STORYMIRROR

Dhanshree Desai

Others

3  

Dhanshree Desai

Others

बीज संस्काराचे

बीज संस्काराचे

3 mins
195

संध्याकाळची वेळ होती खाली फेरफटका मारून घरी जाण्यास निघाली.

   तो लिफ्ट बंद होती म्हणून जिन्यात जात होते, जाता जाता कुठल्याशा घरात न टीव्हीचा आवाज,कुठे गाण्याचे स्वर कानी पडत होते; नकळत एका मजल्यावर पाय थबकले, तेथून सुवासिक धुपा- सोबत शुभंकरोती चे स्वर कानी पडले आणि एकदम प्रसन्न वाटलं; आणि त्याच बरोबर मनात एक विचार चमकून गेला.

   आजच्या या इंटरनेटच्या दुनियेत आपली दिनचर्या कितीही व्यस्त असली तरीही अशी बरीच जण आहेत,जी आपल्या मुलांवर संस्काराचे बीज बिंबवण्याचा प्रयत्न करतात.

   संस्कार ही अशी गोष्ट आहे ती कुणावर करतो म्हणून केली जात नाही, त्यासाठी घरातल्या लोकांमध्ये संस्कार असावे लागतात म्हणजे नकळत लहान मुलांवर त्याचा परिणाम होतो; आपण सतत घरात वाद करायचे, टीव्ही समोर बसून जेवायचे किंवा मोबाईल वर गेम खेळायचा हाच जर तुम्ही मुलांसमोर आदर्श ठेवला तर दोष कुणाला देणार मुलं ही मुळात अनुकरणप्रिय असतात. त्यांच्यासमोर जे घडतं ते तसच आचरणात आणण्याचा प्रयत्न करतात,यालाच तर संस्कार म्हणतात म्हणून लहान मुलांसमोर जर चांगला आदर्श ठेवायचा असेल तर स्वत:संस्कारक्षम बनायला हवे.

   आता हेच बघा ना रितू आणि जान्हवी दोघी चांगल्या मैत्रिणी एकत्र ऑफिस मध्ये काम करायच्या पण दोघींच्या विचारात खूपच तफावत होती.दोघींनाही एकेक मूल होतं. पण रितू ला असं वाटायचं आपण दिवसभर घरात नसतो तेव्हा रोहन चे सगळे लाड पुरवावेत; त्याच्याविरुद्ध विचार जान्हवी चा होता जान्हवी तिच्या मुलाला म्हणजे सार्थक ला वेळोवेळी योग्य वळण लावण्याचा प्रयत्न करत असे, तिच्या मते मुलांचे हट्ट पुरवणे म्हणजे त्यांचे लाड करणे असा नव्हता.

   मी सहज रविवारी दुपारी रितू च्या घरी गेले, तर रितू घरात काम करत होती आणि रोहन मोबाईल वर गेम खेळत लोळत होता,रितू रोहनला सहज म्हणाली,"रोहन मावशी आली हे पाणी दे तर त्याने ऐकून न ऐकल्यासारखे केले तिला जरा अवघडल्यासारखे झाले."

  हाच प्रसंग जान्हवी कडे जरा वेगळा होता, जेवण सुरू असताना आम्ही बी.सी.चे पैसे द्यायला गेलो; तेव्हा सार्थक सगळ्यांना पाणी देत होता आम्ही गेल्यावरही आमच्याशी आदराने बोलला आम्हाला बसण्यास सांगून पाणी दिले, या गोष्टी खूप साध्या वाटतात पण मुलांची जडणघडण या छोट्या छोट्या गोष्टीत न होत असते.

  आपण सतत बोलत असतो की हल्ली मुलांच्या हातात मोबाईल रिमोट असतो पण मुलं ही अनुकरणप्रिय असतात.

   दीड ते दोन वर्षाचा मुलगा मस्त स्मार्टफोन वापरतो हे कौतुकाने सांगणार्‍या फॅमिली बद्दल जरा आश्चर्यच वाटतं.

  मुलांनी जर हट्ट केला किंवा ते जेवत नसतील तर द्या त्यांच्या हातात मोबाईल म्हणजे, ते पण व्यस्त आणि आपणही आपले काम करायला मोकळे.

   पण कुठेतरी अंतर्मनात एक विचार येतो; तो पालक म्हणून आपली जबाबदारी जबाबदारी इथेच संपते का?

   मान्य आहे आजच्या एकविसाव्या युगात चालणारे आपण आपल्या कंपनीतल्या चिंता यश आणि ताण यांच्या काळजीमुळे नकळत मुलं इंटरनेटकडे ओढली जातायत.

  पण अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या पासून आपण आपल्या मुलांना मोबाईल पासून दूर ठेवून त्यांचा सर्वांगीण विकासाला चालना देऊ शकतो. तासन्तास मोबाईलवर गेम खेळणाऱ्या मुलांना आपणच थोडी सवड काढून त्यांच्यासोबत खेळू शकतो, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करू शकतो त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण करून त्यांना कुठल्या कलेत रूची आहे; त्याचे त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे एवढेच नव्हे तर त्यांना बोलतं केलं पाहिजे. 

  एक साधं सोपं उदाहरण घ्यायचं म्हणलं तर समजा दोन झाडं लावली आणि एका झाडाला चांगली मशागत करून खत पाणी घातलं तर ते खूप फळतन आणि फुलतं आणि दुर्लक्षित केलेलं ‌झाड हे कोमेजून जातं, असंच असतं या चिमुरड्यांच या मोबाईलच्या विळख्यातूनआपल्या मुलांना सोडवून; त्यांना मोकळा श्वास घ्यायला शिकवू या....!!!!


Rate this content
Log in