ती आणि तो .....
ती आणि तो .....

1 min

1.5K
लघुकथा... (१०/९)
पुढे निघालेली ती.. परत मागे धावत आली बाबांची आधीच ओली झालेली काॅलर पून्हा एकदा कॅमेर्यात झूम करत फोटोग्राफार कोल्ज्प् शोधत होता..
सुजाता म्हणजे काॅलनीची सुजा.. काॅलनीची निरोप घेत होती..
पण या सर्व रडसोहळ्यात पण गेली वीस एक मिनटे... सुजाताचे डोळे कुणाला तरी शोधत होते....
कधी खिडकीत.. कधी गच्चीवर.. कधी पायऱ्यांवर .. कधी एखाद्या कोपऱ्यात सर्वांपासून वेगळा...
पण तो कुठेच नव्हता... मामाची मुलगी प्रितीच्या नजरेतून सुजाची ही शोधाशोध लपून राहीली नाही.. ती हे सर्व पहात त्याला शोधायचा प्रयत्न करत होती...
पण तो कुठेच नव्हता..
गेल्या तीन वर्षात तीला त्याची सवय झालेली... आता पण ती त्याला ओझरत पाहण्यासाठी शोधत होती..पण तो जवळपास नव्हताच....
भिरभिरत्या नजरेने ती गाडीत बसली... तरी तिचा शोध काही थांबत नव्हता..!
तो भुंकला..