साम्राज्य
साम्राज्य
देवसेना आज नटून थटून महालात वावरत होती कारण आज तिचा वाढदिवस होता त्या साठी रात्री बाहूबली कडून पार्टी ठेवण्यात आली होती देवसेना परत परत आपला मोबाइलवर लक्ष मारत होती तिला रिप्लाय करायचा होता व्हाट्सअँप फेसबुक इन्स्टा वर तिचे फोल्लोवेर्स खूप होते देवसेनेच्या वाढदिवस निमित्त तयारी चालू होती महालाच्या हॉल मध्ये सोहळा पार पडणार होता डेकोरेटर आपली मांडवाल करत होते आचारी हि अनेक डिशेस बनवण्यासाठी तयार होते
संध्याकाळ होत आली देवसेनेला तयार करण्यासाठी ब्युटी पार्लर मधून मंडळी आली एव्हडी जय्यत तयारी पाहून देवसेना मनातून खूप खुश होती आपल्यावर बाहुबली एवढे प्रेम करतो हे विचार करून च तिला मनातून आनंद होत होता पण खरी उत्सुकता तिला बाहुबली काय गिफ्ट देणार हि होती नक्कीच तो काहीतरी भारीच देणार हे तिला माहित होते म्हणून ती मनातून लाजत होती
संध्याकाळचे ७ वाजले सगळी मंडळी उपस्थित होती कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी सिंगर आले होते गाण्याने कार्यक्रमाची सुरवात झाली महल अगदी रोषणाईने सजून गेला होता बाहू बली सगळ्याचे स्वागत हसत करत होता टाळ्यांच्या कडकड्यात देवसेनेचे आगमन झाले देवसेना आज परीच दिसत होती बाहुबली तिला पाहून थोडा भारावून गेला पण लगेच सावरत त्याने देवसेना शेजारी उभा राहिला केक हि मस्त तयार केला होता देवसेनेने केक कापला मग शुभेच्छा आणि गिफ्ट्स देण्यासाठी रांगा सुरु झाल्या त्या पहिली बाहुबली ने माईक हातात घेतला आणि तो सुरु झाला
"इथे उपस्तिथ असलेल्या सर्वांचे मी आभार मानतो आज माझ्या देवसेनचा वाढदिवस तुम्ही सर्वानी इथे येऊन कार्यक्रमाला शोभा आणली ह्या खास दिवशी मी बाहुबली आपल्या देवसेनेला काहीतरी गिफ्ट देण्याचे ठरवले आहे आणि ते म्हणजे "आणि त्याने देवसेनेकडे पाहत म्हटले "देवसेना आज पासून हे माझे सारे साम्राज्य तुच्या नावावर होत आहे "हे ऐकताच देवसेने सह सगळेच अवाक होऊन पाहू लागले.
