शब्दसखी सुनिता

Romance Fantasy Others

3  

शब्दसखी सुनिता

Romance Fantasy Others

रंग हे प्रेमाचे

रंग हे प्रेमाचे

5 mins
269


समीर हुशार, महत्वकाक्षी, मेहनती मुलगा होता. आपल्या बुध्दीमत्तेच्या रोजावर त्याने चांगल्या कंपनीत जाॅब मिळवला होता. तो आपल्या आई-बाबां सोबत पुण्यात राहायचा. तो आपल्या पालकांसोबत खूप आनंदी होता. तो एकटाच होता. लाडात वाढलेला होता. तो लहानपणापासून फार अबोल होता. त्याच एक वेगळच विश्व होतं. आता त्याचं लग्नाचं वय झाल होतं. आईला त्याची काळजी वाटायची... समीर अजुनही कोणत्याच मुलीच्या प्रेमात पडलेला नव्हता... त्याच्या मनाला अजून तरी कुठली मुलगी क्लिक झाली नव्हती.एकदा समीर ऑफीसवरून येत असताना वाटेत थांबला... तर छोटीशी जागा होती. साईडला झोपडपट्टी होती... तिथेच एक सुंदर मुलगी, पंधरा ते वीस मुलांना शिकवत होती. कधी न मुलींकडे बघणारा समीर तिथेच थांबला... ती मुलांमध्ये रमून गेली होती शिकवण्यात आणिहा तिला पाहतच होता... मध्येच ती आपलेडोळ्यांवर येणारे केस सावरत होती... समीरलाही मुलगी खुप आवडली. पण कोण ? कुठलीआणि तिच नाव वगैरे काहीच माहीत नाही...


पाच मिनिटानंतर तो तिथून निघाला. पणआज त्याच्या चेहर्‍यावर एक वेगळीच स्माईलहोती... ती भेटल्याची.... दिल चुरानेवाली...तिच्या विचारांतच समीर घरी पोहचला.आई बाबाही त्याला इतक खुश पहिल्यांदाचबघत होते. समीरच्या घरी आज त्याचे वडीलांचे मित्र आणि त्यांची मिसेस येऊन गेल्या होत्या.त्यांनी त्यांच्या मुलीविषयी सांगीतल होत. तेत्यांना समीरला सांगायच होत म्हणून त्यांना चैन पडत नव्हत. समीर त्या स्वप्नपरीमध्ये हरवून गेला होता. सकाळी ऑफीसला जाताना तीच कालची मुलांना शिकवणारी मुलगी त्यालापरत रस्त्याच्या साईडला दिसली. समीरला कळत नव्हत की हे काय होतय त्याला ? तीखरच आली आहे का ? की भास होतय मलाम्हणून तो हाताला चिमटा देखील काढतो...त्याने गाडीची काच खाली केली तर खरच तीसमोर एका आजींना काहीतरी भरवत होती.त्या आजींशी बोलताना त्यांना भरवताना दोघींच्या चेहर्‍यावरील आनंदाने समीर भारावून जातो...ती मात्र त्या आजींना स्माईल करून निघून गेली.समीरही त्याच्या ऑफीसला निघून गेला. तो आज खूप कामात बिझी होता. पण संध्याकाळी जेव्हातो ऑफीसमधुन निघतो... तेव्हा आपोआप त्याचीपावले तिकडे वळतात...


आजही ती मुलगी आली असेल का मुलांना शिकवायला...??तर ती त्याला आजही तिथेच मुलांना शिकवतानादिसली. त्याला तिला पाहील्यावर दिवसभरकामाचा थकवाच दूर पळून गेला... समीर तिलाबघितल्यावर छान वाटत होत. माहीत नाही तिच्यात अशी काय जादू होती. पण ती सर्वांच्याचेहर्‍यावरच आनंदाच कारण होती. जे समीरनेतिला पाहील होत. समीर आज आनंदात घरी आला होता. तो गुणगुणत फ्रेश व्हायला निघूनगेला. समीरच्या आईने त्याच्या बाबांनासांगितल की  " आपण आजच प्रकाश भावोजींचीमुलगी चांगली संस्कारी आणि शिकलेली आहेचांगली त्याला सांगुन टाकू... त्याचे बाबाहीहो म्हणतात....समीर खाली हाॅलमध्ये आला. आईनेत्याच्या जवळ लग्नाचा विषय काढला. आतातरी नाही म्हणू नको अस सांगितल. त्यालाआईची त्याच्याबद्दलची काळजी, प्रेम दिसत होतं. तर त्यांनी प्रकाश अंकलची मुलगी आहे. आपण दोन दिवसांनी त्यांच्या घरी जाऊनबघुन येऊया अस सांगितल.... तुला मुलगीपटली, तुला आवडली तर आपण पुढे बोलू...तर तो तयार होतो... पण प्रकाशने हो म्हटलपण त्याच मन अजुनही त्या मुलीमध्येच अडकलहोत. तो तिला रोज मुलांना शिकवताना वगैरे बघायचा. पण आता ते शक्य नाही... कारणआईबाबांना नेहमीच समीरने नाही लग्नासाठीनाही म्हटलेल.... त्यामुळे ते ही नाराज व्हायचे.पण आज पहिल्यांदा त्याने हो म्हटल मुलगीबघायला आणि त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद त्याला कायम बघायचा होता... तो काही बोलूशकला नाही.समीर नकळत त्या मुलीच्या प्रेमात पडलाहोता.


आज ऑफीस सुटल्यावर तो तिला लास्टएकदाच बघायच आणि यापुढे विसरायचठरवतो... तो त्याच जागेवर जातो... बघतोतर तिथे दुसरी मुलगी मुलांना शिकवत असते.समीर बराचवेळ वाट बघतो पण ती मुलगी जीरोज त्याला दिसते ती आलेली नसते...तो त्या दुसर्‍या मुलीला विचारायला जाणारतेवढ्यात घरुन त्याला फोन येतो... आईचाकाॅल असतो. " समीर अरे कुठे आहेस, आम्हीदोघे तयार होऊन तुझी वाट बघतोय. आजआपल्याला प्रकाश अंकलच्या घरी जायचय."त्याला काय बोलाव हेच कळेना... आईने त्यालासांगीतलेल तो विसरला होता." हो आई निघालोच, वाटेत जरा ट्रॅफीक होतपोहचतोच... " म्हणून त्याने फोन ठेवून दिला.तिथे तो त्या मुलीविषयी विचारणार होता पणआता त्याला शक्य नव्हत. तो तसाच माघारीफिरला.... त्याला अस का होतय ? हेच कळतनव्हत. पण ती आज एकदा बघायच होत तीभेटली नाही म्हणून हा नाराज झाला. आतापरत या रोडने कधीच नाही यायच हा ठरवतो.तो घरी येतो. फ्रेश होऊन तयारी करून त्याच्याआईबाबांना घेऊन जवळच राहत असलेल्याप्रकाश अंकलच्या घरी गाडीने पोहचतात.मोठ प्रशस्त बंगला होता. आता गेल्यावरसमीरला पहिल्यांदा बघुन प्रकाश अंकलनेमिठी मारली... " कीती मोठा झाला आहेसलहान असताना पाहीलेल म्हणुन... त्यानेहीत्या दोघांना नमस्कार केला. पाहुण्यांच छानस्वागत केल. सर्वजण गप्पा मारत होते.समीरच्या बाबांनी आधीच सांगीतल होत कीसमीरला तुमच्या मानसीला भेटायला आणतोयम्हणून... समीर तिथे असलेल मासिक उगाचचाळत बसला. इकडच तिकडच बोलणझाल्यावर त्यांनी मानसीला खाली यायलासांगितल....


मानसी वरून खाली तिच्या आईसोबत येताना दिसली.... खुपच सुंदर दिसतहोती ती साडीमध्ये, पिंक कलरची साडी आणीसाईडने गोल्डन कलरची बाॅर्डर, सर्व काही त्यावरमॅचींग... मोकळे सोडलेले तिचे केस अजुनतिच्या सौंदर्यात भर घालत होते. आधीच रंगांनेगोरीपान असणारी मानसी आज या लुकमध्येसुंदर दिसत होती. ती वरून खाली येतानासमीरची नजर तिच्याकडे गेली...तिच्याकडे बघून तो आश्चर्यचकीत झाला..." अरे ही इथे कशी काय ? मला भास तर होतनाहीत ना.... ? त्याला खरच आता काहीचकळत नव्हत काय चाललय, मगाशी ही भेटलीनाही एकदा आज लास्ट म्हणुन दुःखी झालेलासमीर तिला एकटक पाहतच होता... नेमकहेच आईबाबांनी बघितल... त्यांना समीरच्यानजरेतुन दिसल होत की याला मानसी आवडलीम्हणून.... मानसी समोर आल्यावर तिने त्याच्याआईबाबांना भेटली, त्यांच्याशी बोलली... त्यांनाखुप छान वाटल. तिचा स्वभाव त्यांना आवडला.समीरला तर मनातुन खुप आनंद झालेला होता.समीरला आणि मानसीला दोघांनाएकमेकांसोबत बोलण्यासाठी बाहेर पाठवल.तेव्हा दोघांनाही काय बोलू नि काही नाहीसमजत नव्हत. समीरने तिच्या मनाची अवस्थाओळखली... त्यानेच तिला  " तुम्ही तिथे मुलांनाशिकवता का विचारल ? " त्याने अस विचारलम्हणून तिलाही आर्श्चय वाटल.हो. मी मानसी शाळेत शिक्षिका आहे आणिया मुलांना शाळेत यायला जमत नाही तरअशांना संध्याकाळी मी तिथे जाऊन शिकवते.पण तिने तुम्ही कधी मला पाहील अस विचारलअसता समीरने सगळ त्याच्या मनातल तिच्यासमोर व्यक्त केल. त्याचा हा प्रामाणिकपणाआणि स्वभाव मानसीला खुप आवडल. समीरनेही मानसीच ती करत असलेल्या कामाबद्दल तिच खुप कौतुक केल. आणि तिलालग्नासाठी होकार दिला... तिनेही त्याला होकारदिला... त्यांच्या दोघांच्या निर्णयाने दोन्हीकुटुंबांना खुप आनंद झाला...


मानसीच्या येण्याने समीरच्या आयुष्याला बहार आला... सगळ्यांना आनंदाच्या रंगात न्हाऊनी टाकणारी मानसी समीरच्या आयुष्यातही आनंद घेऊनी आली... समीरच्या मनासारखं झालं होतं. ती ही त्याच्या प्रेमाच्या रंगात न्हाऊनी गेली होती... दोघांच्याही चेहर्‍यावर मनासारखा जोडीदार मिळाल्याचा आनंद दिसत होता...जो त्यांना एकत्र प्रेमाच्या धाग्यात बांधुनठेवणार होता..." आयुष्य हे चित्रासारख आहे ....मनासारखे रंग भरले की ते फुलपाखरासारखे दिसते...."


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance