STORYMIRROR

Shubhangi M borse(pingle)✍️

Romance Classics Fantasy

3  

Shubhangi M borse(pingle)✍️

Romance Classics Fantasy

केव्हा तरी पहाटे

केव्हा तरी पहाटे

1 min
242

केव्हातरी पहाटे ही राञ संपून गेली

 स्वप्नात माझ्या येऊनी झोप मोडून गेली


शुभ्र चांदण्यानी लख्ख नभ प्रकाशले

तारांगणात मी तुलाच शोधत बसले


चंद्रकोर ही अलगद निसटून गेली

केव्हा तरी पहाटे ही राञ संपून गेली


मिटले डोळे राञी ही झोप संपून गेली

अरुणोदय होता गोड स्वप्नात आली


कोवळे ऊन पडता चांदणं हरवून गेली

केव्हा तरी पहाटे ही राञ संपून गेली


मंजूळ गाणी कानी पक्ष्यांची किलबिल भारी

सुमनाचा सुगंध दरवळला न्हाली सृष्टी सारी 


कोवळ्या या मनाला भुरळ राञीने घातले

स्वप्नात येऊन माझ्या मिठीत तु शहारले


 तुझे स्मरण करता काव्यात उतरून गेली

केव्हा तरी पहाटे ही राञ संपून गेली


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance