janvi khot

Crime Inspirational

2  

janvi khot

Crime Inspirational

कसलं हे जग? कसली ही माणसं??

कसलं हे जग? कसली ही माणसं??

10 mins
183


    ती 19 वर्षाची होती... करिअरसाठी पुण्यातून मुंबईत आली. निखळ डोळे आणि निखळ नजर होती तिच्याकडे. आज ते डोळे, ती नजर पूर्णपणे बदलली. ती तिचे ते पूर्वीचे निखळ डोळे शोधत राहते. ते पुन्हा मिळणार नाहीत हे माहीत असूनही. का बदलले असतील तिचे डोळे ? का हरवला असेल नझरेतला निखळ भाव ? का का का???😢


       त्या प्रश्नांची उत्तरे आहेत तिच्याकडे. तिला माहीत आहे की, अनुभवांनी, आजूबाजूच्या घटनांनी तिची ही नजर बदलली. तिचे डोळे बदलले. त्यामुळे ठरवून आणि प्रयत्नपूर्वक ही ती ते डोळे नाही आणू शकत परत !!!


         मुंबईत आली तेव्हा शाळेची मात्र शिस्त न्हवती, की शाळेच्या पोशाकच्या जरब न्हवती. विचार अगदी मोकळे होते. मन धुंद होतं. होस्टेलमध्ये राहत असल्यामुळे स्वतंत्र राहण्याचा आनंद साजरा करण्याचे दिवस होते ते. संध्याकाळी classes आटोपून हॉस्टेल वर परतताना मनात भीती किंवा एकटेपणाचा संकोच न्हवता. उलट रस्त्यावर उभं राहून धिंगाणा धिंगाणा आवाजाची रिक्षा येयीपर्यंतचा संयम होता तिच्याकडे. अश्या music च्या रिक्षमध्ये बसून जाताना जाम गंमत वाटायची तिला. हे ती पूर्वी वागू शकली. आता रिक्षात जाऊद्या, साधं स्वतःच्या गाडीत बसतानाही मनाला थोडी भीती शिवून जाते. आपण सुरक्षित पोहचू ना ह्याची चिंता वाटते.


           एकेकाळी मुक्त स्वछंद असणारी ती अशी का बरं वागत असेल ? खरं तर ह्याचं ही उत्तर तिच्याकडे आहे. त्यावेळी जगाचा अनुभव न्हवता. आता मात्र तो आला आहे. तेव्हा आजूबाजूचं ओळखीचं जग अस्वस्थ करायची नाही. आता आजूबाजूला घडणाऱ्या घटनांची मनात शंकेची पाल चुकचुकतेच..


           आज तिला अनेक गोष्टींचा राग येतो. पश्चात्तापही होतो. स्त्रीबद्दलचे गैरसमज चीड आणतात. आपणही असे काही गैरसमज आपल्यासोबतच्या स्त्रीवर लादलेच या विचारांनी जीव चडपडतो. लहानपणी आईवर निबंध लिहिण्याच्या स्पर्धेत भाग घेतला होता. देव बाप्पाला सगळीकडे पोहचता येत नाही म्हणून त्यानं आई या व्यक्तीला निर्माण केलं - असं वाक्य तिनं निबंधात लिहिलं होतं. त्या वाक्यानं तिला स्पर्धेत पाहिलं बक्षीस क्रमांक मिळवून दिलं. पण हेच वाक्य डोक्यात ठेवून वागताना ती बोलली-" मी आईवर दयवत्व लादलं आणि तिला बोलूच दिलं नाही ". किती चुकीचा होता तो विचार. आज अजूनही समाज स्त्रीला देवीची उपमा देऊन हीच चूक करतो आहे. इतकं की त्यामुळे आपल्या अन्यायावरही तिला बोलता येऊ नये.


         थांबवायला हवा हा दयवत्व देण्याचा उद्योग. देवाला आपण बोलू देतो का कधी ? आपण बोलतच राहतो. Wishes / इच्छा मागताच राहतो. आपण देवाला जे फुलं वाहू, जो नैवैद्य दाखवू, जी आरती गाऊ ती ऐकावीच लागतात. त्याला कुठे काही choice वगैरे देतो का ? नाही ना !! स्त्रीला दयवत्व देऊन तिच्याही बाबतीत हेच होत चाललं आहे ना ? नको ते दयवत्व !! स्त्री ही माणूस आहे ना? हो ना ?! तिला माणसासारखं राहुद्या ना मग! जगू द्या तिला तिचं स्वतंत्र आयुष्य. आज दैवत्व लादून स्त्रीचा माणूस म्हणून जगण्याचा हक्क हिरावताना पाहिलं की खूप त्रास होतो. Guilty वाटतं तिला. देवसारखी आई हे शब्द तिने केव्हाच मागे घेतले आहे. स्त्री special, शारीरिक सुख देणारी, पुरुषांची/मुलांची खेळणी वगैरे काही नाही. ती एक माणूस आहे.


         स्त्रियांच्या बाबतीत आणखी एक असलेला गैरसमज म्हणजे स्त्रियांना '6th सेन्स' असतो. एखादी गोष्ट बरोबर कळते त्यांना. एखाद्याची नजर अचूक ते बरोबर ओळखतात ते. जबरदस्त असतो बायकांचा '6th सेन्स'. हा सेन्स काही दैवीक चमत्कार असतो का ? हा sense बायकांना शिकण्यातून येतो. आपली आजी, आई, मावशी, काकू, आत्या यांनी जे सांगितले ते ऐकून , त्या जे वागल्या ते पाहूनच तर शिकतात मुली आणि बायका. मुली शिकतात. शिकू शकतात मग, मुलगे काहीच शिकत नाही का ? ,काहीच न शिकायला ते काही 'ढ' असतात का ? खरं तर मुलींसारखं मूलगेही हुशार असतात. पण मुलांना चांगलं शिकता येईल, असं आजूबाजूला ही दिसायला ही हवं ना!


         तिच्या घरात आईला मदत करणारे, आई थकली असताना तिच्यासोबत उभं राहून स्वयंपाक करताना, स्वयंपाक घर आवरताना, दमलेल्या आईचे पाय चेपताना तिने तिचे बाबा पाहिले. त्यामुळे भाऊ जेव्हा वहिनीला स्वयंपाकघरात मदत करतो,तेव्हा तिला आश्चर्य वाटत नाही कर्क वहिनीला नावा ठेवावीशी वाटत नाही. तिचा भाऊ असा वागतो कारण पाहून शिकण्यासाठी हे सर्व तिच्या घरात उपलब्ध होतं. त्यामुळे घरात हे स्त्रीयांच, हे पुरुषांचं, अमुक एक मुलीचं & तमुक एक मुलाचं असं कप्पे न पडता संपूर्ण कुटुंबाने एकत्रितपणे सगळ्याचा अनुभव घेणे गरजेचे आहे. जगणं आणि अनुभव खूप काही शिकवून जातात. पुस्तकं नाही शिकवत आपल्याला तितकं जगणं आपल्याला शिकवतं आणि शाहनं बनवत. पण हे शिकण्यासाठी घरात मोकळेपणाने असायला हवं.


          घरात मुलांच्या मनात वेगळं घडतंय. विचित्र वाटतंय ही भावना मुलांना बोलून दाखवता यायला हवी. ही विचित्र भावना वेळीच व्यक्त झाली तर पुढे तिची वासना होत नाही. आणि वासनामुळे घटना घडून बातम्या होत नाहीत. मुलांच्या मनातल्या वाईट विचारांना योग्य वेळी 'went out' मिळाला तर बाहेर मुली सुरक्षित राहील नक्कीच. मुलींशी योग्य वागण्याची भान येईल मुलांना. घरात किंवा बाहेर अपल्याबाबत चुकीचं घडतंय हे सांगण्याचं बळ मिळेल मुलींना.


