Shila Ambhure

Inspirational

4  

Shila Ambhure

Inspirational

रोषणाई

रोषणाई

1 min
217


गावाबाहेरील नवीन प्रशस्त बंगल्यामध्ये आज मी दिवाळी साजरी करीत होते. अख्ख्या बंगल्याला चमचमणारी लाईटिंग लावली होती. तो झगमगाट पाहून मी मनोमन खुश होत होते. आजूबाजूला मनुष्यवस्ती नव्हतीच. हाकेच्या अंतरावर एक झोपडी होती. तिथे पाच पणत्या तेवत होत्या. मी जरा तुच्छतेनेच तिकडे पाहिले. तितक्यात वीज गेली आणि प्रशस्त बंगला अंधारात गडप झाला. घाबरून मी इकडेतिकडे पाहिले तर ती झोपडी पणत्यांच्या प्रकाशात उजळून गेली होती. जणू स्मित हास्य करत मला वाकुल्या दाखवत होती.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational