कोढ्यांची भाकर ....!
कोढ्यांची भाकर ....!
1 min
1.7K
लघुकथा... (८/९)
सब्बूनी भाकरीसाठी पिठाच्या डब्यात हात घातला... पण आज हाताला काय गावत नव्हत...तगारीत डब्बा उलथून.. चाळ बाजुला केला... कशीबशी एक भाकर बनल एवढच पिठ.. अन बाकी खाली ईत्या दीवसांचा पिठ चाळन करुन राहीलेला कोंढा...
सब्बीनं कशीबशी एक पिठाची आन दोन कोंढ्याच्या भाकऱ्या थापल्या... कारभाऱ्याला पिठाची भाकर द्यावी तर बबन्याला कोढ्यांची भाकर... पार जीवाची घालमेल झालेली...
बबन्या शाळच दप्तर लागू राहीला.. सदा पाटलांकड जळणफाटा फोडायला कुऱ्हाड पाझरत हे सर्व टिपुन घेत होता....
बबन्याला पिठाची भाकरी धडप्यात बांधून कोढ्यांची भाकर कारभाराच्या डोईफडक्यात बांधली .. कारभाऱ्याच झाल्यावर सब्बी कांद कापायला लगबगीन आवरत होती..
शेजारच्या मंदीनं हाकारल ती तिच्या खोपीमधंन जुनं खुरपं घेऊन आली..
दुपार भरली.. पदरानं घाम पुसत सुब्बीन बाभळीखाली भाकर सोडली.. तळहातावरच्या भाकरीच तोंड बघून सब्बीच डोळं भरल.. ती पिठाची भाकर पाहून..
बाभळीला गुलमोहर भरुन आला...