स्त्री... महत्व 'ती' चं
स्त्री... महत्व 'ती' चं
स्त्री म्हणजे नक्की कोण हो??
She is a Woman, she is a Mother, she is a Daughter, she is a Wife, she is a Sister.
स्त्री म्हणजे नक्की कोण हो? आई, आजी, बायको, आत्या, मामी, काकू, मावशी, ताई, गर्लफ्रेंड, जवळची किंवा बेस्ट friend असे म्हणता येईल का, हे ना!! (A women is a female human being.) हे आजकालच्या शिकलेल्या लोकांच स्पष्ट उत्तर. पण आधीच्या किंवा प्राचीन लोकांचे म्हणण्याप्रमाणे तर स्त्री म्हणजे - " स्त्री म्हणजे कुटुंबातील एक अविभाज्य घटक, अनेक नाती, अनेक जबाबदाऱ्या रोज पार पडणारी."
पण असा विचार केलाय का कधी की स्त्री नसती तर ...? "स्त्री विना आयुष्याचा विचार केला तर सगळे शून्य आहे." असे मी तर ऐकलंय आणि मला हे पटतंय सुद्धा. तुम्हाला पटतंय का नक्की सांगा? तुम्हाला पण असे खरच वाटतं का हो? मी ह्या लेखात माझ्या मतांनुसार मत मांडत आहे. ह्यात तुम्हाला नकळत जर दुखावले असेल तर नक्की कळवा . माझी चूक मला नक्की सांगा. प्रत्येक स्त्री च्या विषयी मत सांगणार आहे. त्यांचे आपल्या आयुष्यात किती महत्व किंवा स्थान आहे ते.
आई - माझ्या मते आई म्हणजे : आई या दोन शब्दांचं इतके महत्व आहे आपल्या आयुष्यात कि सांगता येणार नाही,कारण हे फक्त शब्द नाहीयेत तर आपले आयुष्य आहे. आई म्हणजे ती जिने फक्त जन्मचं नाही तर हे आयुष्य दिलं हे विश्व दाखवले आपल्याला. जरा किंमत किंवा तुमच्या भाषेत respect देयला शिका तिला. 9 महिने ती तिच्या पोटात तुम्हाला(आपल्याला) ठेवती. माहितेय का की नऊ महिने पोटात ठेवणे म्हणजे किती काय काय सहन करायला लागत. पोटात 9 महिने वाघावणे म्हणजे काय चेष्टा वाटती का हो तुम्हाला? नसेल माहीत तर खरोखरच एकदा तुमच्या आईला विचारा. निदान त्या तिच्या उत्तराने का होईना , तिची जरा कदर, काळजी, इज्जत द्याल तिला. जो वेळ त्या नसत्या लोकांना जसे की गर्लफ्रेंड / बॉयफ्रेंड ला देता तो वेळ इकडे द्या जरा आईला. नंतर आहेच की सगळं.!!
काळ बदलतोय तसं आईबाबांसोबत चे जे संबंध आहे आजच्या मुलामुलींचे तेही बदलताना दिसत आहे,तो आदर ती नम्रता ह्या गोष्टींची कमतरता भासायला लागली आहे असं वाटतं. जसे जसे मुलंमुली मोठे होत चालले आहे तसं आईबाबांच्या सोबतचे ते बोलणं बसणं कमी होत जातं,जे निर्णय घेयचे असतात मुलामुलींना ते जवळच्या मित्रांना ते सांगणं योग्य त्यांना वाटतं पण आईबाबांना नाही का? तर ते बोलतील रागावतील त्यांना त्यातलं काही कळत नाही अशी आजच्या मुलामुलींची स्थिती होत चालली आहे,आणि यातच आईबाबांचे महत्व आपण विसरत चाललोय असं वाटतं.??
आपल्यापेक्षा जास्त पावसाळे त्यांनी पाहिले काय योग्य काय नाही हे त्यांना चांगलं माहित असते तरी आज आपण त्यांना बोलू देत नाही,बोलले तर त्याचा आपल्याला त्रास वाटतो सहन होत नाही,कारण बदलत्या वेळेनुसार आपणही बद्दलो आणि त्यांचा त्रास होतो. ह्या गोष्टी आई बद्दल तरी carefully घ्या. कुणीही कितीही जवळच असला तरी ही आई ती आईच असती. तिची जागा कुणीच नाही घेऊ शकत. अगदी बायको, पण नाही बर का?
आणि त्यात ती एक स्त्री आहे .
आजी, आत्या,मामी,मावशी, काकू - माझ्या मता नुसार हे सगळे म्हणजे : फक्त सणासुदीलाच नाही तर जीवनातील प्रत्येक क्षणांमध्ये , प्रत्येक चांगल्या गोष्टी सांगत असतात, त्यांना पण मान सन्मान हा मिळायलाच हवा. ती पण आई च्या वेशात कोणाचीतरी आईच असते. भले ते आपल्याला आई सारखी माया किंवा प्रेम नाही देऊ शकत, तरी त्यांचा आदर ठेवा, इज्जत द्या, भले ती सावत्र, कठोर,रागीट, खडूस का असे न, तिला पण तोच हक्क, तेच प्रेम , आदर द्या करण ती पण एक स्त्री आहे.
(मी जे पण लिहणार ते स्पष्ट लिहीन , कुणीही गैरसमज करून घेऊ नका,, जे आहे ते सत्य मांडेन)
बायको- माझ्या मते बायको म्हणजे : बायको घरीच असते म्हणून तिच्या कुठल्याच गोष्टीची किंमत नसते आपल्याला. तिच्या वेळेची, आवडी-निवडीची, तिच्या दिसण्याचीच काय तिच्या अस्तित्वाचीही पर्वा नसते. एवढं होऊनही कधी कुरबुर नसते तिची.
पण, काहींच्या नजरेत बायको म्हणजे थोड्यात त्यांच्यासाठी काम वाली. हा मुद्दा भले राग येण्या सारखा आहे, पण कबर आहे. मी असे नाही म्हणत की सगळेच पुरुष तसे असतात पण, 100% मधून 80% मुलं, किंवा पुरुष हे असाच घाणेरडा विचार करणारे असतात.
जी आपली इतकी काळजी घेते, आपल्यासाठी आयुष्य वेचते तिच्याकडे सगळ्यात जास्त दुर्लक्ष करतात. जी आपले सगळे घर, आई बाप, परिवार सोडून तुमच्या कडे तुमच्या घरच्यांना संबळायला येती, तिला तुम्ही किती हो किंमत देता? निदान 2% तरी?? ती काय फक्त आपल्यासोबत लग्न करायला, पहिल्या रात्री सेक्स किंवा physical attraction साठी, मुलांना जन्म देण्यासाठी, तुमचं घर सांभाळण्यासाठी नसती आलेली. तिला तुमच्या कडून, किंवा परिवाराकडून काहीतरी तिच्याशी चांगले वागण्याची इच्छा असते. म्हणून जर ,खरच तुम्ही आईला मानत असाल, तर आणि तरच बायकोला किंमत, इज्जत द्यायला शिका.
तिच्याशी नातं जपताना, त्याला तुमची इच्छा बनवा, गरज नको. हे मी एवढेच सांगू शकते. जर तुम्ही चुकत असाल तर लवकर जागे व्हा आणि तिला इज्जत द्या, जसे तुम्ही तुमच्या आईला देत न उलटं बोलून,. करण तीसुद्धा एक नारी/ स्त्री आहे. गर्लफ्रेंड कशीही असली तरीही चालते , पण बायको ही मात्र virgin लागते. आहेत दोघीही स्त्रियाच पण , दोघींमध्ये एवढी तुलना का बरं?
गर्लफ्रेंड - life मध्ये gf म्हणजे : आजकालच्या मुलांचा dialogue "तिला पाहिले की असे काही होऊन जातं ना राव, काहीच कळत नाही, दिल धक धक करता हैं यार". थोडक्यात काय तर हे त्यांचे ब्रीदवाक्य. मला एक काळात नाही gf ची खरच एवढी गरज असते का आपल्या life मध्ये.? एक एक मुले तर एवढी येडी असतात ह्या बाबतीत की तिला एकदा जरी पाहिले तरी, काय म्हणे तर तिला मला लय आवडती. मला ती gf म्हणून पाहिजे लका!
एवढे सोपे असतं का gf बनवणं, तिला हवतसे बाहुली सारखे वागवणे, ती नाही म्हणाली तर नाय ते प्रयोग करणे (जसे की पेट्रोल ओतणे, acid हल्ला करणे, rape करणे), लाज काशी वाटत नाहीये हो ह्या नीच मुलांना.
नक्की प्रेम म्हणजे काय ? हे तरी माहीत आहे का? प्रेम कोणत्या क्षणाला आणि कुठे होते ह्याचा थांगपत्ता प्रेमकरणाऱ्याला पण लागत नाही, हे म्हणजे प्रेम (its true love). प्रेम हे शाळेत गेल्यावर, bus stop वर होते, फेसबुक वर होते, social media वर होते,काही प्रेमवेड्यांना तर असेही वाटतं की कॉलेज फक्त प्रेम करण्यासाठीच असते.😶 प्रेम हे पहिल्याच क्षणात नजरानजर झाल्यावर सुद्धा होते. कधीही नकळत होऊन जातं. कॉलेज मधून खिडकीत बसून ,अगदी class मध्ये 1st एन्ट्री केल्यावर, आपले notes share करताना, तर एकमेकांना मदत करण्यातूनही प्रेम होते. किती छान ना !!! ते होऊन जातं मग कळतं आपण त्या व्यक्तीच्या प्रेमात पडलोय ते. हे मात्र 100%खरोखरच आहे की "प्रेम हे कधीच ठरवून होत नाही."
प्रेम हे जात, धर्म, श्रीमंत, गरीब, काळा, गोरा रंग बघून होत नसतो,.... ते एक हृदयाने दुसऱ्या हृदयावर होत असते.
पण,,,,,,,
काहींचा प्रेमाविषयी खूप मोठा गैरसमज असतो तो म्हणजे की - एखाद्या मुलीने/मुलाने तुमच्या प्रेमाला नकार दिला तर ऍसिड, पेट्रोल टाकणे, मित्रांना ग्रुप मध्ये घेऊन rape करणे,मानसिक त्रास देने अशे निर्लज्जसारखे घाणेरडे कृत्य करतात. इथे कुठे केले तुमचे प्रेम मग?? ह्याला नाही माहीत true love किंवा प्रेम वगैरे. ह्याला नालायकपणा म्हणतात.
जर तुम्ही खरच मनापासून प्रेम करत असाल तर त्या आवडत्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या स्वप्नातही त्रास देऊ शकत नाही. कारण प्रेमात पडल्यावर फक्त प्रेमच सुचतं व प्रेम प्रेम करायला शिकवत असते, ते तुमच्या आवडत्या व्यक्तीचा तिरस्कार करायला शिकवत नसतं.
एक एक दीडशहाने असे असतात की नाही असे उत्तर आलं जर पुढच्या कडून तर काय म्हणे, हातच कापुन घेतात, suicide करतात, जीव देतात,.. असले प्रताप कसे सुचतात हो ह्यांना??🤔, आणि एकएक तर फक्त physical relationship ठेवण्यात interest असतात.देव करो आणि ह्यांना बुद्धी देवो. कसे व्हायचं ह्या जगाचे कोणास ठाऊक........ !!! तुम्ही तुमच्या gf ला पण jara किंमत द्याल शिका. प्रेम खरोखरच करण्याची ताकद असेल तरच प्रेम करा आणि शेवट पर्यंत निभवा. आर्ध्यारस्त्यात टाकून नका निघू. नाहीतर तो मात्र 'प्रेम' ह्या चॅन शब्दहाचा अपमान करताय, हे लक्षात असू द्या. तिला पण तोच सन्मान, तीच माया,तेच प्रेम द्या करण तीही एक स्त्री आहे!!!
(Don't just use & throw her for your own need, otherwise no need to love her anymore.)
बेस्ट friend - ची गरज आणि महत्व : मैत्री म्हणजे नक्की काय हे 4-5 शब्दात सांगता येत नाही. जिवलग मित्र/ मैत्रीण हे नशिबानेच मिळू शकतात. इतर कोणत्याही नात्यापेक्षा बेस्ट friend खूप चांगले आणि जवळच नातं असते. बेस्ट फफ्रेंड म्हणजे कोण हो तुमच्या मते? "best friend म्हणजे जो आपल्या सुखात आणि दुःखात ही सोबत असतो. बेस्ट फ्रेंड ची खरी परीक्षा/कसोटी संकटाच्या वेळी होत किंवा येत असते." ह्या म्हणतात best फ्रेंड. best friends हे आपल्या मैत्रीसाठी कोणताही त्याग करू शकतो/ शकते. स्वतःचाच काम बाजूला ठेवून तुम्हाला वेळ देणारे ह्याला म्हणतात खरी मैत्री किंवा best फ्रेंड्स.
ज्या व्यक्तीला असे best friends भेटले तेच भाग्यवानच!! ज्याच्या जवळ मनातील भावना व्यक्त करताना संकोच वाटत नाही, खोटं बोलावसं वाटत नाही, फसवावसे वाटत नाही,,, तेच आपले best friend. मैत्री हा एक असा दागिना आहे, जो आहे तो सगळ्यांकडे दिसतो पण जाणवत नाही. म्हणून कृपया करून अशी " मैत्री करा जी दिसली नाही तरी चालेल पण, जाणवली पाहिजे."
{"मैत्री" म्हणजे काय?
एक छानसं उत्तर.......
- तुम्ही समोरच्याच्या मनाची काळजी तुमच्या
मानापेक्षा जास्त घेता.
याची जाणीव म्हणजेच
("Maitri")..."}
म्हणून तिच्या वर पण कधीच राग राग, हक्क गाजवू नका. तिचा पण सन्मान करायला ऐहिक, करण ती सुद्धा एक स्त्रीचीच जात आहे.!!!
हे एवढे सांगण्याचा एकाच उद्देश म्हणजे स्त्रियांचा आदर, सन्मान करायला शिका भले ती तुमची किंवा कोणाची आई, बायको, बहीण, आजी, काकू, मामी, मावशी, आत्या किंवा friend, gf ही असू दे. आणि एक गोष्ट सांगायचंय तर तिचं अपमान नको तर काळजी घायला शिका. ते खूप गरजेचं आहे. तुम्हाला काय माहीत हो मुलीच्या, किंवा स्त्रियांच्या दुःखद गोष्टी? कधी विचार केलाय का कधी तिला काय होतंय, बारी आहे का ? मी फक्त बायको, gf च नाही बोलतेय संपूर्ण देशातील स्त्रिया कोणत्या गोष्टी सोसतात??
तिनं काय काय ,कुठवर, आणि का सोसायचं हो? म्हणजे बघा ना - (सेक्सच्या वेळी, pregnancy मध्ये, rape होतात तेव्हा, main म्हणजे पाळी येतात तेव्हा.) ह्यासगळ्या गोष्टींना ती काहीही न म्हणता सगळे सोसतं. ह्याचा कधी विचार केलाय?? तुम्ही जर स्त्री असता तर, केला असते का तुम्ही एवढे सगळं सहन ?? नाही ना , मग निदान तिची छोट्या बाळासारखं काळजी घ्या.
🙏 Please, RESPECT FEMALES!! 🙏
main म्हणजे -( तिच्या त्या 5 दिवसांसाठी तिची care करा!!!) ,,🙏👇
*** स्त्रियांचे ते 5 दिवस ***
अरे, त्या पाच दिवसात तिला खूप म्हणजे खूप त्रास होत असतो. तुम्ही कल्पना ही नाही करू शकत एवढं!. कधी कधी तरी ती रडती पण. नक्कीच त्या 5 दिवसात तिची खूप चिडचिड होत असते पण , तिला आजपर्यंत आई बाबा जसे समजून घेत आलेत तसेच तिला अपेक्षा असते की तुम्हीही तिला आमजून घ्यावं.
सोपं नसतं एवढे रक्त जात असतानाही , ती स्वतःला सावरून सगळे काही करत असते. जरा विचार करा की, जरा आपलं बोट कापलं रक्त आलं तर किती त्रास होतो, हे तर काहीच नाही पण तिला किती हो त्रास होत असेल ? तिचं तर 5 दिवस रक्तस्त्राव होत असतो त्याचे काय ? , मग तिला किती सहन करावा लागत असेल ?.
देवानेच बनवली आहे ही रीत त्यामुळे अश्यावेळी तुम्ही तिला समजून घेणं ज्यास्त गरजेचं आहे. भले ती तुमची बायको, बहीण, best friend का असे न ,,, कळलं??? may be कळलं असेल. सर्वांनी तिला त्या 5 दिवसांसाठी का होईना मदत करा , तिलाच बरं वाटेल. तिला समजून घ्या, तिच्या च्या वर बिलकुल चिडू नका....
