shubham patil

Romance Tragedy

3  

shubham patil

Romance Tragedy

श्रवणधारा - भाग 8

श्रवणधारा - भाग 8

3 mins
177


“चला, आपण लायब्ररीत जाऊ. मी सांगते तुम्हाला सर्व.” असं म्हणून ती उठली आणि निघाली. मला लायब्ररी माहिती नसल्यामुळे मी तिच्या मागे जाणं भाग होतं. चालता चालता तिच्यासोबत केव्हा चालायला लागलो हे कळलं देखील नाही. तिच्यासोबत असं शांतपणे चालताना कसंतरीच वाटत होतं आणि पहिल्या दिवसापासून ती मला मदत करत होती. आतसुद्धा तिचं काम नसताना माझी मदत म्हणून ती येत होती. त्यामुळे माणुसकीच्या नात्याने काहीतरी बोलणं भाग होतं. म्हणून मी विचारलं, “तुमचे बाबा कुठं असतात? काल तुम्ही डबा द्यायला गेला होतात म्हणून विचारलं.”

        “बाबा पोलिसांत आहेत. दगडूशेठ गणपतीच्या बाजूला जिथं पोलिस चौकी आहे ना, तिथं इन्स्पेक्टर आहेत ते.” तिच्या बोलण्यात एक अभिमानाची झलक होती.

        तिचं हे बोलणं ऐकून मला दरारून घाम फुटला. तिच्या न पाहिलेल्या बाबांची मूर्ती माझ्या डोळ्यांसमोर उभी राहिली. कमरेला लावलेलं पिस्तूल दाखवून ते माला घाबरवताहेत असं माला वाटू लागलं. मला घाबरलेला पाहून ते जोरात हसत आहेत असा मला भास झाला. मी भानावर आलो तेव्हा आम्ही लायब्ररीत होतो. सर्व सोपस्कार पार पडून सुधाने मला नियम, अटी वगैरे उत्साहात समजावून सांगितल्या. मला माझीच लाज वाटू लागली. इतकी पुस्तकं बघून मला चक्कर येणं बाकी होतं. या मुलीचे आभार कसे मानावे हे मला समजत नव्हते, काही ओळख नसताना ती मला इतकी मदत करत होती. शेवटी न राहवून मी म्हणालो, “मला तुम्हाला काही सांगायचं आहे.”

        “बोला ना.”

        “तुम्ही माझी इतकी मदत का करत आहात? आपली काही जास्त ओळख नाही. तरीही तुम्ही अगदी उत्साहात मदत करताय. त्यासाठी मला तुम्हाला धन्यवाद द्यायचे आहेत. तुम्हाला काही त्रास नसेल तर तुम्ही माझ्यासोबत कॉफी घ्यायला याल का?” मी एका दमात बोलून टाकलं.

        “छे हो, धन्यवाद कशासाठी? आणि मला आवडतं मदत करायला. त्यामुळे मी काही उपकार वगैरे करत नाहीये तुमच्यावर. चला कॉफीला.”

        अर्जुनाच्या गांडीवातून धडाधड बाण सुटवेत तसे तिच्या तोंडातून वाक्य निघू लागले. मला फक्त ‘चला कॉफीला’ एवढंच ऐकू आलं. 

        “पण लेक्चर?” 

        “आता उशीर झालायं. असंही आपल्याला वर्गात घेणार नाही. त्यापेक्षा चला कॅन्टिनला.” असं म्हणत ती निघाली. आम्ही कॅन्टिनला पोहोचलो, जवळपास सर्व कॅन्टिन रिकामं होतं. मी दोन कॉफी घेऊन आलो. काय बोलावं? हा प्रश्न नेहमीप्रमाणे माझ्यासमोर होताच.

        “तुम्ही नेहमी कॉफी घेतात का?” तिने वाफाळलेल्या कॉफीचा कप हातात घेत विचारलं.

        “नाही, मी घरी असताना दूध घ्यायचो. घरचंच होतं ना. मी अजून चहाची चव घेतली नाही आणि आता इथं दूध वगैरे घेणं म्हणजे कसं वाटलं असतं ते. म्हणून कॉफी.” मी संदर्भासहित स्पष्टीकरण दिलं.

        “छोट्याश्या गोष्टीसाठी खूप विचार करतात तुम्ही.” तिने टिप्पणी दिली. 

        या वाक्याला काय बोलावं ते माला सुचत नव्हतं. मग उगाच काहीतरी बोलायचं म्हणून मी म्हणालो, “तुमच्यापासून सांभाळून राहायला लागेल बुवा. तुमचे बाबा पोलिसात आहेत.”

        माझ्या या वाक्यावर ती खळखळून हसायला लागली आणि म्हणाली, “असं काही नाही. तुम्ही फार मजेशीर बोलतात.”

        मला माझाच अभिमान वगैरे वाटला. कॉफी संपली. आम्ही निघालो.

        महाजन काकांनी मनटातील घड्याळाकडे बघितलं. दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती. त्यांनी हातानेच जेवायला चला अशी खूण केली तेव्हा मंडळी भानावर आली. एकेक जण महाजन काकांच्या खोलीतून बाहेर पडू लागला. मग ते चौघं किचनकडे वळले. चलता चालता परत त्यांच्यात गप्पा सुरू झाल्या. जोशीकाका म्हणले, “आज दुपारची झोप नाही. महाजन चरित्र ऐकीन म्हणतो.”


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance