अद्भुत कोकणातील विहीर...
अद्भुत कोकणातील विहीर...
" ही घटना माझ्या सोबत आणि माझ्या मित्र-मैत्रिणी सोबत घडलेली आहे ,कोकणात . मी तेव्हा 8वी मध्ये होते, आणि माझे काही मित्र- मैत्रिणी 8 वी - 9-10 वी त असतील,आमच्या शेजारी एक काका राहायचे.पेशाने जरी ब्राम्हण असलेतरी पूजापाठ पेक्षा जरा वेगळ्याच कारणासाठी ओळखले जायचे …ते म्हणजे Black Magic … पण कुणाच धाडस ही होत नव्हता आणि कोणी वाटेला पण जात नसत त्यांच्या कधी .आम्ही फक्त आजी कडून ऐकायचो पण नक्की काय ते कोणालाच माहित नव्हता ,फक्त काहीतरी विचित्र आणि भयानक आहे एवढच माहित होत….काकांची पर्सनॅलिटी ही तशी गूढ होती , कोणाशीही क्वचितच बोलत असत , गावाबाहेर त्यांची शेती आणि जुन्या पद्धतीची टिपिकल अशी दगडाची विहीर होती त्याला भरव असे म्हणतात ..संध्याकाळी ६ नंतर तिथे कोणीच फिरकत नसे .
लोकं म्हणायचे तिथे एका अदृश्य शक्तीचे वास्तव्य आहे आणि बऱ्याच लोकांना त्याचा प्रत्ययही आला होता , पण आम्हाला हे सगळ भंकस वाटत होत ,परंतु प्रत्येक अमावस्या न पौर्णिमेला काका मात्र न चुकता त्या शेतामध्ये आणि विहिरी कडे जायचे , त्यामुळे आम्हाला उत्सुकता होती नक्की हा
माणूस काय आहे ?, आतापर्यंत जे धाडस कोणी केले नव्हतेते आम्ही करणार होतो ...
" ते म्हणतात ना अज्ञानात सुख असतेते ह्या घटनेतून समजले " . तेव्हा उन्हाळ्याची सुट्टी चालू होत्या… ती रात्र आमावस्येची होती . रात्रीचे १०.३०झाले होते , अश्याच गप्पा रंगल्या होत्या , त्यावेळी किरण दादा आमच्यामध्ये सगळ्यात मोठा म्हणून तोच आमचा लीडर , तो अचानक बोलला आज काकांवर नजर ठेवायची आणि त्यांना फौलो करायचे. बाकीच्यांची लय टरकली, पण मी जाम उत्साहीत झाले होते….तश्यापन सुट्ट्या चालू असल्यामुळे आम्ही गच्चीवर झोपत असू त्यामुळे कधीही जा काही अडचण नव्हती कोणालाच .गप्पा मारता मारता १२ वाजले . तसे आम्ही सगळे सावध झालो , काका अजून तरी बाहेर पडले नव्हते ,पण १० -१५ minute मधेच काका बाहेर पडले एक मोठी पांढरी पिशवी घेऊन .किरण दादा , मी आणि 5 मित्र-मैत्रिणी हळू त्यांना फॅलो करत होतो …. जस जस शेत जवळ येऊ लागले तशी एक मनात हूर हूर आणि भीती सगळ्यानाच वाटायला लागली , वातावरणात पण जणू अचानक बदल जाणवत होता …काका शेतात पोहोचले पाठोपाठ आम्हीही पोहोचलो .काका विहिरीच्या पायऱ्या उतरून खाली गेले , विहीर खूप मोठी होती साहजिकच विहिरी जवळ भरपूर झाडी होती त्यामुळे आम्ही वरून लपून पुढे काय घडतंय ते पाहू लागलो एकदम जपून ..काकांनी नंतर सोबत आणलेल्या पिशवीतून लाल रंगाचा पंचा काढून नेसला ,पूजेचा ताट , अगरबत्ती ,दिवा असेबरेच साहित्य काढले ,आणि मोठ्या पिशवीतून एक जुनी पेटी आणलेली त्या पेटीला समोर ठेऊन हळदी - कुंकू लाऊन पूजा करू लागले , प्रत्येक दर्शी ती पेटी खूपच जुनी आणि हळदी-कुंकू लाऊन बरबटून गेल्यासारखी दिसत होती , जणू हा माणूस कित्येक वर्षांपासून त्याची पूजा करत असावा .
आता मात्र त्या पेटीचे गूढ वाढू लागले आणि भीती पण वाढू लागली ,बघता बघता १ तास होऊन गेला जवळपास १.१५ झाला असेल ,काकांचे मंत्र सलग पणे चालू होते , परंतु जस जसा वेळ जात होता तसा मंत्रोच्चाराचा सूर आणि काकांच्या चेहऱ्यावरचा भाव दोन्ही बदलू लागले ,काका जरा विचित्र वागू लागले .तोंडावर अघोरी हास्य आणि विक्षिप्त हालचाली ,खूपच भयानक वाटत होत्या . हळू हळू घटनेचे गांभीर्य न इथे आल्याचा पश्चाताप जाणवू लागला , आम्ही काय करतोय तेच आम्हाला काळत नव्हते ना आम्हाला तिथून हलता येत होता ना तोंडातून शब्द फुटत होता ,जस काही कोणीतरी जबरदस्तीने थांबवून ठेवलाय तसच काहीसा झाला होता .काकानी हळदी कुंकू स्वताला लावले ,लावले काय चांगलेच फासले पूर्ण तोंडाला , दिव्याच्या प्रकाशात त्यांचा चेहरा खूपच भयानक झाला ,त्यांची हालचाली कमी झाल्या , ते शांत होऊ लागले आणि एकदम चेहऱ्यावर स्तब्धता आली , का कुणास ठाऊक मला वेगळाच भास झाला जणू फक्त देहानी काका तिथे आहेत कारण चेहऱ्यावर काहीच हालचाल नाही नजर एकदम शून्यआणि तो क्षण आला ज्याची आम्ही वाट पाहत होतो काकांची नजर त्या पेटी कडे गेली …आम्हाला का कुणास ठाऊक त्यांनी पेटी उघडू नये असे वाटत होते , परंतु त्यांनी ती उघडली त्यात एक लाल कपडा गुंडाळलेली कसलीतरी वस्तू होती , हळू हळू ते कपडा काढू लागले ,न जे काही दिसले ते पाहून आमची बोबडीच वळली , आयुष्यात पहिल्यांदा भीती काय असते ते अनुभवत होतो .त्यांनी कपड्याखाली एवढे वर्ष काय ठेवले न कशाची पूजा करत होते ते बघून आमचे डोळेच पांढरे झाले .-
ते एका बाई चे शरीर होते , एकदम ताजे जणू ती तासाभरापूर्वीच मेली असावी .काकांनी ते डोकं पुढ ठेवले न त्याची पूजा करू लागले ,तो चेहरा जरा ओळखीचा वाटत होता , तेवढ्यात किरण दादा ओरडला , " शिल्पा काकू !!😱" बाप रे... आता सगळे कळून चुकलेल,सगळी ताकद एकवटून आम्ही सुसाट पळालो …बाकीच्या पाच जण अगोदरच घरगाठले हे तिथे गेल्यावर समजले ….शिल्पा काकू ही काकांची पहिली बायको ,पहिल्या बाळंतपणात काकू वारली ,काकांनी परस्परच अंत्यसंस्कार केले असे ऐकीवात आले होते , त्यानंतर दुसरे लग्न झाले तरी काकांचा जीव त्यांच्यातच अडकला होता .
आता सगळ चित्र स्पष्ट झाला होता ,आम्ही त्या रात्री आप आपल्या घरी जाऊन झोपलो , माझ्याशिवाय सगळे तिथून ४दिवस अंथरुणाला खिळून होते ,कोणी बोलले डोक्यात ताप गेला आहे तरकोणी भूतबाधा ,पण आमच्यापैकी कोणीच खर काय ते कोणालाच सांगितले नाही ,तेवढी हिम्मत पण नाही झाली .अस बोलला जाता जी बाई बाळांतपणात मरते ती अतृप्त राहते .तिचे अस्तित्व ती वरचेवर जवळच्यांना जाणवून देते , फक्त नजर तशी पाहिजे , कदाचित काकांना ते कळाले असेल .आणि ते शरीर , त्याच्या उपयोगाने ते त्यांच्या ज्या काही काळ्या जादू आहेत त्या पूर्ण करत…तो आत्मा त्या पूर्ण करायला मदतकरतो .
यातलं किती खरं किती खोटं माहित नाही , ती जादू खरी कि खोटी ते काकांनाच माहित पण, त्या दिवसा पासून आम्ही मात्र काकांपासून जरा जपूनच राहू लागलो ,त्या घटनेला १२ वर्ष झाली तरी, सगळ कस लख्ख आठवते आहे ,आजही तो काकूंचा चेहरा माझ्या डोळ्यापुढूनजात नाही .किती जिवंत होत ते शरीर , जणू काही कुठल्याही क्षणी डोळे उघडून बोलायला सुरुवात करेल .कदाचित बोललेही असेल , पण ते पाहण्याची हिम्मत आणि इच्छा माझ्यात नव्हती .
शाळा सुरू झालेल्या म्हणून गावा बाहेर आलो म्हणजे पुण्याला ,पुला खालून बरेच पाणी गेला ,काळाबरोबर या कटू आठवणी हि विस्मृतीत गेल्या आणि भीती, गांभीर्य थोडे कमी झाले.गेल्या वर्षीच काका गेले , आणि असे बोलले जाते कि काका गेल्यापासून शेतात येणारे आवाज आणि दिसणाऱ्या चित्र विचित्रगोष्टी ,बाईची आकृती या सगळ्या गोष्टी बंद झाल्या , आणि त्याबरोबरच बंद झाले पुन्हा शेत पिकन आणि विहिरी मधला पाणी आजतागायत ,आज तिथे सर्व भकास आहे कदाचित काकांसाठी काकूचे अस्तित्व होता कि काकूंच्या अस्तित्वा साठी काकांची धडपड ,त्या अनामिक शक्तीलाच माहित आता घरी गेल्यावर आवर्जूनकाकांच्या घरी जातो , आज काकूंच्या फोटोबरोबर काकांचाही फोटो लागलाय...

