#शिकवण
#शिकवण
"मीरा उठ लवकर शाळेला जायचं नाही का तुला ....?
मीरा, "आई काय ग तुझी सकाळी सकाळी कटकट असते झोपु देना मला.... !
मीरा च्या अशा बोलण्याने समीरा हताश होऊन निघून गेली.
" समीरा राघव ला सांगत होती,
राघव मीराच वागणं आजकाल खूपच बदललं आहे. काय नक्की कारण आहे कळतच नाही.... ? खूप उध्दटासारखी बोलायला लागली.
राघव मी बोलतो तिच्याशी तू टेन्शन नको घेऊस... !
सकाळी सर्वजण नाष्टा करायला बसलेले असतात.
मीरा, "आई हे काय ग...? रोज या अशा नाष्टाचा कंटाळा आलाय, कधीतरी नवीन असं पिझ्झा, बर्गर करत जा ना.... !
राघव, "मीरा कशी बोलतेस ग आईशी...!! तूला कळतं का...? तू कर उद्यापासून...!कशी बोलतेस....काय झालंय ते सांग...?
का अशी वागतेस...? पुन्हा असं आईशी बोलीस तर बघ... ! राघव मीराला रागानेच बोलत होता.
मीरा, "मला आवडल नाही तर मी बोलणार. मी मोठी झालेय आता. माझे मला निर्णय घेता येतात. तुम्ही मला कधी समजून घेता का... ! तुमच्या बंधनात माझी घुसमट होतें.
मीरा नुकतीच तारुण्यात आलेली, हुशार मुलगी आईवडिलांनी काही सांगितले तर तीला कधीच न पटणारे . तिच्या श्रीमंत मित्र मैत्रिणीकडे बघून तिलाही तसंच करण्याची इच्छा होई. मित्र मैत्रिणी श्रीमंत घरचे होतें. तिलाही त्यांच्यासारखं राहायला, कपडे महागडे वापरायला, बाहेरच खायला आवडत. आईवडील मात्र काटकसरीने संसार करत होतें.पैसे जपून वापरत कारण कधी कोणत्या परिस्थिशी सामना करावा लागेल ते सांगता येत नाही ना म्हणून....! पण मीराला मात्र त्यांच्या काटकसरीपनांचा खूप राग येऊ लागला होता.
मीरा, "माझ्या मैत्रिणींचे आईबाबा त्यांचे किती लाड करतात . नवीन ड्रेस, आवडीचे पदार्थ, त्यांच्यासाठी आईबाबा काहीही कमी करत नाहीत, त्याबरोबर ते त्यांच्या पॉकेटमनीने सर्वाना पार्टी ही देतात. माझ्याकडे कधी एवढे पैसे ही नसतात. तुम्ही मला पॉकेटमनी पण देत नाही.
तुम्ही दोघं फक्त काटकसर करत असता. या सर्वांचा मला कंटाळा आलाय.
मीरा च बोलणं ऐकून दोघेही एकमेकांकडे अचिंबीत होऊन बघत होतें.
राघव, " समीरा जा कपाटातून काल झालेला दोघांचे पगार घेऊन ये. आणि मीरा च्या हातात दे.... !
आजपासून घरातील सर्व आर्थिक व्यवहार आणि किचनच काम मीरा बघेल. आम्ही तुला कसलाच खर्च विचारणार नाही. तुला हवं तसं किचन मध्ये करून खा. तुला हवं तसा खर्च कर. आई आम्हा दोघांचा टिफिन करेल.
मीरा आता खूप खुश झाली होती. तिला भरमसाठ पैसे मिळाले होते. किचनच काम म्हंटल्यावर तिला घाम फुटलेला होता .
तिने आता पैसे कसे खर्च करायचे ठरवलं असतं. शॉपिंग, पार्टी यासगळ्याच प्लांनिंग तिने केलेला होता.
दुसरा दिवस उजाडला...
राघव, "मीरा मला दोनशे रुपये ऑफिस ला जाण्यासाठी देतेस का..?
मीरा, "हो देते ना बाबा.
मीरा दोनशे रुपये घेऊन येते.
लगेच आई येते, "मीरा मला दीडशे रुपये ऑफिसला जाण्यासाठी देतेस का ...?
मीरा, "हो आई
आम्हाला रोज जाताना एवढे पैसे लागतील... !
मीराला आता खूप मोठं झाल्यासारखं वाटत असतं. आई बाबा दोघेही तिला काही बोलत नव्हते.
तिला मात्र पैशाची जाणीव ते लवकर दोघे करून देणार होतें.
मीरा चे आईबाबा ऑफिसला निघून जातात. ती दरवाजा लावते, तिला आठवते नाष्टा करायचा आहे. ती किचन कडे वळते. आईने तिच्यासाठी काहीच करून ठेवलेलं नसतं. तिला बाबांनी स्वतःच्या हाताने करून खा हे वाक्य तिला आठवतं.
ती विचार करते, आपण आज शॉपिंग ला जाणारच आहोत, तर येताना काहीतरी बाहेर खाऊ,
आणि आपल्याकडे भरपूर पैसे आहेत. असा विचार करून ती आवरून शॉपिंग ला निघून जाते.
शॉपिंग ला गेल्यावर भरमसाठ पैसे उधळते, आणि एक्सट्राची जास्त खरेदीही करते, आणि दिवसभर बाहेरच खाते.
आज मीरा खूपच खुश होती. आज तिला हवी तेवढी मोकळीक मिळाली होती. संध्याकाळी आईबाबा ही घरी येतात,आणि जेवण करून झोपतात.
सकाळी दारावरच्या बेलच्या आवाजाने मीराला जाग येते. दारात दूधवाला भैया होता.
मॅडम दुधाचं बिल द्या. तिच्या आता कुठे लक्षात येते की आपण घरखर्चाचे पैसे बाजूला काढलेच नाही. आता तिला खूप टेन्शन आलेलं असतं.
राघव , "मीरा दुधाचे बिल दिलेस का...?
मीरा, "हो बाबा
आज तिच्याकडे महिन्याचे बिल पपेरचे, लाईट बिल, किराणा, सोसाटीचा मेनटेनन्स या सगळ्याचे बिल फेडून तिच्याकडे मोजून पाचशे रुपये राहिलेले असतात. तिला आता खूपच टेन्शन आलेलं असतं. महिना कसा जाणार..?
राघव, " मीरा मला पैसे पाहिजेत.. तुझ्यासाठी काढलेली कन्या योजना पॉलिसीसाठी मला पाचशे रुपये दे.
मीराला आता खूपच टेन्शन आलेलं असतं,जेवढे पैसे उरलेले असतात तेवढे बाबांना द्यावे लागतात.
अचानक मीराच्या पोटात खूप दुखू लागतं. तिला खूपच यातना होत असतात. तिला तातडीने दवाखान्यात घेऊन जातात.
डॉक्टर, "मीरा तुझ्या खाण्यात काही बाहेरच आलं होत का...?
मीराला आठवतं त्यादिवशी शॉपिंग करताना तिने दिवसभर बाहेरचा पिझ्झा, बर्गर आणि चायनीज गाड्यावरील खाल्ल होतं .
मीरा, "हो डॉक्टर मी बाहेर पिझ्झा, बर्गर खाल्लं होतं.
डॉक्टर, " खराब अन्न ग्रहण केल्याने पोटात इन्फेकशन झालय. त्यामुळे पोटात अचानक खूप दुखलं. यापुढे बाहेरील काय खाल्लं तर ते तुमच्यासाठी धोकादायक असू शकत. त्यामुळे यापुढे काळजी घ्या. बाहेरच शक्यतो टाळाच. तिच्या आई- बाबांकडे बघून डॉक्टर बोलत होतें.
दवाखान्याचे बिल पाचशे रुपये आणि गोळ्या औषधांचे पाचशे असे मिळून एक हजार झाले होतें.
मीराला खूप टेन्शन आलं , " पैसे तर आपल्याकडचे संपले. बाबांकडे ही काही नाहीत. तिच्या चुकीने ती आतून खूप खजील झालेली होती . स्वतःची तिला लाजही वाटत होती.
राघव, "मीरा पैसे आणलेस का तू....?सगळे मिळून एक हजार झाले.तिला खूप रडायला येत. बाबा पैसे सगळे संपले....!
काय...?
राघव त्याच्याकडील बँकेतील पैसे काढून डिस्चार्ज घेतो.
तिघेही घरी येतात , मीरा दोघांची माफी मागते. माझं चुकलं....! मला माफ करा आईबाबा.... !
राघव, "मीरा तुला कळालं का....? आम्ही का काटकसर करतो....! कोठून दिले असते आजचे पैसे सांग....? मी तुझ्यासारखा पैसा उधळत असता तर.... ! तुझं शिक्षण, दवाखाना कोणी केला असता...??
पैशाची किंमत कळाली का...? आज जे पैसे एका दिवसात तू घालवले ते मिळवण्यासाठी आम्ही महिनाभर नवराबायको काम करत होतो.
मीरा चे आज खरे डोळे उघडले होते. आईबाबा आपल्यासाठी काय काय करतात हे तिला कळालं होत .
राघव तिला म्हणाला, " मीरा दुसरे काय करतात, त्यासारखा आपण करू नये. आपली कुवत बघूनच आपण पैसे वापरले पाहिजेत..
खऱ्या अर्थाने मीराला राघव आणि समीरा ने शिकवण दिली होती. त्यामुळे तिच्या आयुष्यात नक्कीच आमूलाग्र बदल होईल.
लेख कसा वाटला नक्की सांगा...!
