Sneha Salunke

Inspirational Others

3  

Sneha Salunke

Inspirational Others

वेळीच समस्या सुधारा

वेळीच समस्या सुधारा

3 mins
504


मुंबई शहरातल्या एका पाॅश टॉवरमध्ये एक सुशिक्षित तरुण जोडपे राहात असते. त्यांना एक १२ वर्षाचा मुलगा असतो. प्रत्येक रविवारी बाबा मुलाला घेऊन सकाळी morning walk ला joggers track ला जात असतात. मुलाचे नाव रोहन. खरं म्हणजे रोहनला रविवारी उशीरापर्यंत झोपायचे असते. त्याला कुठे जायला कंटाळा येत असतो. आरामात उशीरापर्यंत अंथरुणात झोपून राहायचे असते. शाळा नसते. क्लास संध्याकाळी. मग काय गरज आहे? जेव्हा जेव्हा त्याचे बाबा त्याला उठवायला येतात तेव्हा तेव्हा तो बाबांना म्हणतो बाबा please मला अजुन थोडा वेळ झोपू द्या ना! पण ऐकतील तर ते बाबा कसले? ते बरोबर पहाटे ५ च्या सुमाराला रोहनला उठवायला येतात. बाबा आणि रोहन ट्रॅक सूट, स्पोर्ट्स shoes घालून जॉगिंग करायला घराबाहेर पडतात.


बाबा रोहनला म्हणतात रोहन आज आपण हाय वे पलीकडे जो डोंगर आहे ना तिथे डोंगरावर जाऊया. एक नवीन अनुभव. रोहनचे बाबा त्यांची बुटाची लेस टाईट बांधतात. आणि रोहनबरोबर डोंगर चढायला सुरुवात करतात. डोंगर चढत असताना वाटेत त्यांच्या पायाला काहीतरी टोचत असतं म्हणून ते मधेच जरा वेळ थांबतात. पायातले बूट काढून तपासतात तर बुटाच्या आत त्यांना बारीक बारीक बारीक दगड दिसतात. लगेच पायातून बूट काढून ते साफ करतात. आणि पुन्हा पायात बूट चढवून पुढचा डोंगर चढायला सुरुवात करतात. त्याचवेळी रोहनच्या पायालासुद्धा काहीतरी टोचत असते पण रोहन तसाच पाय रेटत धावत असतो. त्याला लवकरात लवकर डोंगर चढून पुन्हा खाली पटापट यायचं असतं आणि घरी जाऊन पुन्हा एकदा अंथरुणात शिरून झोपायचं असतं. त्यामुळे तो सारखा बाबांच्या मागे लागलेला असतो. अहो, बाबा चला ना काय मध्ये मध्ये थांबता? एकदाच घरी गेल्यावर बूट साफ करा. सारखे सारखे थांबता काय? आपण कासवाच्या गतीने चाललो तर सूर्य डोक्यावर येऊन आपण उन्हात करपून जाऊ. आणि पुढे डोंगर चढू शकणार नाही. शिवाय डोंगर चढल्यावर तिथे आपण थांबणार आहोत की.! पुन्हा हा डोंगर आपल्याला उतरून खाली जायचे आहे. चला. मलासुद्धा डोंगर चढताना पायाला दगड लागतात. पण मी थांबतो का? मी तर तुमच्यापेक्षा किती लहान आहे? पण रोहनचे बाबा त्याचं काही ऐकत नाहीत. त्यांना जेव्हा जेव्हा पायाला दगड टोचतात तेव्हा तेव्हा ते थांबून बूट साफ करतात.


रोहनचे बाबा त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न करतात. पण रोहन काही ऐकत नाही. एकदाचे सूर्य डोक्यावर असताना दोघं डोंगरावर पोहोचतात. रोहनचे बाबा मजेत डोंगर चढण्याचा आनंद घेत तिथल्या एका दगडावर बसतात. आजूबाजूच्या इमारती, आकाश बघत, तिथली झाडं, गवत, वर उडणारे पक्षी, सगळं कसं छान वाटतं. रोहनचे बाबा रोहनला प्रत्येक गोष्ट दाखवून त्याचे महत्व दाखवून देत असतात. तिथे दोघं बसलेले असतानासुद्धा रोहन पायातून बूट काढून साफ करत नाही. आता डोंगर उतरायचा असतो. रोहनचे बाबा मजेत डोंगर उतरायला सुरुवात करतात. रोहन मात्र उतरताना अडखळत चालत असतो. त्याला नीट चालता येत नसतं. पण आता त्याच्याकडे डोंगर सुरक्षितपणे उतरण्यावाचून पर्याय नसतो. रस्त्यात ठेचकाळत, अडखळत रोहन कसाबसा डोंगर उतरतो. डोंगर उतरल्यावर त्याला एकदम हायसे वाटते. लंगडत, लंगडत हळूहळू बाबांबरोबर तो घरी पोहोचतो. रोहनची आई ब्रेकफास्ट रेडी करून या दोघांची वाट बघत असते. रोहनचा चेहरा पाहून आई ओळखते याचं काहीतरी बिनसलं आहे. रोहनचे बाबा बूट काढून shoe रॅकवर ठेवतात.


रोहन मात्र बूट काढताना जोरजोरात ओरडायला लागतो. रोहनची आई रोहनकडे पाहत राहते. बाबांना तसा थोडासा अंदाज असतो. रोहन जसे बूट पायातून काढतो आई हळहळते. आणि बाबांना विचारते, मुलाच्या पायाला एवढं रक्त कसे, काय? या पायांनी रोहन डोंगर कसा उतरला? तुम्हाला कसं कळलं नाही? तिने एका टबमधून गरम पाणी आणले. त्यात डेटॉल टाकले व एका स्वच्छ कपड्याने रोहनचे पाय स्वच्छ केले. त्यानंतर त्या पायांना anti septic cream लावले. या उपचारानंतर रोहनला जरा बरं वाटू लागले. ब्रेकफास्ट घेतल्यावर त्याने आईला सांगितले आई मी आणि बाबा डोंगर चढत असताना आमच्या पायाला छोटे मोठे दगड लागले. त्यातले काही छोटे दगड आमच्या बुटात घुसले. आम्हाला ते टोचत होते. म्हणून बाबा सतत मध्ये मध्ये थांबून बुट काढून साफ करत होते. मी आळस केला. बाबा मला सतत सांगत होते पण मी ऐकले नाही. मला लवकर घरी येऊन आराम करायचा होता. माझे चुकलं. मलाच आता त्रास होत आहे. त्यावर बाबा म्हणाले, तुला तुझी चूक कळली. यापुढे लक्षात ठेव.


तात्पर्य - वेळीच समस्या आली तर ती सुधारा. पुढे ढकलू नका. नाहीतर त्याचे त्रास भोगावे लागतात.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational