सामान्य प्रेमाची असामान्य गोष्
सामान्य प्रेमाची असामान्य गोष्


तो आणि ती घरात कधी पासून आतुरतेने वाट पाहत होते.सगळे घराबाहेर पडण्याची ! सगळे नसतानाच फक्त ठरलं होतं त्यांच ! मुलांना ती शाळेच्या बस पर्यंत सोडून आली. सासूबाईंनी नाश्ता खायला सुरूवात केली म्हणजे खाऊन निघतीलच त्याही थोडया वेळाने ! तिकडे तिचा नवरा ऑफिसला जाणारच हे दोघांनी हेरलं !
एकेक माणसं घरातून निघून जात होती,तशी दोघांच्या हृदयाच्या ठोकयांची गती अजूनच वाढली ! उत्कंठ मनापासुन शरीरापर्यंत मंदपणे वाहत साद घालत होता ! आणि..............ती वेळ आली........ज्याची दोघेही मनापासुन वाट पाहत होते. ती लाजून बालकनित गेली.........तो ही तिच्या पाठून चुंबकासारखा ओढला गेला......ती पाठमोरी ऊभी होती.........त्याने त्याचे दोन्ही हात तिला न स्पर्श करता ,तिच्या भोवती एका सुरक्षा कवचा सारखे बांधून टाकले........दोघेही पाठमोरे ऊभे,बालकनी लगतच्या लोखंडी सळयांना लागून ऊभे ! कितीतरी वेळ असाच गेला.......अबोल शांततेत.......ती त्याने न स्पर्शताच मोहरून गेलेली......हृदयाची धडधड एका विशिष्ट पद्धतीने,विशेष गतीत धडधडत होतीच. तो फक्त जवळ ऊभाच होता, तर तिची ही अवस्था झाली होती,त्याने मिठीत घेतलं असतं तर........?हया विचारानेच ती इतकी शहारत राहिली ना की? ................हवे हवेसे विचार डोक्यात पिंगा घालत होते.........असं......तसं............इश्श्य ऽऽऽऽऽऽऽऽऽ !
तिने त्याचा हात हातात घेऊन शांततेला तिलांजली दिली होती. ती म्हणाली....ए तुला आठवतं? पहिल्यांदा तु माझे डोळे पुसले आणि तो स्पर्श आजही मी जतन करून ठेवलेला आहे......माझ्या मनात.......कसे भेटलो ना आपण..? अनपेक्षित ?
मग एकेक दिवस करत ,नेहमीचचं झालं आणी मी घाबरून रडणंच बंद करून टाकलं...! कारणं डोळे पुसणारा दिसतंच नव्हता मला !
हो ! तो म्हणाला ! मला तेच हवं होतं,तुझं रडणं थांबवायचं होतं मला,आणि चेहऱ्यावर हसू बघायचं होतं तुझ्या.....! काय बघितलं तु रे ? माझ्यात? तेच जे इतरांना दिसलंच नाही तेच........तुला प्रेमाची आस होती आणि मला प्रेम करण्याची हेचं..........ह्या आधी तु कुणावर? किती वेळा ट्राय केल होतंस ? ती म्हणाली.....तूच पहिली आणि शेवटची......फक्त तूच.........! ती गालांत खूप गोड हसली आणि तिच्या गालावरची खळी अधिकचं खुलली !
मग ...तु ...तयार आहेस ना ग ? तो म्हणाला ! तु घाबरणार तर नाहीस ना ? आणि लांब नाही ना जाणार माझ्या पासून ? कधिही नाही.....! कधीच नाही ! तुला तर माहीतच आहे माझ्या नवऱ्याचं माझ्यावर प्रेमच नाही आहे ! त्याचा तु मुक साक्षीदारही आहेस ! तो फक्त सगळया गरजा पूर्ण करतो जगण्यासाठी च्या !बाकी शुन्य! खुपदा बोलूनही पाहिले,पण लक्षचं नाही देत ,पण म्हणुन नाही हं ?मी तुझ्या वर प्रेम करते ?........तु खुप काळजी घेतोस माझी आणि माझ्या मनाचीही ! आणि मलाच नाही कळलं, मी तुझ्या प्रेमात कधी पडले ते ? आणि तुझीच झाले, तुझिच राहिन ......पण मला एकदा बघायचं आहे तुला......फक्त एकदा...........ये ना मनुष्य रूपात.......माझ्या साठी.........!
ठीक आहे, माझा विश्वास आहे तुझ्यावर.........डोळे बंद कर......आणि मी सांगेन तेव्हाच ऊघड....? आणि तुला माझी अट माहीत आहे......तु मला बघून किंचाळशील ......? तर...? मी कायमचा अदृश्यच राहिन आणि माझ्या दुनियेत.........जिथे फक्त आत्मे वसतात.....कायमचा तिकडे निघून जाईन ?.......मंजूर आहे मला !....तू तुझा चेहरा दाखव ! आणि लक्षात ठेव !......मी तुझ्यावर प्रेम करते.....तुझ्या चेहऱ्यावर नाही ?
डोळे बंद कर ......१.....२.......३...! उघड डोळे....? तिने हळूच डोळे उघडले आणि समोर त्याचा भयानक ,छिन्न विछिन्न रक्तबंबाळ अवस्थेतला चेहरा आणि शरीर पाहिलं..........पण ती किंचाळली नाही......त्याची अवस्था बघून ती रडत म्हणाली......काय ? काय झालं होतं ? कसं लागलं तुला एवढं ? एवढ्या जखमा...? कसं सहन केलं तू एवढं सगळं..?
तिने तिचा हात हळूवार त्याच्या चेहऱ्यावरून फिरवला जणू काही ती एका औषधांच काम करत होती.......आणि हळूहळू त्याच्या जखमा नाहिशा झाल्या........तो मरणा आधी जसा दिसायचा तसाच पूर्ववत झाला......हया फ्लॅटचं छप्पर कोसळलं माझ्यावर .....होतो त्या जागेवर गतप्राण झालो....मग माझ्या मरणानंतर सगळं कुटुंब हा फ्लॅट विकून नविन घरात गेलं.....मी मात्र इथेच भरकटतं राहिलो.........आणि तु भेटलीस.............मी अतृप्त होतोच... तु सुध्दा होतीसं ! आणि ही शारिर गरज आहे असं नाही ? मनालाही गरज असते प्रेमाची !तुझं मन शुष्क होतं,आणि मी तो ओलेता पाऊस घेऊन आलो एवढंच ! तिने हाय हॅण्डसम् म्हणत त्याला घट्ट मिठी मारली....मग काय एक भटकती आत्मा आणी एका मनुष्याचा आत्मा एकमेकांशी जुळला गेला .....आणि ते दोन एकरुप आत्मे एकमेकांच्या शुध्द प्रेमाच्या मिठीत घट्ट विसावले !