Alka Dhangar

Inspirational Others

4.0  

Alka Dhangar

Inspirational Others

नीताचे स्वप्न

नीताचे स्वप्न

5 mins
9.6K


 हि गोष्ट आहे एका नीता नावाच्या मुलीची. नीता एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेली तीन भावांच्या नंतर झालेली नीता आई-बाबांची आत्या, मावशांच्या सगळयांची लाडकी. नीताच्या पाठीवर आणखी दोन भाऊ. अशी पाच भावात लाडकी एकटीच नीता.

     वडील एस.टी.महामंडळात ड्राईव्हर. घरची परिस्थिती खाऊन-पिऊन बऱ्यापैकी कामापुरती शेती, गाई, म्हशी, बैल सारकाही होत. वडील नोकरीला लागले तेव्हा फक्त काही दिवसच शहरात राहिले. नतंर ते गावीच राहायला आले. गाव शहारापासुन पंधरा कि.मी. होते त्यामुळे ते रोज येण जाणं करु लागले.

     नीता आणि तिची तिन्ही मोठी भावंड सोबतच शाळेत जात. 91-92 ची गोष्ट, तिला पहिलीत टाकल तर भाऊ तिला आळीपाळीने शाळेत उचलुन नेत पाठीवर आणि घेऊन येत. अशाप्रकारे नीता लाडात वाढत होती. सर्व व्यवस्थित सुरु होत.

     पुढे चालुन दोन भावांचे लग्न झाले जुन्या चाली प्रमाणे नीताची व भावजयाची भांडणे होत नीता ही नणंद असल्याचा पुरेपुर फायदा घ्यायची हक्क गाजवायची. एक भाऊ भारतीय सैन्यात होता त्याची पत्नी हि घरीच होती नीताचे व कमलचे कसेच पटत नव्हते.

     बघता बघता नीता उपवर झाली. आई बाबांची सगळयांची लाडकी असल्याने कामाचे टेंशन नाही. घर, शाळा, खेळणे, तीचा स्वभाव थोडा अल्लडच. मैत्रीणीसोबत नदीवर जाणे, पोहणे, खेळणे, मौजमजा करणे बस यात छान जीवन सुरु होत.

     निता नव्वीत असतांनाच उपवर झाली. अंगात जाड जुड दुहेरी हड्डी, आई-वडील भाऊही तसेच रांगेत उभे राहले तर चांगल्या चांगल्यांना भीती वाटेल.

    नोकरीवाल्याची मुलगी दिसायलाही बऱ्यापैंकी, तिला बऱ्याच ठिकाणचे चुकत नाही त्याप्रमाणेच तिला एका गरीब पण हातकरु मुलाने मागणी घातली. त्याच काळात तिचा तीन नंबरच्या भावाचा अचानक साप चावल्याने मृतयु झाला. त्याची पत्नी डिलेवरी होऊन 15 दिवसच झाले होते. घरात दु:खाचे वातावरण होते. 23 वर्षांचा तगडा जवान, मानमिळाऊ कोणाच्या पण हाकेला धावुन जाणारा भाऊ अचानक गेला.

     निता आणि परिवार खुप दु:खात होते पण घरात जर कुणी मरण पावल तर लग्नकार्य सहा महिन्यातच उरकावे लागते अशी परंपरा ग्रामीण भागात आहे. तिच्या वडीलांना विचार करुन हायपावर शुगर झाली. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालवत चालली होती. शेतीक्डे लक्ष देणारही कुणी नव्हत कारण मोठा भाऊ परिवारासह मुंबईला राहत हाता तो कंपनीत काम करायचा मधला सैन्यात चार नंबरचा टोटली ॲबनॉरमल होता त्याचेच सर्व विधी इतरांना करुन घ्यावे लागत असे.

     पाच नंबरचा सर्वात छोटा खुप छोटा होता. दहा वर्षांचा मोठयाभावाला जेमतेम पगार मुंबईसारख्या ठिकाणी तीन मुलाबाळासह तो राहत असे. त्याची परिवाराला कोणतीच मदत नव्हती. दोन नंबर सैन्यात भाऊ वारल्यानंतर त्यांनेही पत्नीला सोबत नेले आणि त्याचाही प्रपंच वाढला.

     निताच्या बाबांची प्रकृती खालावत होती. आई आणि ती शेतीकीडे लक्ष देऊ लागल्या. शुगर हाय असल्याने त्यांना गाडी चालवायलाही जमत नव्हते. त्यांची डयुटी ना च्या बरोबर होऊ लागली. एसटी महामंडळ, पगार फक्त नाममात्र. एकस्ट्रा डयुटया केल्यातरच पैसे जास्त मिळायचे बघता बघता दोन वर्ष गेली नीता ची Engagement झाली होती. लग्नाचीतयारी सुरु होती. पण लग्नासाठी पुरेसा पैसा जमत नव्हात तिच्या बाबांना नौकरीसोडुन दिड वर्ष झाले होते त्यांच्या बिमारीलाही पैसे लागत होते, घर खर्च, आणि लग्नासाठी पैसे कुठुन येणार शेती विकली निताचे लग्न झाले ज्या घरी दिल तिथे खुप साधारण परिस्थिती मुलगा बी.ए झालेला त्याच्या पुढच्या शिक्षणाची जबाबदारी निताच्या वडिलांवर टाकली.

