Arun Gode

Inspirational

4  

Arun Gode

Inspirational

समाजसेवी

समाजसेवी

5 mins
378


एका लहानशा खेड्यात एक शेतकरी कुंटूंब राहत होते. कृषक समाजाचा शेती हा वाडवडील व्यवसाय होता. ते कुंटुंब कित्येक पिढ्या पासून हा वाडवडील व्यवसाय करीत होते. कुंटुंब दर-पिढी-दर वाढतच चालले होते आणि शेतीच्या वाटण्यामुळे शेती सारखी घटत चालली होती. त्या कुंटुंबाच्या अनेक शाखा अस्त-व्यस्त होत गेल्या होत्या. त्यामुळे समोरच्या व वर्तमान पिढीतील मुलांना काही तरी उपजिवेकेसाठी व्यवसाय करने ही त्या काळाची गरज होती. म्हणून त्या कुंटुंबातील जेष्ठ मुले तेव्हा शाळेत जावु लागली होती. एका कुंटुंबातील जेष्ठ मुलाने आजु-बाजुच्या गांवातील शाळेत जावुन-जावुन आपले शालांत पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. आता घरची परिस्थिती फारशी सुदृढ नव्हती. पण मुलाची शिक्षणाविषयी असलेली तान्ह बघुन काही संपन्न नातेवाईकांनी आणि आई-वडिलांच्या अपार कष्टामुळे त्याने आपले स्नातकोत्तर शिक्षण जिल्हास्तरच्या महाविद्यालयातून यशस्वीरित्या पूर्ण केले होते. चांगली श्रेणी मिळाल्या मुळे त्याला मोठ्या शहरातील महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी पण मिळाली होती. त्याने केलेली मेहनत आणि आई-वडिलांनी घेतलेल्या श्रमाचे त्याने सोनं करुन दाखवले होते. आई-वडिलांनाही पण स्वाभिमान वाटावा अशी एका साधारण कुंटुंबालील होतकरु मुलाने जुनु आभाळाला हात टेकणारे कार्यच केले होते. त्याचा या कृतिचा अभिमान आजु-बाजुंच्या खेडातील कृषक समाजाला पण झाला होता.भूमिपुत्र शेति व्यतिरिक्त अन्य काही करु शकत नाही ही जी समाजात खोल वर रुजलेले भ्रामक कल्पना होती. त्याचा तो अंत होता. जरी तो युवक प्राध्यापक झाला होता, तरी त्याने आपली नाळ गांवाशी आणी कृषक समाजाशी कधी तोडली नव्हती. 


    जरी तो आता मोठ्या शहरात राहत होता. तरी आपल्या समाजाशी तीथे पण संबंध तो वाढवतच होता. आपल्या गांवातील आणि नातेवाईकातील तरुणांना तो मार्ग आणि प्रेरणा दाखवत आणि देत होता. त्याच्या सारखे बरेच तरुण शहरात येवू लागले होते. प्राध्यापकाचा स्वभाव फार मिळून-मिसळून आणि नेहमी मदतीचा हात समोर करणारा होता. त्यामुळे त्याचे जितके मित्र त्याच्या समाजाचे होते. त्या पेक्षा जास्त गैर–समाजाचे पण होते. गांवातील आणि शहरातील व्यवहारात त्याने विशेष असा फरक ठेवला नव्हता. आपल्या वरील जवाबदारी त्याने कधी फेटाळली नव्हती. स्वतःच्या संसारा सोबत छोट्या भाऊ-बहिणींचा पण संसार त्याने सावरुन धरला होता.प्राध्यापकच्या या धोरणाचा जितका अभिमान त्याच्या आई-वडिलांना होता, तेवढाच अभिमान,गांवक-यांना आणि नातेवाईकांना पण होता.


