रात्र वैर्याची (1)
रात्र वैर्याची (1)
छे,,,, या पावसाला पण अत्ताच यायच होत,,? नेहमी नको त्या वेळीच का येत असेल हा पाऊस..? नको तीथेच पडतोय एखाद्या खोडकर माणसासारखच वागतो हा. स्वतःशीच पुटपुटत सौम्या छत्री उघडत ऑफिसच्या बाहेर पडली.
आजच नेमक बॉसलाही सगळ काम पुर्ण हव होत. नको ती झंझट नुसती.
अता या पावसात कशी जाऊ मी एकटी घरी..?
चिऊ पण एकटीच आहे. बेचारी वाट पाहत असेल. फोन पण खराब आहे तीचा काही contact करायचा झाला तरी कसा करावा..?
घरी तर जावच लागेल पण या भयान काळोखात..? त्यात हा पाऊस,,,,
देवा वाचव रे बाबा.. काही तरी मार्ग कर मोकळा atlist हा पाऊस तरी थांबवच..
जरा चिडूनच तीने नाक तोंड मुरडले आणि तीच्या scooty च्या डिक्कीत पर्स,टिफीन ठेवत एक नजर ईकडे तिकडे कटाक्ष टाकत अरे कोणीच नाही रोडला.
एकटीने कस जावं..?
सौम्या खूप घाबरली होती.. छत्री घेउन गाडी तरी कशी चालवणार.? जाऊदे छत्री ठेवूनच देते.. जाउयात भीजत म्हणत तीने छत्री ठेवून दिली.
आणि ओढणी कंबरेशी बांधून
scooty start करून ती रोडला लागली..
रात्रीची ती निरव शांतता, पावसाचे कुंद वातावरण आणि सारखीच सुरू असलेली रिपरिप त्यातच भरीतभर त्या रातकिड्यांची कर्णकश अशी किर्ररर,,,किर्ररर.. ! किती भयानक आहे हे सगळ..?
मध्येच पाल्या पाचोळ्यात धप्प,,,दबक,,अवाज ऐकू येत होता.
या अशा भयान वेळी ती एकटीच अगदीच बिचकत (घाबरत) गाडी चालवत होती..
त्या आजुबाजूच्या आवाजाने सौम्या पुरती घाबरून गेली..!
हळू-हळू ती सिटीच्या बाहेर पडली आणि सिटी बाहेर असलेल्या घनदाट झाडीतून गर्द त्या वणराईतून जाणार्या रोडला लागली.. एरवी तीला आवडणारा तो निसर्गरम्य परिसर तो घनदाट झाडीतून जाणारा रस्ता खूपच मनाला भावणारा, तिच्या आवडीचा पण अता मात्र त्याचे ते भयानक रूप तिला खूपच घाबरवत होते..!
मनात लाखो विचारांचे काहूर माजले होते.. त्या भयान काळोखाला चिरत तिच्या scooty चा प्रकाश पुढे पुढे सरसावत होता. पावसात भीजून ती थंडीने कुडकूडून गेली पण करणार काय..?
घाबरत-घाबरत ती बरेच अंतर कापत त्या घनदाट झाडीतून बाहेर पडली..! हात पाय थरथरत होते, पावसाने अधीकच जोर धरला विजांचा कडकडाट आणि, आणि ढगांचा गडगडाट काळीज कापणारी ती भयान रात्र अशात कुठे थांबायच म्हंटल तरी काहीच पर्याय नही. कारण कुठे आश्रय घ्यायला कोणतीच जागा वा पर्याय त्या घनदाट जंगलात नव्हता.
तो जंगलाचा रस्ताच आजुन निम्मा संपायचा होता. या सगळ्यात तीला काळजी होती ती फक्त घरी असलेली तिची 15 वर्षांची चीऊ.. दोघी माय लेकींचच वास्तव्य होतं त्या घरात.
चिऊचे पप्पा ह्मंमम त्यांची तरी काय आठवण काढावी यावेळी जबाबदारी म्हणून कधी समजले असते तर अशा परिस्थितीत ह्या वाळवंटात एकटीला सोडून गेलेच नसते. सौम्या उगाचच संतापते आणि गाडी अधीकच पळवण्याचा प्रयत्न करते.
ईतका वेळ जाऊनही एक ही गाडी आपल्याला भेटली नाही. काय माहित काय झाले पण अचानकच काळजाची धडधड का वाढली..? ही बेचैनी का होतेय मला अचानक..?
काही घडणार आहे का..? नाही काही तरी तर नक्कीच होणार आहे, ही धडधड..? हे, हे जनू काही वाईट घटनेचे संकेतच आहेत.
का कुणास ठाऊक तीला या अशा विचारांनी घेरल ती खुपच अस्वस्थ झाली. भेदरल्या हरिणी सारखी तीची मान इकडे तीकडे फिरली काळीज कापणारी ती भयान शांतता तीला अधीकच भयान वाटली. गाडीचा स्पिड वाढवत ती थोडीच पुढे गेली आणि, आणि हे काय..? मला काहीच दिसत नाहीये,,,,,!
अचानक समोरून येणार्या एका चारचाकीचा लख्ख प्रकाश सौम्याच्या डोळ्यांवर पडला.
त्या प्रकाशाने तिला समोर काहीच दिसेना झाले.
,, ,,,, ती घाबरली अंगाचा थरकाप उडाला मनात माझलेलं लाखो विचारांच काहूर आणि त्या चिऊची चिंता या सगळ्यात ती भांबावून सौम्या त्या लख्ख प्रकाशाच्या दिशेने भरघाव वेगात जात राहीली आणि, आणि तेवढ्यात, खर्ररररर,,,,,,, खर्ररररर,,,,,, गाडीच्या ब्रेक्सचा कर्णकश अवाज झाला.
समोरून येणार्या चारचाकीच्या प्रकाशाने तिचा रस्त्याचा अंदाज चुकला असावा..!
क्रमश:
धन्यवाद
