स्वप्न राजेशाही थाटाच
स्वप्न राजेशाही थाटाच
राजेशाही दरबार त्यात राजेशाही थाट राजाचा पोशाख वर मुकुट परिधान करून जेठालाल जेवणासाठी बसला होता स्वप्नांत काहीही घडू शकते असेच भन्नाट स्वप्न जेठालाल गाडा याला पडले जेवणाचे टेबलं छान सजवले होते दास दासी सेवे साठी तत्पर होते समोर राणी बबिता जी राजा जेठालाल बरोबर बसून जेवण करत होती पण जेठालाल चे पूर्ण लक्ष आपल्या राणी कडे होत तसे हि त्याचे असतेतच पण आज तर तिची ती राणी होती म्हणजे जेठालाल एकदम सात आसमान उप्पर होता
राणी बबिता ने राजा जेठालाल ला जेवणात लक्ष द्या असे सांगत होती आणि जेठालाल हसत हसत जेवू लागला खूप डिशेस ताटात होते दास दासी दरवाजा बाहेर उभे होते
राणी बबिता ने आपल्या हाताने भरलेली खीरीची वाटी राजा जेठालाल समोर ठेवली राणी ने दिलेली आणि राजाने खाल्ले नाही असे कधीच झाले नाही राजाने चमच्याने खीर तोंडात टाकली आणि पटकन थुंकली
"काय झालं राजा "?
"राणी हि खीर खारट आहे सगळी चवच गेली "
"काय "?
"हो "
"बरं मी पाहते "
"नाही नको राणी तुच्या तोंडाची चव गेलेली मला चालणार नाही "
"कोण आहे रे तिकडे ""
"जी महाराज "
"हि खीर कुठल्या आचाऱ्याने बनवली आहे "?
"महाराज चंपक आचारी "
"बोलवा त्याला "
चंपक आचारी म्हणजे जेठालाल चे वास्तवातले वडील तो आचारी आला
"जी महाराज बोलावलं "
"काय हे चंपक एव्हडी खारट खीर कोण करत ""
"नाही महाराज खीर कशी खारट असेल मी चाखली होती गोड होती ""
"चंपक म्हणजे तुला वाटते मी खोटं बोलतो "
"नाही महाराज खरंच "
"चंपक चंपक "अशी आरोळी जेठालाल ने राजाच्या वेशात दिली खरी पण तिथून जेठालाल से वडील पळत आले आणि सटकन एक गालावर बसवली तसे जेठालाल चे डोळे उघडले त्याच्यासमोर त्याचे वडील रागात उभे होते ते पाहतच आपण केलेल्या कृतीचा हलकासा अंदाज त्याला आला तो सरळ उठला आणि आत तयार होण्यासाठी गेला.
