Smita Bhoskar Chidrawar

Fantasy Inspirational

3  

Smita Bhoskar Chidrawar

Fantasy Inspirational

सोशल मिडिया आणि आपण

सोशल मिडिया आणि आपण

2 mins
168


सध्याच्या जगात एकमेकांशी जोडले जाण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ' सोशल मिडिया ' ते एक वेगळं जगच असतं आणि ते खऱ्या जगापेक्षा बऱ्याचदा खूप आगळं असतं .त्यात रमबाण होताना आपण स्वतःला विसरून एका वेगळ्याच दुनियेत जातो . ' जगात प्रत्येकजण किती आनंदी आहे ' असाच भास निर्माण करणाऱ्या या जगात खऱ्या जगाचं भान हरपुन चालणार नाही हे नक्की .आपण जर योग्य ती काळजी आणि विचार केला आणि सोशल मिडिया चा केवळ एक मनोरंजन म्हणून विचार केला तर यासारखा चांगला सोबती नाही .

अनेकजण एकटे असताना सोशल मिडिया त्यांना चांगला आधार देते .याद्वारे अनेक गोष्टींची माहिती मिळते .पण ती माहिती कितपत योग्य आहे याचा शहानिशा नक्कीच झाला पाहिजे ....तसंच आपल्या वयक्तिक गोष्टी कितपत पब्लिश कराव्यात याचं भान प्रत्येकाने ठेवलं पाहिजे म्हणजे कोणालाच त्रास होणार नाही .सोशल मीडिया ला योग्य प्रकारे आपलंसं केलं तर त्याच्यासारखा चांगला सखा दुसरा नाही आणि याच्या आहारी जाऊन काही करणार असाल तर नक्कीच सावधानता बाळगायला हवी !

शेवटी इतकंच म्हणावसं वाटतं ...


सोशल मिडिया , 

सखा हा सगळ्यांचा लाडका ...

रोज रोज मिळतो नवीन गोष्टींचा तडका ...

फोटो , व्हिडिओ आणि स्टेटस ...

रोज रोज नवीन नवीन अपलोडस...

सुंदर सगळे जग हे भासते ...

जेव्हा सोशल मिडिया ची साथ ही असते ...

इथे ना पर्वा संकटांची ना कुठल्या आपत्तीची ...

इथे असते फक्त मज्जा आणि मस्ती ...

हे जग नाही सगळे खरे ...

इथे फक्त वाहताना दिसतात आनंदाचे झरे ...

सोशल मिडिया म्हणजे निखळ मनोरंजन ..

विचार करा याचा फक्त करायला जीवन रंजक !


लेख आवडला तर लाईक आणि शेअर करा.

तुमच्या अमूल्य प्रतिक्रिया जरूर द्या !!



Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy