साम्यता
साम्यता
एका साधारण सुखी कुंटुंबात सर्वात लहान व सर्वांचा लाड़का असा एक मुलगा असतो. त्याला तीन मोठे भाऊ आणी एक मोठी व एक छोटी अशा दोन बहिणी होत्या. आई–वडील सुक्षिशित असल्यामुळे सर्वांना शिक्षणाची चांगली सवय जड़ली होती. सर्वजन आपल्या शिक्षनात फार सतर्क, गंभीर ,प्रामाणिक आणी शिस्तबध्द होते. पण लहान मुलगा जरी बुध्दीने हुषार होता. तरी तो अभ्यासत इतर भावा –बहिनी मधे ढच होता आई-वडील त्याच्याकड़े लहान आणी लाड़का असल्याने विशेष लक्ष्य देत नव्हते. तो नेहमी खेळ खेळण्यात दंग राहत होता. त्याच उप-नगरात दोन-तीन रागें नंतर त्याच्याच वर्गातील एक मैत्रीण राहत होती. दोघेही, बहुतेक एकच रस्ता असल्याने सोबतच जात होते. दोघांची घट्ट मैत्री होती. बरेचदा गंमत म्हणून ती त्याला चकमा देवून निघून जात होती. तो तीची सारखी वाट खेळता-खेळता बघत राहत होता. आणी त्याला शाळेला उशीर होत होता. शिक्षक त्याला त्यासाठी शिक्षा पण करीत होते. तरी तो तीच्याशी राग भरत नव्हता. तीचा रंग निम्म गोरा म्हणजे हलका सावळा ,शरीर सड़पातळ आणी केस कुरळे व चेह-याची बनावट आनी नाक –नकक्षा सुरेख होता. ती त्याला खूप आवडट होती. तीची पण वागणुक त्याच्या सोबत एका मित्रा सारखीच होती . त्या दोघामधे सुंदर ताळमेळ होता. प्राथमिक शाळेचे शिक्षण पूर्ण होताच, त्याचे शिक्षणात विशेष लक्ष्य नसल्यामुळे, त्याला दुस-या शहरात मोठया लग्न झालेल्या भावाकड़े पठावण्यात आले होते. त्याच्या मैत्रीनीने कन्या शाळेत, त्याच शहरात दाखला घेतला होता. आता त्यांची फाटा-फुट झाली होती. तो जेव्हा कधी आपल्या गांवी येत होता. तेव्हा त्यांची कधी -काळी , धावता – पळता अचानक भेट होत होती. काही वर्षानंतर तो आपल्या गांवी परत आला होता. त्याने मुलांच्या शाळेत प्रवेश घेतला होता. शाळेची वेळ आणी मार्ग व अभ्यासाचे ओझे, त्यामुळे त्यांची भेट होत नव्हती. त्याची धाकटी बहिण पण कन्या शाळेत जात होती. तीची एक मैत्रीण दिसायला हूबे-हुब त्याच्या जुन्या मैत्रीनी सारखी होती. ती नेहमीच त्याच्या बहिणीला भेटायला त्याच्या घरी येत होती. ते तिघेही घरी काही खेळ खेळत होते. त्यामुळे त्यांची घट्ट मैत्री झाली होती. त्या दोघीमधे साम्यता असल्यामुळे, त्याची तीच्यात पण रुची वाढली होती. शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्याने अकरवीत प्रवेश घेतला होता. अकरावीं –बारावीं करण्यासाठी त्याची जुनी मैत्रीण पण त्याच कनिष्ठ महाविद्यालयात आली होती. तिथे पण त्या दोघांची जुनी मैत्री कायम होती. दोघेही आपल्या करियरसाठी फार सतर्क होते. ते नेहमिच या विषयावर चर्चा करीत होते. चर्चा करता –करता, त्यांचे दोन वर्ष कसे निघून गेले होते. तेच दोघांना कधी कळले नव्हते. शेवटी दोघेही बारवींची परीक्षा उत्तीर्ण करूण पुन्हा वेगळे झाले होते. दोघांचे ही वडील सेवानिवृत्त झाल्यामुले व घरच्या अन्य जवाबदा-या निभवता-निभवता त्यांची आर्थीक परिस्थिती पार ढासळुन गेली होती. ती