Shobha Wagle

Inspirational

3  

Shobha Wagle

Inspirational

सहवास

सहवास

2 mins
11.7K


  संध्याकाळची वेळ होती. बागेतली गर्दी हळूहळू कमी होत होती. आया बाया लहान मुलांना बकोटीला पकडून जबरदस्तीने त्यांना घरी नेत होत्या. वत्सलाबाई अजूनही बाकड्यावर बसून होत्या. घरी एकटं असण्यापेक्षा संध्याकाळचा वेळ त्या बागेतच घालवत होत्या. त्यांच घर ही बागेजवळच होते. नवरा गेल्याने त्या आता एकाकी पडल्या होत्या. एकुलता एक मुलगा वडील वारल्यावर ही आला नव्हता व आईची ख्याली खुशाली ही विचारत नव्हता. सगे सोयरे ही पांगले होते. जवळचे भाऊबंध ही नव्हते. एकाकी जगणे असह्य झाले होते. नोकरीत असताना व नवरा असताना छान होते. मुलगा विचारत नसला तरी दोघं एकमेकांना पुरक होती. पण आता हा पोरकेपणा त्रासदायक होत होता.


वत्सलाबाई ज्या बाकावर बसायची त्याच्या उजव्या बाजूच्या बाकड्यावर एक म्हातारा बसायचा. वत्सलाबाई असे पर्यंत तो तेथे बसलेला असायचा. ती गेल्यावर थोड्या वेळाने ते ही निघून जायचे. असे बरेच दिवस झाले. 


हळूहळू दोघांची ओळख झाली व नंतर लक्षात आले की बालपणी दोघे ही प्राथमिक शाळेत एकत्र शिकत होते. गप्पा गप्पात कळून चुकले की ते गृहस्थ ही वत्सलाबाई सारखेच एकटे पडलेले आहेत. एकटं जगण किती कठीण ह्याची दोघांना जाणीव होती. आता हा एकटेपणा घालवायचा दोघांनी निर्णय घेतला व एका महिन्याच्या आत लग्न करून मोकळी झाली.


माणूस एकटा राहू शकत नाही. त्याला सहवासाची गरज असते. सहवास हा कुणाचाही चालत असतो. पशू, पक्षी, जनावर कोणी ही, पण माणसाला माणसाचा सहवास जास्त फायदेमंद असतो. उतारवयात लग्न करणे ही शाररीक ओढ नसून एकमेकांच्या सहवासाची गरज असते. एकमेकांना आधार हवा असतो. लोक काय म्हणतील ह्याचा विचार न करता वत्सलाबाईंनी निर्णय घेतला आणि दोन एकटी माणसे म्हतारपणात एकत्र गुण्या गोविंदाने राहू लागली. त्यांचा सत्कार त्यांच्या सोसायटीने ही केला. समाजाला एक चांगले उदाहरण प्रत्यक्ष कृतीत आणून दिले म्हणून त्यांचे खूप कौतुक केले.


वत्सलाबाईच्या मुलाला ही गोष्ट कळली व तो लगेच भारतात आला. आपल्या आईचा खंबीरपणा पाहून तो ही चकित झाला. वत्सलेने त्याला माफ केले. त्याने आई आणि नवीन बाबांना अमेरिकेला येण्याचा आग्रह केला पण वत्सलेने साफ नकार दिला. ती आपल्या नव्या बालपणीच्या साथीदाराबरोबर सुखात दिवस घालवू लागली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational