सुनसान रास्ता आणि मी
सुनसान रास्ता आणि मी


एक खरा अनुभवाचे वर्णन करीत आहे. भावाच्या लग्नसमारंभा निमित्ताने मी माझ्या मामाच्या गावी गेलो होतो तसे अंतर हे फक्त १६ किमी. पाहिले तर ३०मिनिटे खूप झाली पोहचण्यासाठी कधी कधी ४५ मिनिटे.
तसा पूर्ण रोड हा एक पदरी त्यामुळे समोरून एक वाहन आणी आपल्या बाजूने एक वाहन इतकीच जागा असायची. समोरून एकदा मोठा ट्रक आला तर दुचाकी वाला ही खूप वेळा रोड च्या खालून चालत असे. रोडच्या दोघींना बाजूने घनदाट झाडे, झुडपे. ती जुनी झाडे इतकी उंच होती जणू आकाशाला जाऊन भेटतील पण ती वर जाताना अशीच वर गेली न्हवती तर ती इकडून तिकडून पसरत गेली होती. एका बाजूचे झाड हे दुसऱ्या बाजूच्या झाला येऊन मिळाले होते जणू हे दोघे प्रियसी आणि प्रियकर जसे घट्टमिठी मारतात जणू तसेच. दिवसाचा हा नजरा पहिला तर वाटेल की तुम्ही झाडांच्या बोगद्यातून चालले आहात. कडक उन्हाची किरणे आणि पावसाच्या सरी जरी आल्या तरी त्या जमिनीवर खूप कमी प्रमाणात यायचे करण या अफाट पसरलेल्या झाडांन च्या फांद्यांमुळे. अत्ता झाड आले म्हणजे झाडावर पक्षी, प्राणी आलेच निरनिराळ्या तरेचे पक्षी आणि प्राणी असायचे याच झाडावर. रोड तसा तो इतका चांगला न्हवता कारण खूप सारे खड्डे पडले होते असा हा कर्नाटक आणि महाराष्ट्र ला जोडणारा रोड.
त्या दिवशी मी माज्या भावाच्या लग्नाची वरात उरकून रात्री ३-३.३० वाजतच्या सुमारास तिकडून निघालो. माज्या कडे यामाहा RX१०० ही गाडी होती तिचा आवाज म्हणजे ३-४किमी पर्यंत पसरणारा. जसा मी मामाचे गाव सोडून पुढे आलो दोन्ही बाजूने शेती आणि शेता मध्ये डोक्या एवढा उंच ऊस. जिकडे पाहावे तिकडे काळोख आणि शेती इतक्या रात्री त्या रोड वर मी एकटाच वाटसरू. थोड्या धीराने पुढे येत राहिलो येता येता नदी जवळ आली आणि इथे येताच मला नदीवर दिसले की कोठून तरी धूर येत आहे काही वेळा साठी माज्या पोटा मध्ये गोळा आला. तरीही मी घाबरत घाबरत गाडीवरून त्या नदीच्या दिशेने पुढे निघालो जसा काय त्या नदीच्या पुलावर चढणार तेवढ्यात माज्या गाडी समोर एक कुत्रे आले ते कुठून आले मला काहीच समजले नाही मी भीती पोटी ओरडून काचं कंन गाडीचे दोन्ही ब्रेक लावले आणि जागेला गाडी थांबली. जशी काय गाडी थांबली माझे हात पाय लातपटायला लागले समोर दिसणारा धूर आणि अचानक आडवे आलेले कुत्रे पाहून. तसाच कसा बसा गाडीची किक मारून गाडी पुन्हा सुरू केली आणि नदीच्या पुलावर चढलो. रात्रीची वेळ असल्या मुळे रस्त्यावर कोणीच न्हवते फक्त मी आणि माझी गाडी मला साथ देण्यासाठी माज्या कडे फक्त आणि फक्त होती ती गाडी आणि तिचा तो भन्नाट आवाज. तसाच पुढे निघालो पोहचलो ते म्हणजे तो धूर येत होता त्या ठिकाणी पाहतो तर काय तिथे गावातील कोणी तर मेलेले जनावर आणून पेटून दिले होते त्याचा धूर येत होता. कसाबसा तिथून निघायचा प्रयत्न करत होतो तेवढ्यात काही कुत्र्याच्या टोळीने माज्यावर हल्ला केला.
जसे ते माझ्या जवळ येताना पाहिले तसे मी गाडीचा स्पीड वाढवला आणि भुर्रर्रकंन निघून पुढे गेलो. नदीचा पूल तर सुखरूप पार झाला अत्ता थोडा तरी मोकळा स्वास घ्यावा तोवर पुढे जाताना माज्या गाडीच्या आडवे काही तर गेले. त्याचे स्पीड इतके होते मला काहीच दिसले नाही क्षणभर वाटले की गाडीच्या चाकामध्ये आले आणि मी नक्की घसरून पडणार. पण त्याचा स्पीड खूप होते आणि ते समोरून निघून गेले पुढे जाऊन ते एका मोकळ्या रानात उभे राहून पाहत होते मी गाडी थंबवली त्याच्या दिशेने गाडीच लाईट सोडला आणि पाहतो तर काय एक छान गोंडस पांढऱ्या रंगाचा ससा सुनसान रोड वरून मला चकमा देऊन गेला होता. मनातल्या मनात हसलो आणि पुढे निघून गेलो.
काही किमी अंतर स्वतः जोरजोरात गाणी म्हणत कधी कापले समजलेच नाही. पुढचा येणारा रोड हा थोडा खडतर आहे ते आधीपासूनच माहीत होते. दोन्ही बाजूने घनदाट झाडी, झाडे असल्या मुळे रोड वर खूपच अंधार घुडुप होताच सोबत त्या रात्रीच्या किड्यांचा तो जोराचा कर्कश आवाज येत होताच त्यात अधून मधून एकदा पक्षी तोंड वर करून जोरात किंचाळत होताच. सगळ वातावरण बघून मला तर घामच फुटला तो सुनसान रोड त्यावर मी एकटाच आजूबाजूने हे वातावरण असे समोरून ही कोणती गाडी येत न्हवती. भीती तर इतकी वाटत होती की काही विचारु नाका तसा तो रोड माज्या साठी नवीन न्हवता पण ज्या वेळी मी जात होतो ती वेळ वेगळी होती.
मनात देवाचे नाव घेतले आणि जोरजोराने गाणी म्हणत पुढे निघालो. जसा पुढे जाईल तसा काळोख वाढतच होता आणि तो त्या रात किड्यांचा किर्र असा आवाज अंगावर शहारे यांचे. डाव्या बाजूला पहले तर फक्त काळा कुट्ट अंधार दिसायचा फारतर फार एकादे झाड दिसायचे उजव्या बाजूने पाहिजे तरी तसेच शेती, पीक, झाडे, झुडपे, अंधार बाकी काहीच नाही. मनाला तसाच धीर देत देत पुढे निघत होतो भीती याची होती की एकदा जंगली प्राणी पाठी लागू नये.
त्यावेळी आणखी एक अनुभव मला आला तो म्हणजे आपण लहानपनी ऐकले होते की या झाडाच्या खालून सायकल किंवा गाडी घेऊन जाताना पाठी नकळत कोणी तर येऊन बसते आणि ते वाहन पुढे जाण्यासाठी जड होते असाच काहीसा अनुभव मी तेव्हा घेतला.
पुढे एक गाव आले तिथे मी ५ मिनिटे रोडच्या बाजूला लाईट च्या खांबाखाली थांबलो तेवढ्यात पाठीमागून एक ट्रक येताना दिसला मग काय असे वाटले जणू देवानेच आपल्या मदती साठी पाठवला आहे आणि पुढचा प्रवास हा मी त्या ट्रकच्या पाठी-पाठी राहून त्याच्या उजेडात केला. जसे डोळ्यासमोर गावाची वेश दिसली तेव्हा कुठे माझ्या जिवंत जीव आला आणि घरी जाऊन चिडीचूप गप्प गुमाणे झोपी गेलो.
१६ किमी अंतर जाण्यासाठी मला दीड तास लागले आणि ते समजलेही नाही..असा हा एक सुनसान रोडवरील खराखुरा अनुभव.