     निता आईच्या घरी एकुलती एक लाडकी कधी शेतात गेली नाही, घरची कामेही जास्त केली नाही आणि संपुर्ण जबाबदारी सासरी गेल्यावर तिच्यावर आली. घरची कामे करुन शेतात जावे लागेल. हळुहळु सर्वांनी रंग दाखवायला सुरुवात केली, सासु सासुपणा, सासरे हि आणि दीर जो 50/50 होता कधी तिचीबाजु तर कधी आई वडिलांची खुप सोसावे लागले. निताची सासु तिच्या नवऱ्याला सांगुन तिला इतक मारत की, तीन तीन महिणे वळ बुजत नव्हते. बरेच वाद झाले, तीला खुप त्रास पडत असला तरी सासुबाई तीच्यासाठी कामे शोधुन यायची. पोटाला पोटभर खायला नाही, कुत्र्यासाठी लोकांनी शेतात आणलेल्या पोळया निता खायची, अशातच मुलगा झाला. पण काय कौतुक कारण अशा भांडणामध्ये वादामध्ये तिचे सासरे वारले. वय जास्त नाही 50 वर्ष असेल आतातर निताची अग्नीपरिक्षाच होती सारे खापर तिच्यावर तिच्या नवऱ्याचे बि.एड सुरु होते. रात्रंदिवस कामे करुन मजुरी करुन नवऱ्याला शिक्षणसाठी पैसा लावला, सासुही मदत करी पण तीचा छळ सुरुच होता. तिने स्वप्ने पाहान मात्र सोडल नाही नवऱ्याला नौकरी लावणारच नवऱ्योच बि.एड झाले. मुलगाही मोठा झाला दुसरी मुलगीही झाली पण नौकरी नसल्याने परिस्थिती तशीच दिराचेही डी.एड शिक्षण सुरु आता दोघी सासासुना मिळुन पैसे पुरवु लागल्या. सासु खुप हुशार आई वडिलांचाही आधार कमी झाला वडिल नौकरी सोडुन घरी बसले त्यांची शुगर हायपावर होती. आणि ते डायलेसीसवर आलेले होते. त्यांनी पुन्हा शेती विकली. देवाचा घावा, दवाखाना सुरुच होता. पैसा पाण्यासारखा लागत होता. तिच्या वडिलांनाही.

     निताला तिच्या मोठयाबाबांची मुलगी मोठी ताई खुप मदत करायची ती शिक्षिका होती. तिला भेटायला जाणे, भांडणे मिटविणे, अडल्यानडल्याला मदत करणे, तिच्या मुलांचे वाढविदस करणे, तीला स्वत:च्या घरी आणुन पंधरा-पंधरा दिवस ठेवणे. तिला साडया, बोगडया पुरविणे इत्यादी सर्व कामे ताई आणि भाऊची कारायच. भाऊजीही खुप चांगले तिच्या नवऱ्यालासमजावयचे करिअर विषयी मार्गदर्शन करायचे.

     निताची मुले मोठी झाली. मुलगा चौथीत आणि मुलगी पहिलीत लग्नाला 11 वर्ष झाली होती. नीताच्या नवऱ्याला शिकविण्याचा आणि संघर्षाच्या जीवनाचा प्रवास सुरुच होता. आता तिने नवऱ्याला शहाराच्या ठिकाणी स्पर्धा परिक्षेच्या क्लासेससाठी ठेवले. सासु आणि ती दोघी मिळुन, काही शेतीचे उत्पनन मिळुन दिराला आणि नवऱ्याला पैसा पुरवु लागल्या पुढे तो PSI परिक्षा पास झाला आणि नाशिकला प्रशिक्षणाला गेला. निताच्या आनंदाला थारा नव्हता आधि ताई आणि भाऊजींच्या भेटीला आली आणि आता ती PSI ची पत्नी झाली. सर्वजण म्हणतात तिच्या नवऱ्याला हि नौकरी तुझी नाही रे बाबा हि निता ची नौकरी आहे, तिचे कष्ट आहेत, देवाला तिच्या हालअपेष्टांची किव आली. पोरीन देवाला भांडुण नशीब लिहुन घेतलं. आज निताचा आदर्श परिसरातल्या बऱ्याच लोकांनी घेतला आहे. हि गोष्ट फार जुनी नाही या बारा तेरा वर्षातलीच आहे. निताच्या गावात लग्न झाल्यानंतर शिकणाऱ्या पुरुषांची आणि स्त्रियांची संख्या भरपुर प्रमाणात वाढली आहे. आज सहा वर्ष झाली नौकरीला लागुन तिच्या नवऱ्याला सर्व परिवार सुखात आहे. नीता, सासु, दिर सर्व सोबत आहेत. लग्नझाल्यानंतर अकरा वर्ष नवऱ्याला स्वकष्टाने शिकवुन PSI पदावर पोहचविण्याचे काम निताने केल्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक केले जाते. 

              नीताचे स्वप्न साकार झाले…..  


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational