सैतानी बाळ!
सैतानी बाळ!


आजकालच्या धावपळीच्या जगात कुणालाही वेळ नसतो. एका शहरात एका मोठ्या घरात आई व दोन मुली राहात असतात. एकदा घरात सर्व झोपले असताना मध्यरात्री दाराबाहेर एका बाळाच्या रडण्याचा आवाज येतो. दार उघडून बघतात तर एका झोळीत एक बाळ कर्कश्श आवाजात रडत असतं. तिघी आजुबाजुला पाहातात पण कुणी दिसत नाही. समोर काळं मांजर केकाटत असतं. भयानक वातावरण असतं. आई आणि दोन्ही मुली खूप घाबरतात. तेवढ्यात ते सैतानी बाळ अचानक उठून त्यांच्या घरात शिरून घरातल्या वस्तूंची तोडफोड करायला सुरुवात करतं. दात विचकून खिदळायला लागतं. भीतीने या तिघींची बोबडीच वळते. मधूनच भयानक चेहरा काळ्या कांबळामध्ये अर्धा लपवलेला
त्यांच्या डोळ्यासमोरून वेडेवाकडे हावभाव करत जातो. आता मात्र तिघींची भीतीने गाळण उडते. त्या जोरजोरात मदतीसाठी आरडाओरडा करु लागतात पण कुणी मदतीला येत नाही. एकदाची पहाट होते ते सैतानी बाळ पुन्हा लहान होऊन झोळीत जाते. पोलिसांना फोन करून या सर्व प्रकार सांगतात. पण पोलीस यांना म्हणतात', मुळात हे लहान बाळ जे चालू शकत नाही ते तुमच्याकडे कसं आलं? हे बाळ तुमच्या दोन मुलींपैकी कुणा तरी एका मुलीचं आहे. का? खरं सांगा आम्हाला.'
तिघी चक्रावतात. पोलीस तिघींचा जाबजबाब नोंदवून घेतात. एका समाजसेवकाची मदत घेऊन त्या बाळाला अनाथ आश्रमात पोचवतात. काही वर्ष जातात आणि पुन्हा ते बाळ तसंच मध्यरात्री यांच्या दाराबाहेर दिसतं. पुन्हा तोच सगळा अंगावर काटा आणणारा प्रसंग घडतो. आता मात्र या तिघी एका मात्रिकाला बोलवून त्या सैतानी बाळाचा बंदोबस्त करायचं ठरवतात. पण कसं कुणास ठाऊक त्या सैतानी बाळाला कळतं आणि ते या तिघींना छळायला सुरूवात करतं. त्यांचे केस काय ओढतं, त्यांचे कपडे काय फाडतं.पहाट होते आणि ते बाळ गायब होतं. संध्याकाळी मांत्रिक येतो. या तिघी त्याला घेऊन अनाथाश्रमात जातात. तिथे बाळाला बघितल्यावर मांत्रिकाला सारा प्रकार समजतो. तो काही मंत्र म्हणतो आणि ते सैतानी बाळ बोलू लागतं' मी या बाईचा प्रियकर आहे. हिने मला फसवून दुसऱ्याशी लग्नं केलं. मी हा धक्का सहन करु शकलो नाही. सगळे माझी टिंगल उडवत होते. म्हणून मी आत्महत्या केली आणि मी हिला शोधत होतो. हिच्या नवऱ्याला मीच मारलं.कुणालाही कसलाही संशय आला नाही. नवरा मेला तरी ही सुखात आहे हे बघून मी हिला सैतानी बाळ बनून छळू लागलो. हिच्या मुलींचं बाळ आहे म्हणून मीच पोलीसांना फोन करून खोटं सांगितले. हिला मानसिक त्रास व्हावा. हिची सगळीकडे छी थू व्हावी. जे मी भोगलं ते हिनेसुध्दा भोगावं. हिला मी सुखाने जगू देणार नाही. ' मुलींची आई त्या सैतानी बाळाची माफी मागते.
मांत्रिक पुन्हा मंत्र म्हणायला सुरुवात करतो आणि काय आश्चर्य ते सैतानी बाळ जोरजोरात ओरडत अदृश्यं होतं. अशा तऱ्हेने एका भयकथेचा शेवट होतो. माणूस मरतो. पण आत्मा जिवंत असतो. ज्यांच्यावर अन्याय झालेला असतो ते अशरिरी रूपात भूत बनून ज्याने अन्याय केला आहे त्याला कुठूनही कसंही शोधून काढतात आणि त्याला मरणप्राय वेदना देतात. तेव्हा कधी कुणाला फसवू नका. 💀👹🦇