Vilas Yadavrao kaklij

Romance Tragedy Inspirational

2  

Vilas Yadavrao kaklij

Romance Tragedy Inspirational

सौदंर्य (शेवंता)

सौदंर्य (शेवंता)

3 mins
101


अहो ' ऐकले का ! अंगणात चोपाळ्यावर बसलेल्या म्हातारीने थरथरत्या शारिराने  म्हाताऱ्याला आवाज दिला .म्हातारा मात्र खिडकितून बाहेर बघत होता . त्याची डोक्याचीं लाईन बंद होती व म्हातारीची कानपूर लाईन त्यामुळे आलो आलो म्हणून हि म्हातारी चा आवाज चालु रहात व अखेर  भेट होत बोला ? शेजारी अंगणात चोपाळ्यावर बसून गप्पा करणे हा नित्याचा क्रम घरात दोघेच मूल शिकली नोकरीला प्रदेशात गेली होती घरात सर्व सुखसोई असून घर रिकाम वाटे . प्रत्येक दिवस आठवणीवर जगायचे व प्रेमाच्या हि दोळ्या वर झुलायचे आज म्हातारीचा वेगळाच मूड होता गेली ८५ वर्ष व म्हातारा वयाच शतक पूर्ण करायला तेरा महीने बाकी होते . अहो आज पन्नास वर्षापूर्वी या घरात आली तेंव्हा कस स्वर्गवाणी वातावरण होत भरलेल्या गोकुळात चिमणी पाखरपोर खेळा आजही ते आवाज कानात घुमतात . मला काय पाहून पंसत केले होते ?काळा सावळा रंग आखीव रेखीव बांधा शाळेच तोंडन पाहिलेली ? आता परतीचा प्रवास सुरू झाला पण मातारा काही सांगत नव्हता व म्हातां२ीचा तोच प्रश्न आज मात्र म्हातारा ला सांगावच लागेल ? थोडी फिरकी घेवून म्हणाला अग बापान गळयात बांधलेला धोंडा साभाळावांच लागला दुसर काय ? म्हातारी चा झटका पाहुण हात धरूण खाली बसवले .ऐक 'शेवंता ' म्हातारीचे नाव गावातच दुसऱ्या गल्लीत तीचे घर होते जाता येता नजरानजर व्हायची पण त्या काळी बोलण्याची भेट न्याची हि मंत नव्हती कारण आईवडिंचा धाक व समाजाची बंधने पाळली जात . दोन तीन मूलांचे बाप होवून सुध्दा इतरानं समोर नवरा बायको बोलत नसत अशा काळातील प्रेम म्हातारा म्हणाला शेंव ता तुझ्या अंगी निरागस असे प्रेम व सुसंस्कारी असे गुण मला दिसले केवळ गोरा रंग व नट्टा पट्टा करून रंगवलेल असत ते नाटकातल वा तमाशातल सोंग केवळ काही तासासाठी घेतलेल सोंग मला नको होत मला दिसल ते तुझ्यातील आंतरिक "सौंदर्य " मनाचे व संस्काराने भरलेल "सौदंर्य " ते आजही टिकून आहे व त्याचा सुगंध म्हणजे अपत्यरूपी मिळालेल्या मूर्ती व गुण व वागणुकीचा सुगंधाचा दरवळ प्रत्येकाच्या मनावर कोरलेला आहे गावात तुझ्या शब्दाला असलेला मान ? किर्ती टिकून आहे व आपण गेल्यावर ही असेल ? सांग शरीराचे सौंदर्य हे काही काळापूर ते असते . सांग तारुण्यातील सौंदर्य आज तुझ्या माझ्या व्यतिरिक प्रतिमा तरि कुणाच्या नजरेत सापडतील नाही ना ? मात्र तुझ्या आंतरिक प्रतिमा आजही टिकून आहे प्रतिमा आणि प्रतिभा ? शारिरीक सौंदर्य वयानुसार व काळानुसार एक एक भागनिकामी होतो . शेंव'ता ' आज या व्याधीनी पिडीत शरिराला 'मनाला कसली गरज आहे ? ती आंतरिक प्रेमाची व मनाच्या सौंदर्याची एकमेकांना आधार कसला आहे ? सुंदर शरिराची मुले ? नाही शेवंताची मूल म्हणून ओळखली जातात ? आज शतक पार पडेल ते केवळ अंतिरिक बळ ' जगण्याची उमेद व सफल जीवनाचा प्रवास कशामूळे ?फक्त आणि फक्त आंतरिक "सौंदंर्य " असते पण दिसत नाही . जाणवते पण सांगता येत नाही . ते मी तुझ्यात पाहिले व संस्कारांनी मुलांमध्ये व समाजात आपण ठेवून जावू तें " सौंदर्य " ना घेवून जावू शकत वा पूसून जावू शकत ते मी माझ्या शेवंतात पाहिले . असे सांगत असतांना म्हाताऱ्याने कुशीत डोके ठेवले ते कायमचेच .


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance