The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Sneha Salunke

Children Stories Others

3  

Sneha Salunke

Children Stories Others

लाकूडतोड्या आणि साप!

लाकूडतोड्या आणि साप!

2 mins
452


एका गावात एक लाकूडतोड्या राहत असतो. त्याचे नाव बबन. रोज सकाळी जंगलात जाऊन झाडाची लाकडं तोडून संध्याकाळी घरी परत येत असतो. हा त्याचा नित्याचा कार्यक्रम ठरलेला असतो. आठवड्याच्या बाजारात जमा करून ठेवलेली तोडलेली लाकडं तो चांगल्या भावाने विकत असतो. त्यात त्याला चांगले पैसे मिळत असतात. असे अनेक वर्षे त्याचा लाकडे विकण्याचा धंदा सुरू असतो. त्या पैशांतून तो जंगलाच्या परिसरात एक घर बांधतो. जेणेकरून त्याला यायला-जायला सोपे जाईल. दिवसामागून दिवस जातात. बबन खूप मेहनत करत असतो.


एके दिवशी एका झाडाची लाकडं तोडायला तो संध्याकाळी जंगलात जातो. त्या झाडाची लाकडं विकून बबनला खूप पैसे मिळणार असतात. बबनचे कित्येक दिवसाचे स्वप्न पूर्ण होणार असते. त्याला एक टुमदार बंगला बांधून तिथे मोठी शेत जमीन घ्यायची असते. शिवाय बबनला आता लग्न करून संसार करायचा असतो. त्यासाठी त्याचे सगळे प्रयत्न सुरू असतात.

सूर्यास्त व्हायच्या आतच त्याला झाडाची लाकडं तोडायची असतात. त्या नादात तो पटापट जंगलाकडे निघतो.


घाईघाईत तो स्वतःबरोबर टॉर्च घेऊन जायला विसरतो. त्यामुळे कुऱ्हाडीने झाडावर मारताना त्याला नीट दिसत नसते. तिथे एक साप राहत असतो. नेमका त्याचवेळी तो झाडावर फिरत असतो. जेव्हा तो पायथ्याशी येऊन पोहोचतो तेव्हा लाकूडतोड्या बबन कुऱ्हाडीचा जो घाव घालतो तो त्याच्या शेपटीवर पडतो. साप वेदनेने विव्हळत बाजूला पडतो. बबनला काही कळतसुद्धा नाही. मात्र, इथे सापाला खूप राग येतो आणि तो लाकूडतोड्या जिथे राहत असतो तिथे जातो. साप खूप रागीट, खुनशी असतो. एव्हाना रात्र झालेली असते. लाकूडतोड्या बबन जेवून आरामात झोपायला गेलेला असतो. घराच्या पडवीत अंधाऱ्या जागी त्याने कुऱ्हाड ठेवलेली असते साप ती बरोबर शोधून काढतो. आणि कुऱ्हाडीच्या पात्याला दंश करतो. खुनशी, रागीट साप पुन्हा जखमी होतो. शेवटी लाकूडतोड्याच्या कुऱ्हाडीचं पातं अणकुचीदार, अती तीक्ष्ण असतं. रक्तबंबाळ अवस्थेत तो असताना वाटेत त्याला नीट सरपटत जाता येत नाही. कसाबसा तो त्याच्या राहत्या ठिकाणी पोहोचतो आणि तिथे मरण पावतो.


लाकूडतोड्या बबन दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर कुऱ्हाडीकडे जातो तेव्हा त्याला कुऱ्हाडीच्या पातीला रक्त लागलेले दिसते. पडवीमध्ये सापाच्या पाऊलखुणा दिसतात. बबन जंगलात त्या झाडाकडे जातो जिथे त्याने लाकडं तोडलेली असतात तिथे त्याला मरून पडलेला साप दिसतो. बबनला झाला प्रकार समजतो. मेलेल्या सापाला खड्ड्यात पुरून त्या सापाची माफी मागून बबन जंगलातून शहरात बाजारात लाकडे विकायला जातो. त्यात त्याला खूप पैसे मिळतातत.


तात्पर्य - क्रोध आणि खुनशी स्वभावामुळे आपण फक्त आणि फक्त स्वतःचे नुकसान करत असतो.


Rate this content
Log in