तो दिवस ...!
तो दिवस ...!


रघुनाथराव नेहमीप्रमाणे बॅंकेच्या गेटवर टापटीप गणवेशात आपल्या कामाच्या वेळात हजर होते...
नवीन बॅंक मॅनेजर कामावर रुजू होताना पहील्यांच दिवशी मोठ्या तोऱ्यात गाडीतून उतरले...
कर्मचारी वर्ग स्वागतासाठी सज्ज होताच.. ते पुढे सरसावले...
मॅनेजर गर्दीतील शुभेच्छां स्विकारत पुढे आला....
आपल्या केबीनचा दरवाजा उघडून आत जाण्या अगोदर तो
रघुनाथरावांच्या पायांना हात लावून पाया पडला... म्हणाला बाबा आशिर्वाद द्या....
रघुनाथराव म्हणाले... साहेब आगोदर ओळखपत्र गळ्यात घाला .. आज पहीला दिवस आठवण करुन देतोय.. नाहीतर उद्या पासून गेटच्या आत नाय....!