STORYMIRROR

Shila Ambhure

Inspirational

3  

Shila Ambhure

Inspirational

समाधान

समाधान

1 min
286

    सकाळपासून घराबाहेर पडलेली सीमा सायंकाळी सहा वाजता घरी परतली. आत येताच तिने स्वतःला खुर्चीत झोकून दिले. ती दमल्यासारखी दिसत होती पण चेहऱ्यावर मात्र थकव्याचा लवलेशही नव्हता. आई बाबांना म्हणाली की पोर पुरती दमलीय.

      उत्तरादाखल बाबा बोलले, "अगं, ती आज अनाथालयात गेली होती. तिथे तिने मुलांना खाऊ वाटला आणि त्यांच्यासोबत खेळण्यात, गप्पागोष्टीत वेळ घालवलाय. जरा लक्ष देऊन बघ, तिच्या चेहऱ्यावर आनंद वाटल्याचं समाधान कसं ओसांडून वाहतयं ते." 

       आईने स्मित हास्य करत लाडक्या सुनेची तिच्या नकळत दृष्ट काढली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational