शब्दसखी सुनिता

Inspirational Others Children

4.0  

शब्दसखी सुनिता

Inspirational Others Children

स्वप्नांना अंत नाही

स्वप्नांना अंत नाही

5 mins
272


    आनंदी लहानपणापासुन स्वप्न बघणारी मुलगी... नावाप्रमाणेच ती नेहमी आनंदी असायची. लहानपणापासुन आनंदीला डान्स करायला खुप आवडायच. तिचे बाबा प्रायव्हेट क्षेत्रात जाॅब करायचे आणि आई गृहिणी होती. पण आपल्या मुलीने खुप शिकाव, खुप मोठ व्हाव आणि स्वतःच्या पायावर उभ राहाव अस त्यांना वाटायच. पण आनंदिला डान्स करायला ते नेहमी प्रोत्साहन द्यायचे. ती नेहमी स्पर्धेत भाग घेत असे. तिला बाबांनी लहान असताना तीची आवड लक्ष्यात घेऊन तिला डान्स क्लास जाॅईन करायला लावला. तीही खुप प्रॅक्टीस करायची. मेहनत घ्यायची. इतक्या लहान वयात ती उत्तम डान्सर बनली होती. शाळेत, ती राहते त्या गल्लीत ती फेमस होती. सगळे तिला ओळखायचे. आनंदीला ही खुप छान वाटायच. ती डान्स स्पर्धैत भाग घ्यायची आणि तीने खुप ॲवार्ड मिळवले होते. आनंदीच स्वतःच एक स्वप्न होत की डान्स ॲकॅडमी काढायची. बर्‍याच तिच्यासारख्या मुलींच इच्छा असते डान्स शिकायची. स्वप्न असत की बेस्ट डान्सर बनायच पण घरून त्यांना पाठींबा मिळत नाही. तर अश्या सर्व मुलींना ती शिकवणार होती. ती खुप लकी होती तिला डान्ससाठी प्रोत्साहन देणारे आईवडील भेटले होते. एक दिवस तिने सहज बाबांना तिच्या स्पप्नाविषयी विचारल, बाबा मी पुढे मोठी झाल्यावर डान्स ॲकॅडमी काढु शकेल का ? तेव्हा बाबा तिला म्हणाले, आनंदी बाळा आता तु लहान आहेस... तु उत्तम डान्सर आहेस. तुझे टिचरही म्हणतात ना...मग झाल तर आणि इतके सारे तुला आताच ॲवार्ड्स मिळतात, तर नक्किच तु स्पप्न तु पूर्ण करू शकशिल. आनंदीलाही बाबांनी अस बोलल्यावर प्राऊड फिल झाल. तिचा उत्साह अजुन वाढला. ति मनापासुन प्रत्येक स्पर्धेत भाग घ्यायची आणि आपला क्रमांक मिळवायची.       


आनंदी काॅलेजला जाऊ लागली, तरी तिने तिची कला जोपासली होती. काॅलेजच्या अभ्यासासोबत डान्सच्या प्रॅक्टीससाठिहि ती वेळ काढायची. वेगवेगळ्या नृत्यस्पर्धेत ती भाग घ्यायची. तिला आवड होती म्हणुन ती तिच स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडत असायची. आईवडीलांनाही तिचा अभिमान वाटायचा. सर्व फ्रेन्ड्सची ती आवडती होती, ती इतरांना नेहमी छान छान सांगायची. आनंदी खुप मेहनती होती. ती कुठलही काम असू द्या ते मन लावून करायची. एकदा ती अचानक खुप आजारी पडते, त्यातच तिची दृष्टी जाते. तिच्या डोळ्यांपुढे अंधार होतो. तिचे आईबाबा आपल्या आनंदीची दृष्टी परत यावी म्हणून मोठमोठी हाॅस्पिटलमध्ये जातात. डोळ्यांचे तज्ज्ञ डाॅक्टरर्स असतील त्यांनाही दाखवतात तिला खुप पैसा खर्च होतो. पण काहि साध्य होत नाही. तिला फारस दिसत नसत. ती पूर्णपणे खचुन जाते. आता काय कराव तिला सुचत नाही. तिचे आईबाबाही चिंतेत असतात. तिची आशाच संपून जाते. तिची मैत्रिण वेदिका तिला या अवस्थेत बघू शकत नव्हती. ति एक दिवस घरी आली नि तिने आनंदीला समजावल की, " तु मनातुन खचुन जाऊ नको. बाकी सगळ ठीक होईल. स्वतःवर विश्वास असला की आयुष्याची सुरूवात केव्हाही आणि कधीही करता येऊ शकते. "   आपल्या मैत्रीणीच बोलण ऐकुन आनंदी तिला म्हणते, " नाही ग मला दिसतच नाही तर मी डान्स कसा करू शकते. " त्याच वेळैस बेल वाजते, आनंदीची आई दार उघडते... बघते तर काय तिचे काॅलेजचे सर्व फ्रेन्ड्स तिला भेटायला घरी येतात. तिची आणि वेदिका सांगते. बघ तुला भेटायला कोण कोण आलय... इतक्या वेळ विचार करणार्‍या आनंदीच्या चेहर्‍यावर खुप दिवसांनंतर हसु उमटल. तिने प्रत्येकाच्या आवाजावरुन ओळखल की हा आपला ग्रुप आहे. सगळे हसायला लागले. तिलाही त्यांना भेटुन बर वाटल. तिला सगळे तब्येतीची विचारपूस करत होते.


