संकल्प
संकल्प
एक निम्ममध्यम वर्गीय तरुण जो कुटुंबात सर्वात लहान असतो. त्या घरातील तीन भाऊ व दोन बहिणींचे कुटुंब प्रमुखाचे सेवानिवृतिच्या वेळी सर्वांचे लग्न आणी शिक्षण झाले होते. ते कसे –बसे आपाल्या परिश्रमाने, कर्वृत्वाने आपल्या परिवारांचे भरण–पोषन करित होते. कुटुंब प्रमुखाच्या सेवानिवृतिच्या वेळी त्या युवकाचे विज्ञान स्नातकाचे शिक्षन अर्धवटच राहिले होते. ते त्याने कसे-बसे पूर्ण केले होते. व नंतर त्याची योग्यता व दृढ ईच्छाशक्ति बघुन त्याच्या भावांनी त्याला एम.एससी करण्यासाठी मदत केली होती.घरची सर्व परिस्थिति बघुन त्याच्या लक्ष्यात आले कि वडिल त्याला सारखे स्वतः लवकरात-लवकर आत्मनिर्भर होण्याचा जो सारखा उपदेश किंवा सल्ला,कदाचित त्यांचा मुला प्रति असलेला जिव्हाळामुळे देत होते. तो अगदि योग्यच आहे. नंतर तो त्या दिशेने वाटचाल करु लागला होता. एम.एससी च्या अंतिम परिक्षेनंतर लगचे त्याला एक केंद्र सरकारच्या कार्यालयात मध्ये नागपुरला जॉब मिळाला होता. पण त्याची योजना काही वेगळीच होती. त्यामुळे त्याने बि.एड. मध्ये वर्धेला प्रवेश घेतला होता. बि.एड झाल्या नंतर त्याची प्राध्यापक होवुन, सोबतच संघ लोक सेवा आयोगची तैयारी करावयाची होती. म्हणुन त्याने कार्यालयला तीन महिण्याचे एक्सटेंशन किंवा सुट मागितले होति. त्याचे वडिल, मुलगा अजुन पर्यंत जॉब वर कां रुजु झाला नाही म्हणुन चिंतित होते?. ते सारखे सांगत असे कि तुला आता तुझे भाऊ शिक्षणासाठी आर्थीक मदत करणार नाही.
नंतर त्या तरुणाने निर्णय घेतला कि आपन आता नौकरी सोबातच बि.एड पन करायचे. योजनेप्रमाने त्याने बि.एड पाठ्यक्रमला जाने सुरु केले होते. पण त्याला त्याच अवधितच जॉब ज्वाईंन करण्याचा आदेश मिळाला होता. तो आता जॉब करु लागला होता. पण कॉलेजला कधी-कधी जात असे. त्याच्या जॉब विषयीची माहिती कॉलेज प्रबंधनला मिळाली होती. प्रबंधनने वर्गात त्याची हजरी अत्यंत कमी असल्यामुळे, त्या आधारावर त्याचे नांव कॉलेज मधुन काढुन टाकले होते.आता काही पर्याय न उरल्या मुळे जॉब करने आवश्यक झाले होते. पण स्थानिय युनियन व प्रशासनाच्या निर्णयामुळे काही वरिष्ठ कर्मच्या-यांना नागपुरला बदली करण्यासाठी काही नविन कर्मच्या-यांची बदली करण्यात आली होती.त्यात या तरुणाचे पण नांव होते. युवक फार संकटात सापडला होता.त्याची संपूर्ण योजना अयशस्वी झाली होती.आणी आता त्याची बदली पर प्रांतात झाली होती. आज जितकी सरकारी किंवा अन्य नौकरी मिळने कठीन आहे. तीच परिस्थिति तेव्हा पण होती.फक्त फरक इतका होता कि केंद्र सरकारच्या पदासाठी लाच व शिफारिशीची गरज नव्हती . मित्रमंडळी व नातेवायकाच्या दडपणा मुळे त्याला ती बदली स्वीकारावी लागली होती. त्यामुळे वडिलांनी त्याचे लग्न करुन देवुन आपली अंतिम महत्वाची जवाबदारी पार पाडली होती.
आपण आपले स्वप्न पूर्ण करु शकत नाही, हे बघतांनी तो आता कार्यालयन कामातच व्यस्त राहु लागला होता.त्याच्या पत्निने तो आता वडिल होणार याची आनंदाची बातमी दिली होती. दोघांनाही विशेष माहिती नसल्यामुळे,त्याच्या पत्निला काही घरातील वजनी सामान उचलल्यामुळे अचानक रक्तस्त्राव सुरु झाला होता. त्या काळात आजच्या सारखे मोबाईल तर सोडा साधे टेलीफोन पण नव्हते, कार्यालयात तकनिकी कार्यासाठी दिल्ली वरुन एक पार्टी आली होती. त्यामुळे त्याला त्या दिवशी घरी येण्यास विलंब झाला होता. आम्ही त्या शहरात व कॉलोनी मध्ये नविन असल्यामुळे कोनाशी जास्त घनिष्ठ सबंध नव्हते.शेवटी उशिर झाल्यामुळे डॉकटरांनी तीचा गर्भापात केला होता.नंतर युवकाला एक मुलगी व मुलगा झाला.त्याची नागपुरला बदली पण झाली होती.विभागिय स्पर्धा पास झाल्यामुळे त्याची पुन्हा बढती वर बदली झाली होती.तीथे ते सर्वजन फार आनंदात होते. मुले केंद्रिय विद्यालयाला शिकत होती.आई-वडिलांची ईच्छा होती कि मुलाने आता बरेच वर्ष पर प्रांतात नौकरी केली आहे आणी ते पण आता खुपच वृध्द झाल्यामुळे जवळ-पास म्हणजे नागपुरला आले तर फार चांगले होईल ! आई-वडिलांच्या ईच्छे प्रमानेच युवकाच्या कुटुंबाची ही तशिच ईच्छा होती. त्याच्या प्रयत्नाला अपुरे यश आले होते.त्याची बदली नागपुराला न करता प्रशासनाने स्थानिय राजनीतिला बळी पडुन अकोला ईथे करण्यात आली होती.अकोलाला केंद्रिय विद्यालय नसल्यामुळे मुलांच्या शिक्षणाची अडचण निर्माण झाली होती.आता काय करावे असा जटिल प्रश्न उभा राहिला होता. युवकाच्या मनात आपण काही करु शकलो नाही.याची खंत होतीच.आता आपल्या मुलांचे भविष्य खराब होवु द्यायचे नाही.असा त्याने मनाशी कठोर निर्धार केला होता. त्याने जे तरुण पणात स्वप्न बघितले होते. पण ते पूर्ण करण्यासाठी जी तीव्र ईंच्चा शक्ति आपल्यात त्या वेळी नव्हती. स्वप्न हे गार झोपेत बघायचे नसते.ते नेहमी उघड्या डोळ्यांनी पाहिले पाहिजे. त्यासठी पक्का निर्णय,त्याग, स्वप्न पूर्ण होण्यासाठी आखलेल्या योजनेला योग्य दिशा देने आवश्यक असते.आणी योजना पूर्ण करण्याची एक निश्चित अवधी पण तय असायला पाहिजे. या सर्व ग़ोष्टि तो जीवनात आलेल्या अपयशापासुन शिकला होता. आता त्याचे क्रियावयन करण्याची घडी आली होती..त्यामुळे त्याने जिथे जवळ-पास केंद्रीय विद्यालय आहे. तीथे मुलांना आई,आजी-आजोबा सोबत ठेवायचे ठरविले होते.
पन मुलांच्या आईचा याला विरोध होता.त्यामुळे काम अवघड झाले होते.तिचा विचार होता कि मुलांची शाळा बदलवुन अकोला शहरातच राहायचे. पण मुलांच्या वडिलांचे स्वप्न फार मोठे होते.आपन जरी काही जीवनात परिस्थितिमुळे करु शकलो नाही तरी आपल्या मुलांना आपाण चांगले भविष्य बनवण्याची संधी कोनत्याही परिस्थित देवुच असा त्याने पन केला होता.तरूणाचे बारावी, सायंस स्नातक व एम.एससीचे संपूर्ण शिक्षण त्याने आपल्या मूळ जन्म गांवा वरुनच आर्थीक परिस्थिति मुळे रेल्वेने जाने-येने करुन पूर्ण केले होते. याची पूर्व कल्पना तरुणाच्या पत्निला होती.म्हनुन ती कदाचित विरोध करत असावी.पण तरुणाला जुन्या अनुभवामुळे हिम्मत मिळत होती. पत्निचा विरोध असतांनाही त्याने मुलांना जवळ्याच्या केंदिय विद्यालयत टाकले होते. व तो जसे जमेल, तसे अकोला वरुन जाने-येने करित होता. आपल्या मुलांना सीबीएससीची कोचिंग व्यवस्था उपलब्द नसल्यामुले तो स्वतः शिकवत व मार्गदर्शन करत होता. कठीन आर्थीक परिस्थितीला झुंज देत त्याने तबल हा प्रवास चार वर्ष पूर्ण केला होता.चार वर्षच्या तपस्येनंतर मुलगी बारावी पास होवुन इंजिनिअरिंगला गेली, मुलाने पण सीबीएससी दाहावीची परिक्षा पास करुन सीबीएससी बारावी बोर्ड साठी केंद्रिय विद्यालया नागपुरला आला होता.प्रकृतिच्या कृपेने वडिलांची पन बदली लगेच नागपुरला झाली होती. निकट भविष्यात ते दोघेही इंजिनिअर झाले. मुलीला पन नामी कंपनी मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअरचा जॉब पुण्यात मिळाला.पुण्यातच जवाई पण इंजिनिअर आहे, मुलाने पण व्ही.आय.टी च्या नामांकित वेल्लोर संस्थेमधुन एम.टेक करुन सध्या तो बेंगलरुच्या विख्यात बायोटेक कंपनित सांयटिस्ट म्हनुन काम करित आहे. याच कोरोना काळात मुलाचे एका सॉफ्टवेअर इंजिनिअर मुली सोबत ल्ग्न झाले आहे.
आज मुलांना व मुलांच्या आईला आपली मुल चांगल्या शिक्षण संस्थेमध्ये शिकली.त्यामुळे त्यांचे उज्ज्वल करिअर बनले असे त्यांना सारखे वाटते.याचे पूर्ण श्र्येय ते आपल्या आई-वडिलांना देतात. ही कदाचित त्या मुलांच्या वडिलांची दूरदृष्टि व मुलानसाठी घेतलेल्या परिश्रमाचे प्रकृतिने दिलेले फळच समजावे.
संकल्प पुरा करने की जिद मेरे दिल में है,
देखना है कितना जोर दिकते भरे हवा के झोके में है.
सहा दशकाच्या अवघड प्रवासानंतर कालचा तरुण आज वृद्ध अवस्थेला पोहचला आहे. जीवणात अनेक उन्हाळे –पावसाळे बघितल्या नंतर आज तो सेवानिवृत्त होवुन स्वतःच्या साधारण घरात, या अर्धांगिनी ने पाहिलेल्या छोट्याशा बंगल्यात तीच्या सोबत आनंदाने उरलेले दिवस काढत आहे.दोघेही भूतकाळातील दोघांनी घेतलेल्या कष्टाचा विचार सोडुन मुलांचे आपण भविष्य बनविण्यात यशस्वी झालो याचा आनंद बाळगत सुखाचे दिवस भोगत आहो. त्यात नातीचा सहवास मिळाल्याने जीवन अधिकच रुचकर झाले आहे.तीच्या तोंडुन आजी- आजोबाची हाक ऐकुन एक वेगळाच अनुभव व अनुभूती पीडित मनाला होत असतो.
