सुनेचे स्थान
सुनेचे स्थान


"कधी बदलणार मुलींची परिस्थिती आणि कधी मिळणार त्यांना मान आणि आदर? बर झालं मी लग्नंच केलं नाहीये अजून, आणि असं, मैत्रीणींकडुन त्यांचे वाईट अनुभव ऐकून तर नकोच वाटतं. अगं काय झालं दीप्ती ? आई अग हया, स्वताही एका बाईच्या जन्माला येऊन, असं एवढं निष्ठुर कसं ,काय ग वागू शकतात? आणि स्वता वाईट वागणूक देऊन वरून त्यांनी म्हातारपणी छान सांभाळाव , अशी अपेक्षा कशी ग करू शकतात ? अच्छा असं आहे तर, आज कोणत्या मैञिणीला दुखावलय तिच्या सासुने? आई सुमीचा फोन आलेला, खुप दुखावलय तिला तिच्या सासुने.खुप रडत होती आणि ती अमनला त्याच्या आईचे , तो गेल्यावर जे ती सुमी बरोबर वागते, ते प्रताप सांगत नाही ना त्याचाच फायदा उचलते तीची सासु! आई अग उठसूठ सुमीच अख्खं खानदान बाहेर काढते आणि तुझ्या बापाच्या घरून नाही आणलंयस सगळं अशी टोमणे मारते, प्रत्येक गोष्टीत ढवळाढवळ, आणि आई सुमीला भुक लागली आणि तिने न विचारता खाल्लं की अश्या वागणार ना, की सुमीने काही चुकीचं काम केलं आणि खाऊन काम कराव त्याची पण सोय नाही, कामं पडली आहेत, खायला घेतलंस आधी ? असं ऐकवणार, सुमीच्या हातातला घास ताटातच राहतो, आई आणि डोळ्यांत पाणी. मग सुमी सकाळी 6-11.30 कामं आटोपून सर्वात शेवटी खाते, स्वतः च्या तब्बेतीकडे साफ दुर्लक्ष केलं तिने, हया चा परिणाम तिची संरक्षण प्रणाली पार कोलमडली आणि तिला क्षयरोग झाला त्यात पण ही बाई आमच्या खानदानात कोणाला नाही झाला असे टोमणे मारते, आणि दुसरी सासु असती तर, मुलाला सांगून रस्त्यावर फेकलं असतं म्हणे ,काय सोनं लागलंय का त्यांच्या खानदानाला, नावाचं मोठ घर आणि पोकळ वासा, आणी विचार तरी बघ हयांचे, तिला एक अख्खं फळ खायची चोरी, दुध प्यायची चोरी , एकदा दुध संपल तर काय हाहाकार केला हया बाईने सांगू, दिसते वरून भोळी पण एक नंबरची लबाड बाई आहे, मुलासमोर एक वागते आणि सुमीसमोर दुसरंच, वर नाटकं कसली करते, तु बघशील ना आई पुरस्कार देशिल तिला. अगं पुरे दिप्ती किती तापमान वाढलं आहे तुझं, नाकाचा शेंडा लाल झाला आहे बघ केवढा! काय ग आई तु चेष्टा करतेस माझी, मी तुला एवढं गंभीर प्रकरण सांगितेय आणि तू? आई......? हम् बोल ! आई ऐक ना गं? ऐकतेय मी दिप्ती आणि तु तेच बोलणार असशील, मला पाठ झालेत हो ते संवाद, थांब बोलून दाखवतेच, चेक इट आऊट, " आई, दादाच लवकरच लग्न होणार आहे, वचन दे तु तिलाही माझ्या आणि दादा सारखं वागवशिल, खाण्यावर किंवा अन्य गोष्टींवर उगाचच बंधनं लावणार नाहीस, तिला तिचं छान जगु दे,हव ते करू दे, उगाचच सल्ले देत बसू नकोस शेवटी तीने समंजस झाल्यावरच लग्नाचा निर्णय घेतला आहे, सुनेला नाव ठेवण्याचे प्रकार नको, " आई पुरे पुरे, फक्त एवढंच सांगेन, " सुनही एक स्वतंत्र व्यक्ती असते, तिला प्रत्येक गोष्टीत निर्णय घ्यायचा अधिकार आहे, जसं तु तुझ्या संसारासाठी केलंस, तिलाही तिचे हक्क तु दिलेच पाहिजे, त्यात कधिही ढवळाढवळ करू नकोस " आणि तू तिला तिची स्पेस आणि आदर दिलास ना की तिच्या कडून तुला ते दुप्पट मिळेल " पण तु कुठल्याही कारणाने वाईट वागलिस तर तुही अपेक्षा नाहीच ठेवायची अगदी संस्कारांच्या नावाखाली सुध्दा नको, " हो ग, कळत मला, प्राॅमिस ! आणि बर का दिप्ती, सगळया सासवा अश्या नसतात बरं,आणि हे ही खरंच की सगळया सुना आणि सासवा वाईट नसतात पण तरीसुद्धा त्यांच्या नावाने ओरड होतेच,सासु सुध्दा सुनच होती किंवा आहे, स्वतःही ती बाहेरूनच आलेली असते ,आणि तिने ही तिच्या वडिलांच्या घरून सगळंच आणलेलं नसत, मग ती जशी लग्न करून आलेल्या घराला आपलं मानते तसेच सुनही आपलं मानते, मग हे असं ती बाहेरून आली आहे बोलणंच चुकीचं आहे, काही सुनाही निट वागत नाहीत अशी अफवा असते ,पण ह्याचं कारण ही नवीन सुन घरात आल्यावर तिला कोणतीही सासु कशी वागणूक देते त्यावरच असते. हो ना आई,म्हणुनच तुला सांगत असते .आई, सासु हो पण एक चांगली सासु,हो मग तुझी सुनही तुला चांगलीच वागणूक देईल. आदर द्या आणि आदर घ्या, " ठीक आहे, दिप्ती माते, असंच वागेन मी, शेवटी ती पण कोणाची मुलगीच आहे, तुझ्यासारखी, लाडाकोडात वाढलेली.आणि तिचं दोन्ही घरात हक्काच असं एक स्थान आहे,जे तिलाचं मिळायला हवं," आई तथास्तु! धन्य झाले मी दिप्ती माते धन्य झाले, तुझ्यासारखी मुलगी मिळाली मला आणि हो, "चांगलीच सासु मिळु दे माझ्या मुलीला," आई ऽऽऽऽऽऽऽ...............