Shubhangi M borse(pingle)✍️

Abstract Inspirational

2  

Shubhangi M borse(pingle)✍️

Abstract Inspirational

श्रावण महिन्याचे धार्मिक महत्व

श्रावण महिन्याचे धार्मिक महत्व

3 mins
99


*श्रावण महिन्यातील वाराचे धार्मिक महत्त्व व पूजाविधी* श्रावण महिन्यातील प्रत्येक वाराला अनन्य साधारण महत्त्व आहे या महिन्यात भगवान शंकराची आराधना केली जाते शंकराची उपासना व आराधना केल्यामुळे जीवनात आनंद, सुख- समृध्दी, अनेक दुःखातून मनुष्याला मुक्ती मिळते व जीवन आनंदी व निर्मळ बनते.


*श्रावण सोमवार* 

   श्रावणातील प्रत्येक सोमवारी

 विशेष महत्त्व आहे तसेच या दिवशी महादेवाला जलाभिषेक, दुग्धाभिषेक, रुद्राभिषेक केला जातो. त्याचप्रमाणे प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या *शिवामूठीचे महत्त्वही* वेगळे आहे.

 *पहिला श्रावण सोमवार शिवामुठ*

 १) तांदुळ

 *दुसरा श्रावण सोमवार शिवामुठ*

२) तीळ

*तिसरा श्रावण सोमवार शिवामुठ*

३) मुग

*चौथा श्रावण सोमवार शिवामुठ*

४) जव


*पाचवा श्रावण सोमवार शिवामुठ* 

५) सातू 


*पुजेसाठी लागणारे साहित्य* बेलाची पाने शमीपत्र, श्वेत फुले, धोतऱ्याचे फुले व फळे, गंध, अक्षदा, लाल पिवळे कापसाचे वस्त्र, पिवळे किंवा केशरी चंदन, दिप,धूप अगरबती ,भस्म पंचामृत गुळखोबरं इ.

 

ही पुजा *ओम् नमः शिवाय* या मंत्राच्या जपाने केली जाते 


*श्रावण मंगळवार*:-      

 

श्रावणातील मंगळवारी मंगळागौरीचे व्रत केले जाते. नवविवाहित महिलांनी लग्नानंतर पहिली पाच वर्षे हे व्रत करावयाचे असते. यासाठी अशाच नवविवाहित महिलांना बोलावून सकाळी एकत्रित पूजा केली जाते व रात्री जागरण केले जाते. या व्रताच्या देवता शिव, गणेश व गौरी आहेत. 


*पूजनाचा मंत्र* ः पुत्रान् देहि धनं देहि सौभाग्यं देहि मङ्गले। अन्यांश्च सर्वकामांश्च देहि देवि नमोऽस्तु ते।। मंगळागौरीचे पूजन झाल्यावर या व्रताची मनोभावें कहाणी श्रवण करावी.


*श्रावण बुधवार व गुरुवार* :-


श्रावणातील प्रत्येक *बुधवारी बुधदेवतांचे* पूजन केले जाते. 


*गुरुवारी बृहस्पतीची म्हणजे गुरुची पूजा केली जाते*. या व्रतासाठी बुध आणि गुरुचे चित्र घेऊन किंवा बालस्ती रेखाटून त्याची पूजा केली जाते. हे व्रत सात वर्षे केले जाते. 

या व्रताने धनसंपदा, बुद्धिचातुर्य, विद्याधन मिळण्यासाठी , अशा बुध आणि बृहस्पती यांची ही पूजा केली जाते. 

तसेच आपल्या चांगल्या आरोग्य व मनःशांतीसाठी हे व्रत करावे.


*श्रावण शुक्रवार*:-


श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी जिवतीची पूजा केली जाते. आपल्या संस्कृतीत लहान मुलांचे रक्षण करणारी देवता आहे तसेच त्यांना उदंड आयुष्य व त्यांच्या उज्ज्वल भविष्याची इच्छा व्यक्त करणारी देवता आहे . जीवंतिका व्रत हे असेच भावना जपणारे आणि नाजूक नात्याचे पावित्र्य सांगणारे व्रत आहे. 


*श्रावण शनिवार* :-

  

  श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वत्थाची पूजा करण्याची प्रथा आहे. तसेच या दिवशी 

 पिंपळाची पूजा करणे म्हणजेच विष्णूपूजा करणे होय


तसेच पिंपळाच्या खाली मारुती असल्यास त्याचीही पूजा करण्याची प्रथा आहे. मारुतीला शनिवारी. तेल, शेंदूर, तसेच पांढऱ्या रुईच्या पानांची माळ घालावी .

त्याचप्रमाणे श्रावणातील सर्व शनिवारी मनोभावे भगवान नृसिंहाचे पूजन करावे. 


  भक्त प्रल्हादासाठी देवाने नृसिंह अवतार घेतला. त्यावेळी तो भगवान नृसिंह खांबातून प्रगट झाले. त्याचे प्रतीक म्हणून खांब अथवा भिंतीवर चित्र रेखाटून ही पूजा श्रध्देने करावी.

   

*तसेच भावाचे औक्षण वाढावे यासाठी हा सपत शनिवार उपवास मनोभावे करतात*

    

 सप्त्याला दूर्वा व आघाड्याची माळ घालावी.



*श्रावण रविवार*:-

    

पहिला रविवार :- श्रावणाच्या केवळ पहिल्या रविवारी आदित्य राणूबाई व्रत करण्याची प्रथा आहे. हे स्त्रियांनी करावयाचे व्रत आहे. खानदेशात हे व्रत विशेष प्रचलित आहे. खानदेशातील बऱ्याच घरांमध्ये कुठल्याही मंगलकार्याच्या आधी राणूबाई आणि सूर्याचे लग्न लावण्याची रीत आहे. कुठल्या ना कुठल्या रूपात सूर्यपूजा करण्याची प्रथा आपल्या संस्कृतीत आहे. त्यापैकीच ही एक प्रथा म्हणावी लागेल. तर श्रावणातील प्रत्येक रविवारी आदित्याची पूजा करून त्याला खिरीचा नैवेद्य दाखवावा.


*नागपंचमी*:-

  नागपंचमी या दिवशी पाटावर नाग देवतेची चित्र काढले जातात. रांगोळीने सुशोभित करून धुपदिप दाखवून मनोभावे पूजाअर्चा करावी.


*नागपंचमीला गव्हाची खीर, कानोले, पुरणपोळी हा नैवेद्य दाखवला जातो.*


नगदेवता वारुळात विराजमान असतात म्हणुन वारुळाची पूजा केली जाते व दूध वाहिले जाते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract