं येणं स्वप्नात का होईना माझं होणं, मलाही हवंहवंस वाट्णं. तुझ्या स्नेहासिक्त सानिध्यात घालवलेला तो प्रत्येक क्षण पुन्हा नव्याने अनुभवल्या्च भास होतो. तुझं खळाळून हसणं, अचानक अबोल होणं. तर कधी मनातल्या मनात कुढणं. तर कधी कड्कडून भांड्णं. तर कधी चकार शब्द न बोलताही नुसत्याच नजरेनंच बरंच काही बोलणं. तुझा तो बालिशपणा तर कधी भविष्याबाबतची चींता. सारं सारं आठवतं. न्यूनतेला भरलेला जगात पुन्हा नव्याने जगण्याचे बळ देण्याचं काम स्वप्नातला का होईना तुझा सहवास देऊन जातो. कधी कधी वाट्तं वास्तव जीवनापेक्षा आपली स्वप्नच बरी. समुद्र्किनारी वाळूचंच घर बांधावं, निर्मीतीचा आनंद्ही आणि घर मोड्ल्याचं दुःखही नाही. वास्तव एवढं भायानक असतं की त्यापेक्षा स्वप्नंच खरी वाटतात काही क्षण का होईना आनंद देवून जातात. आणि मोबदलाही मागत नाहीत की ह्क्कही सांगत नाही. वास्तव जीवनात जगतांना स्वप्नंच देवून जातात खूप काही अन्न्मा गताही. अखंड, अविरतपणे. असतिल भले ती स्वप्ने, अभासी , क्षणभंगूर. असतात आपल्याशी नेहमीच अन् न मागताही प्रामाणिक. रखरखत्या उन्हांत थकल्या भागल्या जीवाला पाणी जसे नवसंजीवनी देतं अगदी तितकंच महत्व वाट्तं मला स्वप्नात तुझं येणं स्वप्नात का होईना माझं होणं.