      प्राध्यापकांना तीन आपत्य होती. त्यात दोन मुले आणि एक मुलगी होती. त्यांनी आपल्या आपत्याची नाळ पण मुळगावांशी जोडून ठेवली होती. त्यांन पितरगांवा विषयी फार ओढ आणि अभिमान होता. प्राध्यापकांनी एक सुंदर मकान, एका मोठ्या जागेत बांधले होते. घराच्या पोर्च समोर एक मोठे आंगण आणि पोर्चला लागुनच एक मोठा हॉल व काही कमरे होते.घराच्या आजु-बाजुला मोकळी जागा होती. त्यात मोठी-मोठी झाडे आणी सुंदरसा बगिचा पण होता. घरा कडे बघितल्यावरच सहज लक्ष्यात येत होते कि घर मालक कोण्या गांवातील कृषक समाजाचा नक्कीच असावा !. शहरातील रहिवाशी ऐवढे मोकळे-चाकळे मकान साधारणता बांधत नाही. संसार थाटुन प्राध्यापक आता एक जबाबदार पिता झाले होते.आता समोर त्यांना आजोबा होण्याचे दिवस होते. मुलांचे शिक्षण पूर्ण झाल्या वर त्यांना मुलांचा पण संसार सावरुन दिला होता.त्यांचा एक मुलगा त्यांच्या पितरगांवा जवळील गांवात शिक्षक म्हणुन कार्यरत होता. तो नोकरी सोबत आपली शेती पण बघत होता. त्याने आपले अपत्य आणि पत्निला त्यांच्या शिक्षणासाठी आजी-आजोबा पाशी ठेवले होते.


      प्राध्यापकांना रोज एकदम सकाळी फिरायला जाण्याची सवय होती. ते नेहमी आपल्या भागात निर-निराळ्या रस्तांनी फिरत असे.त्यांची बरेच लोकांन सोबत ओळख-पाळख होती.प्राध्यापकांना समाजसेवा करण्याची सवय असल्यामुळे ते समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमात आपला सिंहाचा वाटा देत होते.चांगले समजसेवक म्हणून त्यांची समाजात छबी बनली होती. समाजातील ब-याच लोकांच्या पिढ्यांचे सगे-संबंधींची माहिती नेहमीच त्यांच्या तोंडी राहत होती. त्यामुळे समाजातील अनेक परिवार ज्यांचे मुल-मुली लग्नाचे झाले की ते त्यांना आपल्या आवश्यकतेनुसार अनुरुप मुला-मुली विषयीची चौकशी आणि मार्गदर्शन त्यांच्या कडुन हमखास घेत होते. शहरात बसण्यारा लोकांची त्यांच्या मुळगांवाची नाळ कधीचीच छिन्न-भिन्न झालेले होती. पण मुल-मुली लग्नाचे झाले कि समाजातील अनुरुप मुल-मुली शोधने एक त्यांच्यासाठी ज्वलंत समस्या होती. या समस्येचा किंचित फटका प्राध्यापकांना पण बसला होता. समाजासाठी आपल्याला काही करता येईल या वर ते नेहमी चिंतन-मनन करित होते. आता काही काळानंतर त्यांना नोकरीतून सेवामु्क्ती पण होणार होती.


     त्यांनी या दिशेने वाटचाल सुरु केली होती. त्यासाठी त्यांनी निःशुल्क विवाह ब्युरो आपल्याच घरी उघडले होते. जे काही परिचित होते. त्यांच्या आपत्यांचे जीवन-परिचय आणि फोटो ते मागवित होते. त्या सर्व प्राप्त जीवन-परिचयांचे संकलन, शैक्षणिक योग्यता आणि जन्म वर्षानुसार मुल-मुलींच्या फाईल मधे स्वतः फाईल करित होते. जीवनपरिचयाच्या मागे त्यांचा मोठा फोटो पण लावित होते. शहरातील ब-याच परिवारांना याची माहिती मिळाली होती.प्राध्यापक आता सेवानिवृत्त झाले होते. रोज त्यांच्या घरी सकाळ पासुन तर सध्यांकाळ पर्यंत अनेक कुंटुंबाची माहिती देण्यासाठी आणि माहिती घेण्यासाठी झुंबड होते होती. पण घरातील एकही सदस्य याची तीळ-मात्र पण तकरार करीत नव्हते. न पारिश्रामिक घेता संपूर्ण परिवार सेवेत लागला असायचा. प्राध्यापक स्वतःच त्याच हॉल मधे विश्रांती घेत होते. आलेल्या प्रत्येक व्यक्तिला ते जातीने लक्ष देवून योग्य ते मार्गदर्शन करीत होते.


     त्यांच्याच गांवाकडील एक परिवार त्या शहरात नोकरीमुळे भारत भ्रमन करुन शेवटी सेवा-निवृत्तिच्या जवळ-पास पोहचलेला होता आणि मग घर बांधून तिथलाच रहिवाशी झाला होता .त्याची आणि प्राध्यापकांची फिरतांना ओळख झाली होती. परिचयानंतर माहित पडले की ते एक-मेकांचे नाते-संबंधी होते. ऐके दिवशी ,जेव्हा ते त्याच्या घरी सहज बोलता-बोलता गेले होते. तेव्हा त्याने आपल्या कुंटुंबाचा प्राध्यापकांशी परिचय करून दिला होता. मुलीने जेव्हा त्यांना चहा दिला होता. तेव्हा ती लग्नाची झाली आहे ,हे पाहुन लगेच मुलीचा जीवन=परिचया सोबोत एक फोटा देण्याचे सांगितले होते. तसे त्यांनी काही स्थळे पन सुचवले होते. पन त्यांच्या प्रयत्नाला यश मिळाले नव्हते. मुलीचे लग्न अन्य स्त्रोतातुन मिळालेला स्थळी पक्के झाले होते. ही गोड बातमी त्यांना देण्यासाठी मुलीचे आई-वडिल लग्न पत्रिका घेवुन त्यांच्या कडे गेले होते. त्यांना मनापासुन संपूर्ण परिवाराला मुलीच्या लगनात येण्याचे आग्रह केला होता. लग्नाच्या आधल्या दिवशी मुलीच्या वडिलांनी त्यांना आठवणपण करुन दिली होती. आणी त्यांना घेण्यासाठी कार पाठवित आहे असे सांगितले होते. ते आपल्या परिवारासोबत लग्नात आले होते.त्यांना मानाचे स्थान पहिल्या पंक्तित देवुन त्यांचा आदाराने स्वागत केले होते. लग्नाच्या काही विधी पूर्न झाल्यावर प्राध्यापकाला वर-वधुच्या मंच्यावर येन्याची विनंती करण्यात आली होती, त्यांचा सर्व वराड्यांना परिचय करुन देन्यात आला होता. त्यांच्या महान कार्याबद्दल सांगण्यात आले होते.वराड्यांनी त्यांचा टाळ्या वाजुन स्वागत केले होते. शेवटी वधुच्या मोठ्या वडिलांनी त्यांचा शाल, श्रीफळ आणी गुलदस्ता देवुन सम्मान केला होता. त्या परिवारा तर्फे त्यांना एक भेट पण देण्यात आली होती. हा प्रसंग त्यांच्या व त्यांच्या परिवारासाठी नविनच आणी आगळा-वेगळा होता.बहुतेक लग्न प्रसंगात असले कार्यक्रम होत नसतात.पण प्राध्यपकाच्या कार्यचे समाजा समोर सम्मान करणे योगच होते.आपल्या घरी आलेला पाहुंना किंवा कोनी अन्य आपण मोठ्या जीवा-भावाने एक्द्या दिवशी कधी-काळी सहन करण्याचे धाडस करतो.पण संपूर्ण परिवार कसलीच तकरार न कराता सकाळ ते उशिरा संध्याकाळ पर्यंत अनेक लग्नसाठी अनुरुप मुला-मुलींची माहिती घेण्यासाठी येणा-या परिवारांना रोज आपली निःशुल्क सेवा देत होते. त्यांच्या या समाज कार्यासाठी समाजाने त्यांचा सम्मान करने आवशकच होते. या प्रसंगामुळे त्यांचा आणी परिवाराचा आनंद आकाशात मावेनासा झाला होत. 



Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational