STORYMIRROR

shubham patil

Romance Tragedy

3  

shubham patil

Romance Tragedy

श्रवणधारा

श्रवणधारा

3 mins
255

“आपण दोघं मिळून शोधूयात का?” तिने मला असं विचारलं तेव्हा मी जास्तच घाबरलो. तिथं आमच्या गावाचा एक मुलगा शेवटच्या वर्षाला होता. त्याने जर पाहिल्याच दिवशी मला मुलीसोबत पाहिलं असतं तर मला घरात काय गावातसुद्धा घेतलं नसतं. मी त्या आपत्तीचं चिंतन करत होतो आणि पहिलाच दिवस असल्याने उशिरा जाणंसुद्धा योग्य नव्हतं. मी द्विधा मनःस्थितीत होतो. मला असं बघून तीच म्हणाली, चला, लवकर वर्ग शोधूयात नाहीतर पाहिल्याच दिवशी बॅड इंप्रेशन पडेल.

        मी तिच्या मागोमाग जाऊ लागलो. ती बिनधास्तपणे रस्त्यात दिसणार्‍या कुणालाही वर्ग विचारू लागली. मागे वळून मला म्हणाली, “चला लवकर. कुठे हरवलात?”


        आम्ही आता सोबतच चालू लागलो. मला ते कासंतरीच वाटत होतं. एका वर्गासामोर ती मला घेऊन आली आणि म्हणाली, “हाच आपला वर्ग.”

        आमचं नशीब चांगलं म्हणून लेक्चर सुरू झालं नव्हतं. मी मुलांमध्ये जागा मिळेल त्या बाकावर जाऊन बसलो आणि तीसुद्धा मुलींमध्ये बसली कुठंतरी. इतक्यात सर आले आणि लेक्चर सुरू झालं. शेवटी हजेरी घेताना आम्हाला एकमेकांचं नाव समजलं, तीच नाव होतं सुधा साठे आणि विशेष म्हणजे माझी हजेरी झाल्यावर मी सहज मागे वळून पहिलं तर ती आधीपासूनच माझ्याकडे पाहत होती आणि स्मितहास्य वगैरे करत होती. मी चोरून इकडेतिकडे बघितलं. आम्हाला कुणीही बघत नव्हतं.

        एवढं बोलून महाजन काका थांबले. पुढे ऐकण्याची उत्सुकता सर्वांच्या चेहर्‍यावर ओसंडून वाहत होती.

        “मग पुढे काय झालं महाजन? आज वेळ मिळालाय तर सांगून टाक सगळं. तुझा भार हलका होईल आणि आमची करमणूक होईल. काय बर्वे बरोबर ना.” जोशी हसतच म्हणाले.

        “अगदी बरोबर.” बर्वेंनी जोशींना दुजोरा दिला.

        “अशी मजा नका घेऊ त्याची. तो सांगणार नाही पुढचं.” अण्णा म्हणाले.


        या वाक्यावर सर्वजण मनसोक्त हसू लागले. महाजन आधी लटक्या रागाने त्यांच्याकडे पाहू लागले. पण जसजसा हसण्याच्या आवाज वाढू लागला तसा त्यांचा खोटा राग स्मितहास्यात बदलला. कितीतरी दिवसांनी ते असे हसत होते. महाजन काकांचा चेहरा आता खुलला होतं. काल दिसणारी काळजीची करडी छटा जाऊन त्या जागी प्रसन्नता येणार होती. त्यांनी पुढे सांगायला सुरुवात केली,


        त्या दिवशी कॉलेज संपल्यावर खरं तर मला सुधाला धन्यवाद द्यायचे होते. पण कॉलेज संपल्यावर ती कुठे गायब झाली काय माहीत? माझं मन थोडं खट्टू झालं. दुसर्‍या दिवशी मी कालसारखा लवकर आलो आणि सुधाने दाखवलेल्या वर्गात जाऊन बसलो. अजून कुणीच आलं नव्हतं. मी खिडकीतून बाहेरची गंमत बघू लागलो. बाहेर रस्त्यावर वाहनांची मुंग्यांसारखी रांग लागली होती. इतक्यात एक मंद सुगंध येऊ लागला. पण मी इतक्या गाड्या पहिल्यांदाच बघत असल्याने त्या सुगंधाकडे दुर्लक्ष केलं. हळूहळू तो सुगंध आता तीव्र प्रमाणात येऊ लागला होता. त्यामुळे मी जरा मान फिरवली आणि बघतो तर काय सुधा साठे कालच्याच वेशात येऊन माझ्याजवळ उभी राहिली होती. ती काल जशी दिसत होती तशीच आजही दिसत होती. यत्किंचितही फरक पडला नव्हता. तिला असं अचानक इतक्या जवळ बघून माझी भंबेरी उडाली. मला गोंधळलेला बघून ती थोडी हसली आणि म्हणाली, “आज का लवकर आलात अरुण महाजन? आज तर वर्ग माहिती होता ना?”

        “तुम्हाला धन्यवाद द्यायचे होते. त्यासाठीच.” माझ्या तोंडातून अचानक असे शब्द बाहेर पडले.

        “मला धन्यवाद, ते बरं कशासाठी?” तिने विचारलं.

        “काल तुम्ही मला खूप मदत केली. नाहीतर मला वर्ग सापडलाच नसता. अर्ध्या तासापासून शोधत होतो हो मी.” मला बोलताना आता आत्मविश्वास जाणवत होता.

        “त्यात काय एवढं. मला कुठं माहिती होता वर्ग?” ती सहजपणे बोलून गेली.

        पुण्यात हळूहळू मन रमत होते. नाही म्हटलं तरी अधूनमधून गावाची थोडी आठवण येत होती. पण शहरातल्या झगमगाटाकडे बघितलं की ती तात्पुरती नाहीशी व्हायची.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance