लघुकथा... (६/९)
बाईक अपघातानंतर गेली साडेतीन वर्षे सिम्स टू कोमा मधे असलेल्या आपल्या प्रिय पत्नीसाठी अखिलेश संध्याकाळी कामावरून येताना सर्जनने प्रिस्काराईब केलेल्या नवीन मेडीसीन घेऊन घरी आला...
अर्धचेतन अवस्थेतील ती आपल्या मुलीला देखील ओळखत नव्हती.. सासू आई आणि सासरे बाबा बनून काळजी घेत होते...
आज जान्हवी आपल्या ममाला सांगत होती.. मी पलली मला लागल गं पण ठिक आहे..
अखिलेश जान्वहीला आपल्या कुशीत घेत म्हणाला..रोज किती बोलते ममाशी ती तर आपल्या कोणालाही ओळखत पण नाही..
पण मी तर ओळखतेना तीला... ती माझी ममा आहे तीन ममाच्या डोक्यावर एक किसी दीली ...
अनघाच्या डोळ्यातून अचानक पहील्यांदाच सरकलेला एक अश्रू पाहून आई बाबा अखिलेश स्तंभित झाले ...