विज्ञान स्नातकची पदवीं प्राप्त करण्यासाठी तीच्या वडील भावाकड़े मोठया शहरात गेली होती. त्याने विज्ञान स्नातकची पदवीं प्राप्त करण्यासाठी जिल्हाच्या ठीकाणी विज्ञान महाविदयालयात दाखला घेतला होता. आर्थीक परिस्थिती खराब असल्याने तो रोज रेल्वेने येणे-जाने करीत होता॰ यातच त्याची पूर्ण शारीरीक शक्ति व क्षमता पूर्णपणे पनाला लागत होती. प्रयत्नान्ती पर्मेश्र्वर. त्याने आपले पाऊल त्या दिशेने उचलले होते.आलीया भोगाशी असावे सादर म्हणुन तो आपले रक्त आर्थीक तंगीमुळे पातळ करीत होता. त्याचे स्वप्न फार मोठे होते. त्यासाठी लागणारे वातावरण पोषक नव्हते. तो चिकाटीने त्या मार्गी लागला होता. हे सर्व एक नवीन मैत्रीण सारखी बघत होती. तीच्यात पण तीच साम्यता होती जी त्याच्या पूर्वीच्या मैत्रीनीनमधे होती. साम्यतेमुळे त्याचा कल तिच्याकडे नाईलाजास्तव होता. ती पण त्याची प्राक्टिकल पार्टनर असल्याने त्याच्या जास्त जवळ होती. तीला पण त्याचे तेवढेच आकर्षण होते. पण परिस्थिती आणी करियार हयाच्यामुळे आपण या प्रकरणात आता पडू नये असा प्रण त्याने केला होता. त्याचा अल्पसा प्रतिसाद बघुन ती पण आपले पाऊल तसे–तसे उचलत होती. काळा सोबत ते दोघेही धावत होते. लक्ष्य साध्य करीत –करीत, बेता-बेताने ते विज्ञान स्नातकच्या अंतिम वर्षात येवून ठेपले होते. त्याच वर्षी त्याच्या बहिणीची मैत्रीण मेडिकलला प्रवेश न मिळाल्याने, तीने त्याच माहाविद्यालयात प्रथम वर्षाला प्रवेश घेतला होता. जुना मित्र आपल्या सोबतीला असल्यामुले, तीने त्याच्या सोबतच कॉलेजला येणे-जाणे सुरू केले होते. आता त्याच्यासाठी इकडे आड़ तिकडे विहिर असी परिस्थिती निर्माण झाली होती. दोघींचे लक्ष्य एकच होते. त्यामुले दोघींना पण भ्रम झाला होता. पण त्याचे मुख्य लक्ष्य फक्त करियर बनवनेच होता. तो ईच्छा असतानाही असाहय होता. शेवटी, हे शेवटचे महत्वाचे वर्ष असल्यामुले ते आपल्या लक्ष्य प्राप्ती कड़े वळले होते. परिक्षेनंतर दोघाना पण स्नातकची पदवीं प्राप्त झाली होती. पण त्यांचे मार्ग बदलले होते. तीने गांवातच बी. एड. करण्याचे ठरविले होते. त्याने विज्ञान शाखेत स्नातकोत्तर करण्याचे ठरविले होते. त्याने त्यासाठी मोठ्या शहरात दाखला घेतला होता. दुस-या लनिष्ठ मैत्रीनीला स्नातकच्या प्रथम वर्षाला चांगले गुण प्राप्त झाले होते. त्या आधारावर तीला मेडिकलला प्रवेश भेटला होता.तीचा आणी त्याचा मार्ग बदलला होता.स्नातकोत्तरला दुर्दैवाने इथे पण ज्या गोष्टी तो टाळत होता. तेच हमखास त्याच्या सोबत होत होते. त्याच विज्ञान संस्थान मधे त्याची पहिली मैत्रीण पण विज्ञान शाखेत स्नातकोत्तर करन्या करीता तीने प्रवेश घेतला होता. या वेळेस फक्त त्यांच्या शाखा वेग-वेगळया होत्या. ते नेहमीच एक-मेकाशी भेटत होते. आर्थीक परिस्थितिने ते इतके गुरफाटले गेले होते की त्यांना आपल्या करिआर शिवाय वेगाळे काही अन्य मित्रासारखे सुचत नव्हते. त्यांच्यावर आई-वडीलांचे इतके दड़पन होते की जितक्या लवकर ते आपल्या पायावर उभे होतील !. त्यांच्यासाठी उत्तम राहील असा त्यांच्या आई- वाड़िलांचा सल्ला होता. कारण त्यांना माहीत होते की त्यांचे मोठे भाऊ यापुढे त्यांना आर्थीक मदत करायला तयार नव्हते. ह्या कारणाने त्याने स्पर्धा परिक्षेची तयारी सुरू केले होती. जेव्हा त्याने स्नातकोत्तरची अंतिम वर्षाची परीक्षा दिली होती. तेवहाच काही दिवसानतंर त्याला एका केंद्र सरकारची नौकरी प्राप्त झाली होती. त्या कारणाने तो खूपच खुश होता. आता त्याला, त्याने बघेतलेले स्वप्न पूर्ण होण्याची खात्री झाली होती. पण त्या नौकरी मधे रोस्टर डिवटी असल्यामुले तो अन्य स्पर्धा परिक्षांची तयारी एकाग्रतेने करू शकला नव्हता. शेवटी कार्यालयाच्या धोरणानुसार त्याची बदली दुस-या राज़्यात फार दुर्गम स्थानी झाली होती. त्याच्या पायखालची जमीनच सरकुन गेले होती. नौकरी सोडून स्वप्न पूर्ण करण्याचे परिस्थितिमुळे त्याच्यात धाडस उरले नव्हते. त्याची आता कोणी मदत करणार नव्हते. हे त्याच्या लक्षयात आले होते. त्याची अवस्था आकाशातून पडला आणी खजूरच्या झाड़ात अटकला अशी झाली होती. तो जीवणात भविष्य बनवण्याच्या धावपळीत कोणालाच इच्छा असतानाही आपाल करू शकला नाही किंवा कोण्याच्या कधी भावनांचा आदर करू शकला नव्हता. शेवटी तो बदलीवर कामावर रुजू झाला होता. मुलगा आता पर-प्रांतात गेला होता. त्यामुळे वडीलांनी त्याचे लग्न ठरविले होते. परिस्थितिला मात देण्यासाठी काही तोडगा उरला नव्हता. कारण त्याने कधीच कोणाला आपल्या भावना व्यक्त केल्या नवहत्या. त्यामुळे त्याच्या भावना समजाणारे व आधार देणारे कोणीच उरले नव्हते. तेल गेले, तुप गेले ,आणी हाती धुपाटने आले होते. त्यामुळे त्याने आई-वडीलांच्या पसंदीला हमी भरली होती.
लग्नमुलीची पसंदी नंतर तो दूर असल्यामुळे लग्नाच्या अगदी वेळस आला होता. लग्न झाल्यानंतर जेव्हा त्याचा परिचय आपल्या सा ळया सोबत झाला होता. तीथे पण त्याच्या एका साळीची साम्यता त्याच्या अगोदरच्या मैत्रीनीन सोबत होत होती. फक्त एकून्नीस –वीसचा फरक जानवत होता. ती त्याला आपला मोठा भाऊ म्हणून त्याचा सम्मान करीत होती. त्यांच्यामधे चांगले सलोख्याचे संबंध होते. त्याचा तीच्या कड़े आदराचा कलाचे कारण त्याच्या मनात आणी मस्तिष्कात बसलेली त्याच्या जुन्या मैत्रीनींची आकृती होती. काही वर्षा नंतर तीचे लग्न झाले होते. तीला चांगले श्रीमंत सासर मिळाले होते. तीला एक मुलगा आणी दोन मुली होत्या. दुर्दैवाने तीच्या मोठ्या मुलीला हृदयाच्या चार कप्या ऐवजी तीनच कप्पाचे हृदय होते. त्यामुळे तीचे दीर्घकाळ जीवंत राहने शकय नव्हते. ते तीच्या दुःखाचे मुख्य कारण होते. पण तीच्या पतीला अचानक हृदयविकाराचा फार मोठा झटका आला होता. त्यात त्याचा मृत्यु झाला होता. कालांतराने , नंतर तीची मुलगी वाढत्या शरीराचे आवश्यकतेनुसार हृदय भार सहन करू शकले नव्हती. तीचा पण हृदयविकाराने मृत्यु झाला होता. तीचे दुःख सर्वानसाठी दुःदाई होते.
त्याला पण दोन अपत्य होती. लहान एक मुलगा आणी मोठी मुलगी होती. त्याची संतती शिक्षणात प्रखर असल्याने त्याने त्यांच्या शिक्षणाकड़े विशेष लक्ष्य दिले होते. तो जे आपल्या जीवणात करू शकला नव्हता. त्याची पूर्ती संततीने करावी असा त्याचा कयास होता॰ काही वर्षानंतर त्याची बदली त्याच्या मूळ तैनातीच्या ठिकाणी झाली होती. सर्व कुंटुंला आनंद झाला होता. ते आता आपल्या मूळ राज्यात व जवळच्या नाते-वाईकात आले होते॰त्याचे आता सर्व बघितलेले स्वप्न पनाला लागले होते. आता त्याचे मुख्य धोरण परिवाराचा विकास करने हाच होता. तो या दिशेने मार्गी लागला होता.
त्या कार्यालयात हिन्दी या भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हावा म्हणून केंद्र सरकारच्या आदेशाप्रमाणे अनेक हिन्दी कार्यक्रम होत होते. त्यात हिन्दी संगोष्टि,हिन्दी पंधरवाड़ा ,अंतर विभागीय स्पर्धा वैगरे. हे सर्व बघणारी समन्वयक सुदैवाने तीची साम्यता त्याच्या जीवणात आलेल्या मैत्रीणीशी मिळती –जुळती होती. त्यामुळे तो तीच्या संपर्कात कामित-कमि येण्याच प्रयत्न करीत होता. पण त्याची हिन्दी भाषेवर ठोस पकड़ आणी कवी, व-त्का असल्यामु ळे, ती त्याच्या नेहमीच संपर्कात राहुन त्याला हिन्दी स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी प्रेरित करीत होती. त्याच्या मधे लहान पणा पासून जी कमजोरी बनली होती. त्यामुळे तो तीला टाळु शकत नव्हता. त्यांचे संबंध सेवानिवृत्ती पर्यंत तीच्या सोबत फार मधुर होते.
आता तो सेवानिवृत्त झाला होता. लहानपणीचे सोबती अर्थात त्याच्या वर्गमित्रांणी मित्र-मिलन कार्यक्रम ठेवला होता. त्यात त्यांनी सर्वच वर्गमित्रांना बोलावले होते. त्या कार्यक्रमात पुन्हा त्याची भेट प्रथम मैत्रीनी सोबत झाली होती. दोघेही एक-मेकाला बघून आनंदी झाले होते. आपल्या मनातील खंत जागीच ठेवून एक-मेकाशी गप्पा –गोष्टी करीत होते॰ शेवटी त्यांनी आपल्या जीवणात, त्यांचा संपर्क टुटल्या नंतरच्या घडलेल्या घटना, त्यांनी एकमेकाशी शेअर केल्या होत्या. तीला दोन अपत्य होती. तीचे पति हे एक न्यायाधीश होते. त्याचा पण अकळी मृत्यु हृदय विकाराने झाला होता. दोघांचे डोळे ओलवले होते. नियती समोर सगळेच पांगळे होतात !, त्याची त्या दिवशी खात्री पटली होती.
त्याला नेहमी जुन्या आठवणी येत होत्या. त्याला नेहमी वाटायचे की सर्व जुन्या मित्र-मैत्रीनीना भेटावे असे वाटत होते. पण ही इच्छा त्याला नेहमी साठी त्यागावी लगाली होती. जेव्हा त्याला आपल्या डॉकटर मैत्रीनी विषयी माहिती मिळाली होती. तीचे लग्न एका डॉकटर सोबत झाले होते. लग्नानंतर त्यांना एक संतती झाली होती. पण तीचा संसार दीर्घ काळ टिकु शकला नव्हता. त्यांच्यातील मतभेद इतके टोकला गेले होते की शेवटी त्यांनी घटस्फोट घेतला होता. तीने शेवटी त्याच शहरात स्वःताचा दवाखाना उघड़ला होता. व ती आपल्या मुलाचे भविष्य घड़वित होती. त्याचा मनावर एक मनोवैज्ञानिक परिणाम झाला होता की ज्यांच्या विषयी त्याला आफुलकी वाटत होती. त्यंच्या सोबतच कां अशा वाईट घटना घटल्या गेल्या होत्या. त्याच भीतीने त्याने कधी कोणाशीही संपर्क करण्याचे कधीच धाडस केले नव्हते. त्या सर्व मैत्रीनींना,त्याच्या मनात काय होते. ते त्याच्या डोळयात स्पष्ट दिसत होते.त्याचा अनुभव त्यांना त्याच्या शारीरिक भाषेवरुण दिसत होते। पण ते त्याच्या होठावर कधीच आले नव्हते.तेच त्याच्या जीवणातील त्याचे मुख्य अपयश म्हणावे लागेल !.