सगळे तिला धीर देत होते, तिला मात्र वाटत होत की आपण यापुढे डान्स करु शकत नाही. तेव्हा तिला तिची मैत्रिण म्हणाली, की बघ तु करू शकते आनंदी. आणि कोण म्हणत तुला दिसत नाही. आम्ही आता सगळे तुला भेटायला आलो तेव्हा फक्त आवाजावरुन ओळखल की आपल्या ग्रुपचे फ्रेन्ड्स आहेत म्हणून तस गाण तर तु ऐकु शकते आणि बाकी तुला डान्सच सगळच येत, तु करून बघ नक्की जमेल तुला. तिला सगळे म्हणतात. तेव्हा आपले फ्रेन्ड्स इतका विश्वास आपल्यावर आहे तर आपण प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे ती त्यादिवशी पासुन मनाशीच निश्चय करते. तिही सर्वांना प्राॅमीस करते की मी तुमच्यासाठी नक्कीच प्रयत्न करेन. सगळे तिला हसुन बाय करतात. आईबाबाही तिला हेच सांगत असतात. " तु करू शकते डान्स, डान्स करायला डोळ्यांची नाही तर आत्मविश्वासाची गरज आहे. त्याच्यासारखा सोबती नाही. तो जोपर्यंत आपल्यासोबत आहे ना तोपर्यंत आपल्याला कुणीही हरवू शकत नाही. " आईबाबांच बोलण ऐकूण तिच्यात पुन्हा आत्मविश्वास येतो. ती हळूहळू सुरू करते डान्स प्रॅक्टीस करते, गाण ऐकून त्याच्या तालावर तिच हे सगळ छान सुरू होत. तिला जमायला लागत. तिला तिची मैत्रिण आणि तिचे फ्रेन्ड्स खुप सपोर्ट करतात. आनंदीने परत सूरूवात केल्यावर तिच्या बाबांना खुप आनंद होतो. तेव्हा ते तिला सांगतात की तु स्वतःला कधीच अस हरल्यासारख समजू नको, तुला हे माहीती आहे का बेटा, सर्वात मोठ यश खुप वेळा सर्वात मोठ्या निराशेनंतर मिळत असत. आणि जोपर्यंत आपण हारण्याचा विचार करत नाही ना तोपर्यंत कुणीही आपल्याला हरवू शकत नाही.     


आनंदीला छान डान्स जमायला लागतो. तिचा आत्मविश्वास अजुन वाढवण्यासाठी तिचे मित्र - मैत्रिण तिचे डान्सचे व्हिडीओ सोशल साईटवर अपलोड करतात. त्या डान्सच्या व्हीडीओला खुप लाईक्स आणि छान कमेंट मिळतात. तिचे फ्रेन्ड्स , तिचे आईबाबा यासाठी सपोर्ट करतात. तिला हे सांगतात तेव्हा तिचा आनंद गगनात मावेनासा होता. ति सर्वांना thank you म्हणते, तेव्हा आई म्हणते की तु खुप मेहनत घेत आहेस तर तुला यश नक्कीच मिळणार. तु अजून खुप पुढे जावीस अस आम्हा सर्वांना वाटत. आनंदीला तिचे फ्रेंड तिला स्वतःच चॅनेल बनवायला लावतात. हेल्प करतात त्यावर आता ती आईबाबांच्या मदतीने व्हीडीओ अपलोड करायची. ती दिवसेंदीवस फेमस होत होती. सगळ्यांना तिचे व्हीडीओ खुप आवडायचे. तिचे फॅन वाढतात. तिला छान आणि पाॅझिटीव्ह कमेंट मिळतात. तिचा आत्मविश्वास अजुन वाढतो. तिच्या डोळ्यांवरही उपचार सूरू होते. त्यामुळे तिच्यात सुधारणा होत होती. तिला ऑनलाईन टिचींगसाठी काही फॅन विनंती करतात. ती ऑनलाईन क्लास घ्यायला सुरूवात करते. तिला छान रिपोन्स मिळतो. एवढच नाहीतर मुलींना ज्यांना कुणाला डान्स शिकायची इच्छा असते, पण घरातील लोक त्यांना सपोर्ट करत नाही अश्या मुलींच स्वप्न पूर्ण व्हाव यासाठी ती स्वतःची डान्स ॲकॅडमी सुरू करते. तिने लहान असताना बघीतलेल तिच स्वप्न ती जिद्दीने पूर्ण करून दाखवते. तिच्या ॲकॅडमीमध्ये खुप मुली डान्स शिकू लागल्या. यात तिला तिचे आईबाबा आणि तिचे फ्रेन्ड्स आणि अनेक चांगल्या लोकांचा सपोर्ट तिला लाभला. आनंदी च्या कार्याची दखल अनेक वृत्तपत्र, सोशल मिडीयाने घेतली. तिला एका मोठ्या समारंभात डान्ससाठी ॲवार्ड मिळतो. तेव्हा तिला खुप आनंद होतो. तिच स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद तिच्या चेहर्‍यावरून ओसंडून वाहत होता. तेव्हा तिने सांगीतल की, एक लक्ष्यात ठेवा... नशिबाचे दार कधीच आपोआप उघडत नाही. मेहनत करुनच ते उघडावे लागते. स्पप्न बघणारेच ती सत्यात उतरवतात. स्वप्न नुसती बघायची नसतात, तर ती पूर्ण करण्यासाठीची जिद्द तुमच्यात असली की ते स्वप्न नक्कीच सत्यात उतरल्याशिवाय राहणार नाही.  


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational