STORYMIRROR

Dhanshree Desai

Inspirational

3  

Dhanshree Desai

Inspirational

सीमोल्लंघन

सीमोल्लंघन

2 mins
414

स्वरा आई ने आवाज दिला उठतेस का आज पासून परीक्षा सुरू होतीये, रात्री उशिरापर्यंत अभ्यास केल्यामुळे स्वराला जरा डोळा लागला.  नवरात्र आज पासून सुरू होणार त्यामुळे आई-बाबा पहाटेस लवकर उठून सगळे आवरत होते दर वेळेस असच होतं, नवरात्र आणि सामाही परीक्षा का बर एकदाच येतात एकीकडे अभ्यास आणि दुसरीकडे दांडिया गरबा रास.


   स्वरा आता नववीत होती अभ्यास वाढतच होता दिवसं दिवस अभ्यास करुन देखील वेळ पुरतच नव्हता

   स्वराssssss आईची हाक कानी आली तशीच वरात ताडकन उठली सगळ आवरून पूर्वतयारीला बसली.

   

    करोना च्या काळामुळे शाळा ऑनलाईनच त्यामुळे मुलांच्या हातात मोबाईल लॅपटॉप हे देणे आलेच तिकडे परीक्षा सुरू झाली आणि घरात आईची नवरात्राची धावपळ त्यामुळे तिला फारसा वेळ मिळत नव्हता स्वरा कडे लक्ष द्यायला.

    दोन-तीन पेपर झाले आणि चौथा पेपरच्या दिवशी निम्म्या मुलांची तोंडी परीक्षा झाली आणि निम्म्या ची बाकी होती, पण तेव्हाच व्हाट्सअप वर मेसेज रिंग वाजायला लागले होते, म्हणून स्वराने व्हाट्सअप ओपन करून पाहिले तर त्यात शाळेतल्या मुला मुलींचा ग्रुप तयार केला होता आणि चॅटिंग सुरू होतं त्यात अनेक हुशार मुला मुलींची नावं होती .निरर्थक गप्पा, परीक्षा सोडून तेथे सुरू होत्या.

     गप्पा मारणं मैत्री करणं वाईट मुळीच नाही पण केव्हा कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं हे लक्षात आलं पाहिजे.

     आई-वडिलांचा खूप विश्वास आपल्या मुलांवर असतो काही जण तर वर्किंग असतात या ऑनलाइन एज्युकेशन सिस्टीम मध्ये मुलांवर कसं लक्ष ठेवणार हा एक मोठा प्रश्न आहे? नुकतीच वयात आलेली ही मुलं यांना पण या गोष्टी लगेच भुरळ पाडणाऱ्या ,एखाद्या विषयाकडे वाहत जाण्यास वेळ लागत नाही मुलांकडे बहाने तर काय तयारच असतात स्टडी ग्रुप आहे चर्चेसाठी तयार केला. आईला काय कळतंय, मेमरी फुल; म्हणून चॅट क्लिअर केला असे एक ना अनेक कारणाने या मुलांकडे तयार असतात. हे वयच नाजूक असतं पंखांमध्ये उडण्यासाठी अजून हवं तेवढं बळ आलेलं नसतं.

    पण स्वराने क्षणाचाही विचार न करता ताबडतोब तो ग्रुप लेफ्ट केला होता आणि पेपर झाल्यावर तिने आईला सगळ्या चाट सकट त्या ग्रुप बद्दल सगळं सांगितलं आणि ग्रुप डिलीट केला.

    आईचं हृदय भरून पावलं होतं आईच्या डोळ्यात स्वरा बद्दल एक वेगळीच चमक दिसत होती आज पर्यंत जे संस्काराचे बीज तिने पेरलं होतं त्याचे अंकुर तिला तिच्या जाणवत होते आईच्या विश्वासाला म्हणण्यापेक्षा तिने स्वतःला जिंकले होते.

   पंधरा सोळा वर्षांची स्वरा तिने पण ग्रुप जॉईन करून चॅटींग केली असती तर कुणाला कळला असतं आणि याच वयात स्वतःला अजमवायचं असतं.

      नरत्वं दुर्लभं लोके विद्या तत्र दुर्लभ

   शीलच् दुर्लभ तत्र विनस्तत्र दुर्लभः

अर्थात या जगात मनुष्य जन्म मिळणे दुर्लभ आहे ज्ञान मिळणे तर त्याहून दुर्लभ आहे, चरित्र तर त्याहून दुर्लब आहे

तर नम्रपणे विनय त्याहून दुर्लभ आहे

    हे तिला उमगलं होतं, आणि आज खऱ्या अर्थाने स्वराने "सीमोल्लंघन" केलं होतं हे आईच्या डोळ्यात आपसूकच दिसत होतं.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational