सावित्रीबाई फुले यांना पत्र
सावित्रीबाई फुले यांना पत्र


तीर्थरूप माता सावित्रीबाई यांना,
साष्टांग दंडवत,
माता सावित्री जी आपणास पत्र लिहीण्यास कारण की,रात्री अजिबात झोप लागत नाही, डोळे उघडेच राहतात , डोक्यात विचारच थैमान चालू असतं आणि तुम्ही मात्र डोळ्यासमोर साक्षात येऊन उभे राहता. आजच्या देशातील नव्हे जगातील परिस्थिती पाहता मला तुमची खूपच आठवण येते.
माझी पत्नी,आई, बहीण सारे म्हणतात आम्ही सावित्रीच्या लेकी ! कालच मी तुमचं चरीत्र वाचलं . तुमचं कार्य म्हणजे चमत्कारच ! विशेष म्हणजे प्लेगच्या काळात जीवाची पर्वा न करता तुम्ही केलेली कामगिरी... तुमच्या त्या कार्याची गरज आज या समाजाला आहे.. आणि डॉक्टर, परिचारिका बनून तुमच्या लेकी आज तुमचं ते सेवावृत्त इमान इतबारे बजावत आहे...
अरे हो, माताजी तुमच्या काळात तो प्लेग होता ना, अगदी तसेच या कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. म्हणूनच तुमची ती सेवा पाहून आठवण झाली.तुम्ही जीवाची पर्वा न करता प्लेग रुग्णांची सेवा केली.ती शिकवण,तो आदर्श,ती प्रेरणा आज जगाला हवी म्हणून तुमची आठवण झाली... म्हणूनच हे पत्र पाठतोय. माताजी तुमचे समाजॠण खूप खूप मोठे आहेत !
आजची परिस्थिती पाहता , आजही तुमच्या लेकी येथे सुरक्षित नाहीत,स्त्रीभ्रूणहत्या , हुंडाबळी,बलात्कार या सर्व समस्या पहाता आजही तुम्ही जन्म घ्यावा असे वाटते म्हणून... म्हणून हे पत्र लिहीतोय माते. मी ईश्वराला प्रार्थना करतो की, पुन्हा एकदा या धर्तीवर माते तुमचा जन्म व्हावा नी जगाचा उद्धार व्हावा.!
" उध्दारण्या जग हे सारे,ये माते अवतार घेऊनी
वाट तुझी पाहतो माते, मी बसलो टक लावूनी..!"
तुझा... तुझाच बाळ