Alka Dhangar

Thriller

3  

Alka Dhangar

Thriller

“ श्राप ”……मोगराचा

“ श्राप ”……मोगराचा

6 mins
9.2K


   रामा तिसऱ्या प्रहरी सासरवाडीत पोहचला. सासऱ्याने  बैल जोडी गोठयात नेऊन बांधली.(त्याकाळी वाहने जास्त प्रमाणात नसल्यामुळे लोक बैलगाडीचाच जास्त वापर करत.) रामा लाजतच घराच्या दरवाज्याकडे तिरप्या नजरेने पाहत होता. (त्याची नजर रखमाला शोधत होती.)

  लग्नानंतर पहिल्यांदाच  तो सासुरवाडीत गेला होता. रखमा आखाडसणासाठी माहेरी आलेली होती. त्याच्या मेहुण्याने त्याला पाय धुण्याकरीता आंगण्यातल्या दगडावरच बादली भरुन आणून दिली. रामाची नजर मात्र रखमाला शोधत होती. तो पाय धूत असतांना ती हळुच त्याच्या मागे शेला घेंऊन उभी राहिली. मागे फिरताच रामा दचकला. रखमा गालातल्या गालात हसली अन् म्हणाली, "इतका येळ असतयं व्हय, सासुरवाडीचा रस्ता सापडत नव्हता काय?" रामा हसला, म्हणाला, "बस की आता, किती फिरकी घेणार हायस तुझा चेहारा डोळयासमोर होता नवं मग रस्ता कसा विसरणार!” रखमा लाजून घरात गेली.

   जेवणाची ताट वाढली होती. सर्व नवीन जावायची वाट बघत होते.  जेवण आटोपली जेवता जेवताच रामाने सर्वांना सांगितले की, उद्या गावी लवकर निघायच. पाण्यापाऊसाचे दिवस आहेत, रस्ता बी जंगलाचा आहे. लवकर गाडी काढुन द्या आम्हाला. रखमा हे सगळ ऐकत होती. माहेरी येऊन तिला बरेच दिवस झाले होते. नववधूला सासरी जाण्याची ओढ लागली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी रामा उठुन मेहुण्यासोबत शेताकडे गेला. रखमाने निघण्याची तयारी सुरु केली. आई स्वयंपाकाला लागलेली होती. तितक्यात आकाश ढगाळ झालेलं दिसल. शेतावर जाऊन बराच वेळ झाला होता. आकाशातले ढग पाहुन रामाचा जीव लागेना तो लगेच घरी परतला घरी येऊन रखमाला निघण्यासाठी गडबड करु लागला. तितक्यात आणखी एक पाऊसाची सर जोरदार बरसुन गेली. अर्ध्या एक तासाने ढग निवळले आकाश स्वच्छ  दिसु लागल तरी दुपारचे दोन वाजले असतील. दोघेही बैलगाडीत बसले. घरची सर्व मंडळी रखमाला वाटी लावण्यासाठी उभी होती. सर्वजण लवकर जा लवकर निघा असे सांगत होते. गावातले अंतर अडीच तीन तासाचे होते. रामाला वाटले आपण आंधार पडण्याच्या आत घरी पोहोचलो पाहिजे.

   गाडीत बसल्यानंतर रखमाला मात्र करमत नव्हंते, तिचे डोळे पाणावले गोरीपान दिसणारी रखमा रडल्याने लालबुंद झाली होती. हातात हिरवा चुडा आणि गुलाबी पातळात तिच सौंदर्य आणखीनच खुलुन दिसत होत. जेवणाची शिदोरी, पाणि, कंदिल सर्व बैलगाडीत टाकल होतं. थोड समोर आल्यानंतर रखमाचा आवाज खुलला व ती हळुहळु रामा सोबत गप्पा मारु लागली. रामालाही थोड बरं वाटल. त्याची नजर मात्र आकाशाकडेच होती. आकाशात ढग दिसत होते आणि कोणत्याही परिस्थितीत आंधार पडण्याच्या आत जंगल पार करावे लागणार होते. कारण जंगलाची  भितीदायक कहाणी होती. तो लहाणपणा पासून ऐकत आलेला होता. त्याचा विश्वास नव्हता पण घरुन निघतांना त्याच्या आईने त्याला बजाऊन सांगितले  “नविन जोडी आहे, अंधार पडण्याच्या आतच जंगल पार करा. जंगलाला श्राप हायं, त्या मोगरा नटीचा नवीन जोडी दिसली, की ती आडवती म्हणतात.

   रामा जोरात गाडी हाकू लागला. रखमा म्हणाली,  “ऐवढी काय गडबड हायं उजेड हायं अजुन!”  रामा म्हणाला “ तुला सांगितल नव्ह जंगलाचा रस्ता धोक्याचा हाय.” रखमा म्हणाली “भुताला घाबरता की काय? शहरात शाळा शिकला हाय म्हण तुम्ही!” चार साडे चारची वेळ झाली होती. आभाळात ढग गच्च दाटून आले होते. पण एक एक टपोरा थेंब पडत होता. वाराही जोर पकडू लागला. रामा तसातसा जोरात गाडी पळवू लागला. पाऊस वाढला. एका झाडाखाली गाडी थांबवून त्यानं वरतून डोक्याला आधार हवा म्हणून बैलगाडीला मेणकापड बांधले. रखमा ओली झाल्यामुळे थरथरु लागली. अर्ध्या एक तासाने पाऊस कमी झाला. आभाळ मात्र गच्च भरलेलच. आभाळामुळे सांज वेळेचाच भास होत होता. रामा मात्र आतुन खूप घाबरलेला चिखलामुळे पाऊसामुळे रस्ता पूर्ण चिखलमय झाला होता. रामा बैलांना मारु लागला पण चिखलामुळे त्यांना चालता येईना. कसेबसे जंगलापर्यंत पोहचले. जंगलाला सुरुवात झाली. तोच पुन्हा पावसाची जोरदार सर आली. पुन्हा थांबाव लागल आता खरचं अंधार पडत होता. रामा घाबरत होता. रखमालाही जंगलाची गोष्ट आठवली तिलाही भिती वाटू लागली. तरी रामाला वाटले जंगलाचा रस्ता एक तासाचाच आहे. आपण लवकर निघून जाऊ.

   पण तितक्यात खूप जोराचा पाऊस सुरु झाला तरी रामा गाडी हाकलण्याचा पर्यंत करु लागला. रखमाला समजऊ लागला, “घाबरु नकोस भुतबित काई नसंत, आन आपल्या सोबत कंदील, मोठी काठी, घोंगड सगळ सामान हाय अन आपण तर आताच पोहचणार बघ. ” तितक्यात जोराचा वारा सुटला विजा चमकू लागल्या पावसानेही जोर पकडला. रखमाने घाबरुन रामाच्या कमरेला घट्ट मिठी मारली. त्याला काही सुचेना वारा वेग धरु लागला. विजांचा वेग वाढला. ढगांचा गडगडाट सुरुच होता. जंगलाला सुरुवात होऊन 15-20 मिनीटे झाली होती. रखमाला भिती वाटू नये म्हणुन तो तिच्याशी हळुहळु गप्पा मारु लागला. पण ती काही बोले ना, फक्त हु हु करत होती. थोड समोर आल्यावर पावसाचा वेग थोडा कमी झाला. रामा ने कंदील पेटवून समोर ठेवला. कसेबसे समोरचे दिसंत होते अंधुक अंधुक. हवा मात्र खूप जोराची सुटली होती. बैल जाग्यावर उभे राहिले, समोर सरकेनात. कंदिल हालत असल्यामुळे समोरचे स्पष्ट दिसे ना. इतक्यात जोराचा वारा आला. कंदिल खाली पडला. बैल जाग्यावरच थांबली. हवा इतक्या जोऱ्याची आली की,  बैलगाडी आपोआपच समोर जाऊन झाडावर आदडली. रखमा आणि रामा दोघेही खाली पडले. रामा एकीकडे पडला रखमा एकीकडे पडली. दोघेही एकमेकांना चिरकुन चिरकुन आवाज देत होते. कसेबसे गाडीत चढले. हवा थोडी कमी झाली. रामा ने कंदिल पेटवला आणि गाडी हाकलू लागला. थोंड समोर गेल्यानंतर पुन्हा जोराचा वारा सुटला. एक अक्राळविक्राळ आकृती समोर दिसत होती. बैल आपोआप थांबली. रामा दचकला. बाईची आकृती होती ती. आईचे बोल त्याला आठवले. त्याने हळूच मांडी खाली ठेवलेल्या सुरा उचलला कोण कोण हाय तिकडं असा ओरडू लागला. तोच त्या आकृतीने रामाला खाली ओढले. रखमाला उचलून फेकले तिला काही करता येईना. खूप घाबरली होती ती. मदतीसाठी जवळपास कोणीही नव्हते. लालबुंद रक्ताळलेला चेहरा केसांच्या लोंबलेल्या जटा अशी होती ती आकृती दोघांनाही काही सुचेना. रखमा देवाचा धावा करु लागली. तिच्या डोक्यात आले हीच ती मोगरा असल का? नक्कीच आणि खरचं मोगरा रामा आपटून आपटून मारत होती. रखमाचा काही इलाज चालेना. इतक्यात पाऊस थांबला आभाळ निवळले आणि आकृती गायब झाली. रामा मात्र बेशुध्द, अवस्थेत पडला होता. रक्ताच्या थारोळयात भिजलेला जिवंत की, मेला हे ही समजायला पर्याय नाही.

  रखमाने तसाच स्थितीमध्ये त्याला उचलण्याचा पर्यत केला. तिचा जोर कमी पडत होता. तरी देवाचे नाव घेऊन तिने रामाला ओढून बैलगाडीत टाकले आणि बैलगाडी हाकलू लागली. गाव जवळ येताच जोर जोऱ्यात ओरडू लागली. वाचवा धावा माझ्या धन्याला त्या मोगरानं मारुन टाकलं. लोक‍ तीच्याकडे पाहू लागले. अंगणात पोहचताच तिचा आवाज एकून घरातली सगळी मंडळी बाहेर आली. तिचा अवतार पाहून तिच्या सासूच्या सर्व घटना लक्षात आल्या. रडत रडत रखमाने सांगितले. ताबडतोब वैद्य वाण्याला बोलविण्यात आले. थोडां श्वास होता रामा मध्ये इलाज सुरु झाले. तो मात्र बेशुध्दचं.

 चौथ्या दिवशी शुध्दीवर आला. नुसता बडबडत होता. कोणालाही ओळखत नव्हतां. मोगराशी मात्र बोलायचा. मोगरा जाऊ नकोस. जाऊ नकोस मी तुला एकटीला जाऊ नाही देणार. मीही तुझ्या सोबत येतो. मध्येच जोरजोऱ्यात हसायचा, रडायचा, अंथरणावरुन उठून पळायचा. मला जाऊ दया. ती माझी वाट बघती आहे. असा म्हणायचा. रखमाने मोगरा विषयी सासूला विचारले सासू म्हणाली, "मोगरा, तमाशा मध्ये नर्तकी हाती.  पाटलानी तिला ठेऊन घेतली होती. जंगलाकडे त्याच शेत होत. त्या शेतात त्यान तिला एक घर बांधुन दिल होतं. लग्न करतो या आशेवर तिच्या संगत राहायचा. एक दिवस लगीन करायं येतो म्हणून सांगितल पण तो गेला नाही. नोकराला पाठवलं ती मात्र त्याची वाट बघत होती. सगळे नोकरांन तिला उचलून जंगलात नेली. तिच्यावर बलात्कार केला, अन् त्यातचं तिचा जीव गेला. मरतांना तिने या गावाला  श्राप दिला की, या जंगलातून कोणत्याच नवीन जोडप्याला जिवंत जाऊ देणार नाही. अन् खरं बी झालं. याआधी अशा तीन घटना घडल्यात, आणि  नवरे मुलगेच मरण पावले. तू घाबरु नकोस रामा आता शध्दीवर आला नां!

 घटना घडून बारावा दिवस उजाडला होता. रामा मध्ये सुधारणाही झाल्या होत्या पण तो चुपचाप आंथरुणावर पडून राहायचा रखमाशी काहीही नाही बोलायचा ती मात्र खूप रडायची. संध्याकाळ झाली सर्वाची जेवण आटोपली. रामाचा गोंधळ पुन्हा सुरु झाला. मला जाऊ द्या मला सोडा, मला मोगराला भेटायचं आहे. मला मोगरा बोलावती आहे. औषध देऊन त्याला कसबस झोपु घातलं. रखमाचा मात्र डोळा लागेना. सकाळीच्या प्रहरी उठून ती रामा जवळ गेली. रामाचे शरीर पूर्ण थंड कधी झालेले होते. तिला कळलेच नाही, ती मात्र त्याला उठविण्याचा प्रयत्न करीत होती. तुम्ही मला गजरा आणणार होता ना. तुम्ही मला यात्रेत नेणार होता ना,  आपण शेतात जाऊ मी तुम्हाला घास भरवीन. अहो उठा… उठा… असे शांत का?  हे सर्व तिची सासू ऐकत होती. जवळ येऊन बघते तर काय? रामा सर्वाना सोडून गेला होता. आईच्या लक्षात आले. आईनी जोराचा टाहो फोडला जोरजोरात रडू लागली. रखमा मात्र त्याचा उशाशी बसून त्याच्या केसात हात फिरवत होती. त्याच्या कपाळावर चुंबन घेत होती. त्याचा हात धरुन त्याला गप्पा सांगत होती. बोला ना… बोला ना…  बस ऐवढेच म्हणत होती.


Rate this content
Log in

Similar marathi story from Thriller