         कुठलीही बलात्काराची, विनयभंगाची घटना घडते तेव्हा कधी झालं हे? कसं झालं? रात्री 10 वाजता का? मग तिचीच चूक ही ! एवढ्या रात्री कशाला बाहेर फिरायचं मुलींनी/बाईंनी ? गप घरात बसावं ना ! काय घातलं होतं तिने ? Shorts घातले होते ना ? मग होणारच असे हे...! असे प्रश्न आणि त्या प्रश्नांवरच्या उत्तरं यांना असे निर्बुद्ध शेरे पुरुषांकडूनच नाही तर महिलांकडूनही येतात. ( मग इथे लोकांनी बघण्याचं दृष्टिकोन बदलायला हवा ना ? )तिने काय घातलाय कसे दिसतेय हे म्हणण्यापेक्षा स्वतःचा ताबा आणि दृष्टिकोन बदला. जनावर नाका होऊ..!


          पण मला हा प्रश्न पडतो की, 7,8,9 महिन्यांच्या मुलीवर आणि 40-70 वर्षाच्या वृद्धेवर जेव्हा बलात्कार ,होतो तेव्हा त्यांनी समोरच्या पुरुषाच्या/मुलाच्या भावना चाळवल्या जातील असं काय घातलेलं / काय वागलेलं असतं ? कपड्यांवर वगैरे बलात्कार अवलंबून नसतोच. विचार आणि संस्कारच ठरवतात मुलामुलींची कृती.

          

        आज तिला साध्या राहणीत सौंदर्य सापडतं. पण, ती जेव्हा वयात आली, कॉलेजला जात होती तेव्हा न्हवती ती अशी. तिला ही modern fashionable राहायला आवडायचं. Freely fashion करावीशी वाटायची तिच्या या आवडीनिवडीवर तिच्या घरच्यांना ही काही आक्षेप न्हवतं.


      एकदा ती एक fashionable mini-skirt घालून बाहेर पडत होती. आजोबा & वडील घरातच होते. त्या तिला रागावले नाहीत. पण ते एवढंच तिला म्हणाले की, 'तू जे कपडे घातले त्यात मला काही प्रॉब्लम नाही. पण, हा ड्रेस बाहेर वावरताना तुला सावरता येणार आहे का ? तेवढी ताकद तुझ्यात आहे का ? ती ताकद तुझ्यात असेल तरच तू खुशाल हा ड्रेस बाहेर घालून जाऊ शकतेस." तेव्हा तिला कळालं की कपडे नुसते घालून उपयोगाचे नाही तर ते अंगावर वागवण्याइतकी ताकदही महत्वाची. आज तिच्यात ती ताकद आहे. म्हणूनच ती बोलते की मुलींनी bikni घालून रस्त्यावर खुशाल चालावं. पण ते घालून रस्त्यावर चालण्याची ताकद आधी कमवावी, इतकच. मुलींना ही ताकद मिळावी यासाठी त्यांचं घर, कुटुंब, कुटुंबातले आजोबा, बाबा, दादा, काका, मामा या पुरुषांनीही मदत केली पाहिजे. ते ही तितकच महत्वाचं. मुलींवर, महिलांवर बलात्कार होतो तेव्हा त्या स्वतःला दोषी मानतात. पण चूक असते कोणाची "so-called पुरुष & boys" हो ना? ते स्वतःला अशक्त & अबला समजतात. स्वतःला एकटं पडतात. पण , ह्यात त्यांची काहीच चूक नसते.


           बलात्कार झालेल्या मुली आणि महिला अशक्त नसतात, तर बलात्कार करणारे पुरुष/मुलगे अशक्त असतात. वीक असतात. त्यांना उपचारांची आणि मदतीची गरज असते.त्यामुळे अश्या मुलांना आणि पुरुषांना प्रत्येक घरातून मदत मिळायला हवी.


.. "समाजाचं सशक्तीकरण तेव्हाच होईल ".!.


     अनेक गोष्टींचे संस्कार घरातूनच पक्के होतात. घरात जर मुलांसमोर नवरा आपल्या बायकोचा सतत तिचा अपमान- शिवीगाळ करत असेल , मारझोड करत असेल, आपल्या म्हाताऱ्या आईकडे दुर्लक्ष करत असेल, तर मुलांवर वेगळे काय संस्कार होणार ? बरोबर ना मित्र-मैत्रिणींनो ??? स्त्री ही दुय्यम स्थानीच ठीक असते. बायकोशी असच वागायचं. या सवयी मुलांमध्ये रुजल्या असतील तर? रोज मुलं हेच पाहत असतील तर? त्याला तुम्ही करता ते संस्कारच जबाबदार ना ??


       मुलं जसं वडिलांचं वर्तन बघतात तसं मुलीही आईचच वागणं बघत मोठ्या होतात. आईच दाबून राहणं, घाबरणे , शिव्या ऐकून घेणं , अन्याय सहन करणं या मुळे मुलींनाही आपण स्त्री आहोत ना मग आपल्या वाट्याला पण हेच आहे हे गृहीत धरून पुढे चालतात. आणि अन्याय सहन करण्याची सवय लावून घेतात. मुलींच्या ह्या संस्काराला ही घरातले सदस्य जबाबदार असतात.! सर्व मुली & महिलांमध्ये वेळ पडेल तेव्हा समोरच्याच्या कानाखाली ठेवून देयची ताकद असते. ती वापरणे महत्वाची आहे. म्हणूनच काहीही चुकीचं झालं की पुढे मागे पाहू नका, कोण कोणता तो नालायक याचा विचार करू नका सरळ पुढे व्हायचं आणि मग काय दे दणादण आणि एक लावून द्या.!! तिला कमजोर समजू नका.

    ह्यापुढे किंवा लोकांची थिंकिंग कशी आहे पहा हा?-

  एक साधा बलात्कार तर झाला तुझ्यावर! असं काय बिघडलं मोठं?

  ते वडीलच असतीलही तुझे! किंवा काका, मामा कोणीही! किंवा अनेकांनी एकाचवेळी तुला ओरबाडले असेल. निव्वळ समोर संधी उपलब्ध झाली म्हणून!

   इतकं अगदी आयुष्याला भलतंच वळण लागल्यासारखं कशाला वागायचं? इतकी निराशा कशासाठी? इतकी भीती कसली? अगदी आत्महत्या वगैरे करावीशी वाटणं कशासाठी? वेदना काय, आज आहेत उद्या नाहीत. मनावरचा परिणाम काय, हळूहळू कमीकमी होऊ सुद्धा शकेल. नाही कमी झाला तरी काय, जगता येईलच की मन मारून?


     अच्छा... स्वप्ने वगैरे होय? भंगूदेत की ती? तुझी अशी काय मोठी स्वप्ने होती म्हणे? चार जणांसारखीच ना? संसार, मुलेबाळे वगैरे? नोकरी, घर, ही असलीच ना? मग ती तशी अजुनही तुला पूर्ण करता येऊ शकतील की? ओह, आता कोणी लग्नच करायला तयार नाही होय? मग लग्नच झालं पाहिजे असं तरी कुठे आहे? आणि तुझ्यासारख्या अब्रू गेलेल्या मुलीशी का म्हणून कोणी लग्न करावं? अभंग शरीराच्या असंख्य पर्यायी मुली लग्नाच्या बाजारात उभ्या असताना तुझी गरज कोणाला का असावी? का म्हणून एखाद्या पुरुषाने मन वगैरे मोठे करून तुला स्वीकारावे?


   सूड? सूड घ्यायचाय तुला त्या नराधमांचा? कसा घ्यायचाय सूड? ठार वगैरे करायचे आहे का त्यांना? ते तसे ऐच्छिक नसते. त्याच्यासाठी अतिशय न्याय आणि कठोर कायदे आहेत. ते सिद्ध व्हावे लागते की त्याच नराधमांनी हे कृत्य केले. वैद्यकीय तपासण्या असतात. साक्षीपुरावे असतात. त्याक्षणी नग्न झाली होतीस तसे पुन्हा एकदा कोर्टात सर्वांसमोर शाब्दिक नग्न व्हावे लागते. धाडस लागते त्यासाठी. त्यातून ते पुरुष कोणत्यातरी राजकीय अथवा श्रीमंत माणसाशी लागेबांधे असलेले असले तर ते न्यायाधीशा सकट सगळ्यांना मॅनेज करतात. आपलाच वकील तोंड पाडून सांगतो कोर्टात, की 'माझ्या अशीलाचे वर्तन आरोपींना उद्युक्त करणारे होते हे मान्य आहे' वगैरे! तू नाही का वाटेल तसे कपडे घालायचीस? कोणालाही कधीही कुठेही भेटायचीस? मोकळेपणाने वागायचीस?


   कोणाचाही सहज गैरसमज व्हावा ही तुझीच जबाबदारी होती ना? मग आता कशाला रडायचं? शिक्षा? देते ना न्यायालय शिक्षा अश्यांना! त्यांनीच तुझ्यावर बलात्कार केला हे एकदा सिद्ध झाले की शिक्षा जाहीर होते. पण ते सिद्ध होण्यात अनेक अडथळे असू शकतात. तेही पार झाले तर मग एखादा बलात्कार करणारा वयाने लहान असल्याने त्याला सुधारगृहात वगैरे पाठवले जाते. बाकी काही नाही. जे कायद्याने सज्ञान समजले जातात त्यांना एक वर्षापासून ते सात वर्षापर्यंत वगैरे तुरुंगात पाठवतात. त्यातही पुन्हा एखाद दुसर्‍या वर्षाने ते माणसे मॅनेज करून बाहेर वगैरे पडू शकतात. पण बहुतांशी केसेसमध्ये ते पुराव्याअभावी किंवा कशामुळे तरी निर्दोषच सुटतात आणि पेढे वाटतात. 


   कशाला एवढा उपद्व्याप करतेस? या सगळ्यात तुझी हकनाकच बदनामी होणार. म्हणजे एक तर बलात्काराचे दु:ख आणि वर बदनामी! बदनामी! बदनामीला काय घाबरायचंय? असं काय मोठं स्टेटस आहे तुझं या समाजात? कोण ओळखत होतं तुला हा बलात्कार होण्याआधी? आता कशी तू सार्‍या जगाला एक बलात्कारिता म्हणून माहिती झालीस उलटी! काहीच न करता प्रसिद्ध होण्यात गंमत नाही वाटत तुला?


    जनता ना? हो हो! सगळी जनता तुझ्याचबाजूने आहे. तू नुसते सांगितलेस की तुझ्यावर बलात्कार झाला, की सगळे मेणबत्त्या घेऊन पळत सुटतील. हातात फलक धरून घोषणा देतील. सरकारे हालवून सोडतील. ती शक्ती बघून विरोधी पक्षीय त्यात पडतील. मोठेच राजकारण घडून येईल.


    एक साधा बलात्कार झाला तुझ्यावर, पण पूर्ण देश हालेल. मोठमोठे नेते भाषणांमध्ये सांगतील की तुझ्या रिहॅबसाठी हे केले जाणार आहे ते केले जाणार आहे. नराधमांना शिक्षा देण्यात येणार आहे वगैरे! तोपर्यंत टी ट्वेन्टी सुरू होईल. मग ज्या चॅनेलवर तुझ्या बातमीला तासनतास कव्हरेज मिळत होते तेथून पाणी ओसरावे तसे तुझे नांव ओसरेल आणि धोनी, कोहली, अश्विन अशी नांवे झळकू लागतील. चीअर गर्ल्सवर कॅमेरे जातील. षटकार आणि चौकारांनी मैदाने दुमदुमतील. लोक रस्त्यावर येऊन नाचतील. त्या रस्त्याच्या कडेला आठ दिवसांपूर्वीचा एक फलक गटारात पडलेला असेल, ज्यावर लिहिले असे की 'अश्या अश्या मुलीचे आयुष्य नासवणार्‍यांना शिक्षा द्या'! याच गर्दीत नाचणार्‍यांच्यापैकीच काही जणांच्या हातात आठ दिवसांपूर्वी तो फलक दिसलेला असेल. आज तो त्यांच्या पायाखाली असेल आणि त्यावर बीअर सांडत असेल. सिगारेटची थोटके त्यावर चुरगाळली जात असतील. अगदी तशीच, जसे तुझे कौमार्य आठवड्याभरापूर्वी चुरगाळले गेलेले होते. पण एखादा चॅनेल, एखादे वर्तमानपत्र मात्र अजूनही तुझी बाजू लावून धरायचा प्रयत्न करत असेल.


   वेडी आशा, की तुझी बातमी देऊन अजूनही टी आर पी ओढता येईल ही! तेवढ्यात मॅच फिक्सिंग होईल. आणि मग आपल्या वाहिनीचा अथवा वर्तमानपत्राचा खप उदंड व्हावा म्हणून तुला सुईच्या अग्राइतकीही जागा न ठेवता सगळे आपापल्या हेडलाईन्स बनवतील. त्या रात्री मीडिया पार्टी झोडेल, की हातात कसली दणदणीत बातमी आली आहे. दहाच दिवसांपूर्वी तुझ्या बातम्या दाखवून जे सरकार पाडण्याचा प्रयत्न करत होते, तुझ्या अश्रूंवर दहाच दिवसांपूर्वी जे तुंबड्या भरत होते ते आता श्रीशांतच्या कंबरेचा रुमाल कसा लटकत होता त्यावर फोकस ठेवतील.


     नाही नाही, तू, तुझ्या घरचे, तुझ्यावर खरेखुरे प्रेम करणारे तुझ्यावरचा अन्याय मुळीच विसरणार नाहीत. पण इतरांना त्यांचे त्यांचे आयुष्य हे असतेच की? आपापले आयुष्य जगण्याकडे एकेकजण वळायला लागला की तू म्हणजे एक मानसिक विकारांनी पछाडलेले आणि घरात पडून राहिलेले लोढणे ठरशील. ज्याच्याबरोबर तुझा साखरपुडा झालेला होता तो आता तिसरीबरोबर लग्न ठरवत असेल. तुझ्या घरचे त्याला आणि त्याच्या घरच्यांना हे विचारतसुद्धा नसतील की आमच्याच मुलीबरोबर का नाही करत लग्न! उघड आहे, तुझ्या आई वडिलांनाच तुझ्या त्यावेळी ठरलेल्या नवर्‍याचा आत्ताचा निर्णय मान्य असेल. का म्हणून चारजणांनी नासवलेले शरीर त्याने आयुष्याचा जोडीदार म्हणून स्वीकारावे?


     हां हां, ते बलात्कारी होय? ते फिरतील की मोकाट रस्त्यावरून? निर्दोष म्हणून सुटल्यानंतर खासगीत आपल्या मित्रांबरोबर रात्री पार्टी करताना ते रसरशीत वर्णने ऐकवतील. कसे तुला सापळ्यात पकडले. कशी तू घाबरलीस? कसे तुझे हाल केल? किती धमाल आली? इत्यादी! त्यांना तू पुन्हा रस्त्यात कुठे दिसलीस तर छद्मी हासतीलही ते! नाही गं बाई, धरणीमाता वगैरे काही पोटात्बिटात घेत नसते कोणाला! असल्या गोष्टी रामायणात होतात.


    आणि तुला माहीत नाही का? दुसर्‍याची बायको पळवणे, वहिनीचे भर दरबारात वस्त्रहरण करणे ही तर आपल्या धर्मातील सर्वात मोठ्या व प्रभावी काव्यांमधील कथानके आहेत. खरे तर ती कथानके अस्तित्वातच सीता आणि द्रौपदी या दोघ्यींच्या अब्रूवर घातल्या गेलेल्या घाल्यामुळे आली आहेत.

   बायका ना? कोणत्या आजूबाजूच्या? त्या नाकच मुरडणार की तुला पाहून? त्यांच्या मुलींची जुनी मैत्रीण असशील तू! पण आज नाहीस काही मैत्रीण वगैरे! आज तुझ्यासारखीबरोबर मैत्री म्हणजे पुन्हा स्वतःचीही बदनामी! ती कोण करून घेणार आहे?


    हो हो, पुन्हा बलात्कार होण्यास मात्र पात्र आहेस तू आजही! कारण तुझा आता दुसरा काही उपयोगच नाही ना! ते एक करता येईल तुला! इच्छुकांसमोर स्वतःला सादर करायचे असल्यास अवश्य कर!

    काय म्हणतेस? हे नव्हते माहीत आम्हाला! जिवंतच नाही आहेस होय तू? बलात्कारानंतर त्या नराधमांनी मारून टाकले तुला? मग तर काय, कसले प्रश्नच उरलेले नाहीत तुझ्यासमोर!

काय? अजून जगायचे होते? का? ओह... अच्छा अच्छा!

   (हे असे नीच लोक)😢


Rate this content
Log in

Similar marathi story from Crime