स्वातंत्र्य
स्वातंत्र्य
स्वातंत्र्याचा करू जयजयकार, परी स्वातंत्र्याची व्याख्या नेमकी काय ? विद्रोहाचा नारा लावत, स्वातंत्र्य कुणाला गवसले काय?स्वातंत्र्य मिळाले भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून सुटला का प्रत्येक भारतीय त्यांच्या वैचारिक बेडीतून?आजही प्रत्येक बालक इंग्रजी मध्येच शिकतो आहे नोकरी करण्यासाठी पुन्हा इंग्लंड अमेरिकेत धावतो आहे मुलगी शिकली ,प्रगती झाली ; सासुरवासाची बेडी तुटली कुटुंबाची बंधने झुगारून, नोकरीच्या पाशात सीमटली निवृत्तीची स्वप्ने रंगवत, नोकरीचा कोलू फिरवला गरगरा पेन्शन, प्राॅव्हिडंट फंड, हेच स्वातंत्र्याचे प्रतिक समज जरा निवृत्ती नंतरही मिळाले का स्वातंत्र्य कुणाला समाजाच्या चौकटीतून सुटून, लावे का कुणी आयुष्य पणाला स्त्री-पुरुष, मुलगा-मुलगी, लिंगभेद हे हवे कशाला मानसिकता गुलामीची जर, स्वातंत्र्याचे स्तोम कशाला स्वातंत्र्य जर हवे खरे तर, विचारांचे तोडा बंधनमानवतेची कास धरून ह्या पृथ्वीचे घडवा नंदनवन
