STORYMIRROR

Dhanshree Desai

Others

3  

Dhanshree Desai

Others

क्षण विसाव्याचे

क्षण विसाव्याचे

2 mins
264

     सकाळची काम आटोपले आणि गच्चीत हातात चहाचा कप व पेपर घेऊन निवांत बसले.पेपर मध्ये सेवानिवृत्त झालेल्यांचे फोटो आणि नातेवाइकांकडून अभिनंदन अशा जाहिराती वर नजर गेली आणि अचानक अंगावर शहारा आला आणि माझं मन मला भूतकाळात घेऊन गेलं. आज आपल्या नोकरीच्या क्षेत्रातील सेवेचा शेवटचा दिवस आज निरोप समारंभ. 


      पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत एक प्रवास सहज डोळ्या समोरून गेला. रोज सकाळची धावपळ मुलांचा डबा, स्वतःचा डबा, सगळे सणवार, ऑफिसमधल्या मिटींग्स तिथले इव्हेंट्स, मुलांचे प्रश्न घरचे प्रश्न आणि ऑफिसमधले चॅलेंजेस, एकीकडे मुलांची प्रगती तर दुसरीकडे जबाबदार एम्प्लॉयी! आई आणि उत्तम एम्प्लॉई अशी तारेवरची कसरत आज संपणार होती मनाला एक हुरहूर होती.


      कळत नकळत मनात विचारांचं काहूर सुरू झालं होतं. इतके दिवस आपल्यावाचून इथे कामं अडायची, आपल्या शिवाय जे काम अपूर्ण असायचं तेथे उद्या आपण नसणार,आयुष्याची तीस बत्तीस वर्ष आपण ज्या सेवेसाठी अर्पण केली तेथे उद्यापासून आपण नसणार ही कल्पनाच मनाला फार त्रासदायक होती, पण प्रकृतीचा नियमच तो, जो कल किसी और का था। आज तुम्हारा है। कल किसी और का होगा।


      माझ्या सोबतच्यांनी मला खूप छान निरोप दिला त्यांचे आभार मानतांना माझे देखील मन भरून आले. जड अंतकरणाने जेव्हा मी घरी आले तेव्हा बघते तर काय माझ्या घरच्यांनी खूप सुरेख पद्धतीने माझे स्वागत केले. माझी खोली नवीन पद्धतीने सजविण्यात आली होती, एका कोपऱ्यात माझ्यासाठी आरामखुर्ची ठेवली होती वाचनाची आवड तर होतीच पण धावपळीत कधी वाचायला सवडच झाली नाही हे लक्षात घेऊन माझ्या लेकांनी मला आवडणाऱ्या पुस्तकांनी तो कोपरा सजवला होता आणि टेबलावर एका वाचनालयाची मेंबरशिप माझ्या नावावर घेतलेली होती. माझ्या मुलीने सुंदर जुन्या गाण्यांच्या CD चा सेट मला गिफ्ट केला होता. आणि समोरच माझ्या "अहो" नी दिलेलं एक ग्रिटींग कार्ड होतं त्यात असं लिहिलं होतं.


      "आजपासून तुझ्या नवीन आयुष्याची सुरुवात आपण करायची आहे तू एकटीने नव्हे!ह्या घराची आणि ऑफिसची जबाबदारी सांभाळताना तुझ्या मनाला अनेकदा तू मुरड घालत आलीस, आता हे तुझे क्षण मन मोकळे स्वच्छंदपणे जगण्याची जबाबदारी आमची". ह्या एका वाक्याने माझ्या पायात शंभर हत्तीच बळ आलं.


      आणि खरच आज मी माझ्या आयुष्यात खूप आनंदात आहे त्या नाजूक वळणावर माझ्या घरच्यांचा भक्कम पाठिंबा माझ्यासोबत होता .फॅमिली इज मोस्ट इम्पॉर्टन्ट इन अवर लाईफ. 


      माझ्या निवृत्तीला मी एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला शिकले, स्वतःसाठी जगायला शिकले माझे छंद, माझ्या आवडी मी जपते, बाग- काम करते ,सकाळी प्राणायाम मला वेळ मिळतो, घरातल्यां साठी आवडीचे पदार्थ ही करते, संध्याकाळी नातवंडां सोबत गप्पा गोष्टीत वेळ जातोआणि जेव्हा आपली आवश्यकता असते तेव्हा आपल्या अनुभवाची शिदोरी आपण आपल्या पुढच्या पिढीला देतोच. आपली ओंजळ भरलेली असते तेव्हा ती इतरांना भरभरून देता येते.

    भूतकाळात रमता रमता अचानक रेडिओवर लागलेल्या गाण्याचे स्वर कानी पडले

    "भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर जरा विसावू या वळणावर जरा विसावू या वळणावर".


Rate this content
Log in