प्रश्न आणि उत्तर...
प्रश्न आणि उत्तर...


आहो कानातले एक कुठ गेलय काही सापडत नाही... त्यादिवशी या जोडीतील एक बॉक्समधे सापडल ते जपून ठेवल होत पण तेही आज सापडत नाही....
अनंत हसत म्हणाला....
अग या पण जोडीतले एक कुठ गेलय मलाही सापडत नाही... वाॅश बेसिनच्या येथे पडल होत... मी मागच्या आठवड्यात उचलून ठेवलय...
अस म्हणत पेनाचा स्टॅन्ड टेबलावर रिकामा करत त्याने आपल्या हातातील डुल मालतीपुढे केल मालतीनेही आपल्या मुठीतील डुल अनंतपुढे उघडल...
हरवलेली कानाची डुल अशी एकत्र झाली....
सर्व आपल्या आसपासच असत...
प्रश्न पण आणि उत्तर पण....