STORYMIRROR

Ganesh Phapale

Romance Tragedy Others

3  

Ganesh Phapale

Romance Tragedy Others

मोहर त्या पावसाची

मोहर त्या पावसाची

9 mins
219

                    "किती सुंदर पाऊस पडतोय.! वाह आज कधी नव्हे किती तरी वर्षांनी मनसोक्त भिजायला मिळाले.. अर्थात ठरवून नसले तरी अचानकच का होईना पण भिजनं झाल हे महत्वाच.." त्या रिमझीम पावसाचा अनंद घेत शंतनु स्वतःशीच बडबडत निघाला...

 

नेहमीच या पावसाने त्याला वेड लावलय.. "पण अता वयाचा आणि सोबत समाजाचा विचार करता ते, तसं मनसोक्त बागडताच येत नाही राव. अरे पण बागडत ही असलो तर समाजाची पर्वा आपण का करावी...? हे जिवन आपलं आहे, हा प्रवास आपला आहे.. जगणं आपलं आहे आणि, पावसात भिजण्याची अवड ही आपलीच आहे.. मंग समाजाची भिती मनात मी का बाळगावी..? आणि कोणत्या वयात काय करायला हवं हे ही ठरवून का वागावं...? नाही मला आज पुन्हा लहान व्हायचय आणि या सुंदर,प्रेमळ पावसाशी हितगुज करायचय.. "

              एकटाच बडबडत शंतनु त्या पावसात आपले बाहु( हात) फैलावून मनसोक्त अनंद घेत होता.. मध्येच दोन पावले चालत पुढे पुढे ही जात राहिला...

"यार आज किती तरी दिवसांनी असा जिवनाचा अनंद मिळतोय.. अशा वेळी एक कडक चहा मिळायला हवा होता.. " असे म्हणताच समोर त्याला एक चहाची टपरी दिसली..." वाह आज वरचा फारच खुश दिसतोय माझ्यावर, पाऊस मागितला तो मीळाला, चहा म्हणताच चहा ही हजर..! वाह,!वाह,!उपरवाले.." म्हणत शंतनु चहाच्या टपरीत शिरला.. 

"भैय्या एक कडक स्पेशल चहा

आणि एक 'गरम'सिगारेट देरे.. आज किती तरी दिवसांनी या सिगारेटची अठवण झालीय.." सिगरेट विषयी मनातच तो बालला...

"हो सर लगेचच... काय सर खुपच खुश दिसतायत..? आणि काही तरी घ्यायच की,पुर्ण भीजलात.." टेबलवर चहा,सिगारेट ठेवत चहावाला भैय्या बोलला..

" अरे आज किती तरी वर्षांनी असा मनसोक्त भिजलोय या पावसात.. याचाच हा अनंद आहे.. आणि काही घ्यायचच म्हणशील तर ते मला पाहिजेच नव्हतं रे.. आज फक्त भिजायचच होतं.."

"काय सर..? अता हे भिजणं आणि हा पाऊस सहण होणारा आहे का..? ते दिवस गेले हो आपले भिजायचे, बागडायचे.." भैय्या जरा विचारात गुंतत बोलला..

"असे काही एक नाही, कोण बोललं त्या त्या वयातच भिजायचं बागडायचं..? आणि तब्बेतीच काय रे, नाही भिजलो तरी ही ती अस्वस्थ आहेच की. कधी हात दुखेल, कधी पाय दुखेल.. त्या दुखण्याची ही परवा नाही रे.. इथे आजच्या दिवसाच सुख घ्यायचय हा विचार मनाचा पक्का आहे.. मंग बाकी कशाचीच फिकीर मला नाही.. आज या पंचेचाळीशीत हा दिवस जगायला मिळाला हेच खुप आहे.. काय सांगाव पुढे मिळेल न मीळेल..." शंतनु ही सिगारेटचा एक झुरका घेवून आपल्याच विचारात दंग झाला..

            चहा सोबत कधीतरी घेणारी ती सिगारेट निम्मीच संपली आणि, त्याला त्याच्या तोंडातुन ती अर्धी ओढून फेकलेली सिगारेट आठवली...

            " काय रे कितीदा सांगितले तुला smoke🚬 नको करत जाऊस म्हणून..? पण नाही तुला ऐकायचेच नाही ना..?

तुला ना काळजीच नाही.."

"अग हो हो... मी रोज रोज थोडी न घेतो शोना.. आजच तर किती दिवसांनी घेतली ग.. ते ही तुझी वाट पाहत. तुझ्या शिवाय हे क्षण खुपच भयान जातात ग. जिव नकोसा होतो. का कुणास ठावूक कसलीशी भिती मनात असते.. काय होतं कळत नाही पण तु दिसत नाही तोवर मन अस्वस्थच राहतं बघ... मला न तुझ्या शिवाय एक, एक ही क्षण नको आहे ग.. आणि मंग तुझ्याच विचारात मन अस्वस्थ होऊन गेलं म्हणून घेतली ग.."

" हा हा... पुरे तुझ पुरान, माहितीये मला.. मी काय तुझी सिगारेट आहे का...? जी मी नसेल तेव्हा तुझी सोबत करते..? "

            आज का कुणास ठावूक तन्वी इतकी चिडली.. तशी एरव्ही ही चिढत असतेच पण लटकं रूसण वा तो नखरा समजतोच की...

"बर बाबा या पुढे कधीच कधीच नाही घेणार मी ही सिगरेट. या वेळी माफ कर दे न शोनु.. I m really sorry" कान पकडत शंतनुने अगदीच केविलवाने तोंड करत तिच्यासमोर गुडघ्यांवर बसला..

" गप रे शंतु अता हे नखरे नकोस करू हा प्लिज.. मला ना वैताग अलाय खुप.."

"अग पण झालय काय नेमकं...? तुझ इतकं चिढणं..."

शंतनुच बोलणं पुर्ण होण्या आधीच "हो हो तु काही केलच नाही.. मलाच विचार, झाल काय म्हणून..." ती अधिकच तापली आणि तीने दुसरीकडे पाहत मान फिरवली..

"ए ए तन्वी,.! अग झालय काय नेमकं तुला..? हा हा जो राग आहे ना तुझा, हा सिगारेटवरचा नाही आहे गं.. तितकं तर ओळखतोच मी तुला..आणि आपल्या प्रेमाची शप्पथ ग खरच मरेन पण त्या सिगरेटला हात नाही लावणार.. पण तु अशी रूसु नकोस ना प्लिज.. मला नाही सहण होत ग तुझ अस रूसणं. तुला माहित आहे ना चांगलं...? तुझ अस जवळ असुन लांब होणं, तुटक तुटक वागणं नाही ग सहन होत..." तन्वीच्या हनुवटीला हात लावुन तीची मान फिरवत शंतनु अगदीच भावूक होऊन बोलला...

                  "हेच, हेच तुझ मला पटत नाही आहे शंतनु.. एकिकडे माझ्यानावाने सिगरेट ओढतोस आणि दुसरीकडे हे असे बोलतोस... मला कळत नाही रे कस होईल तुझ...?    

                   काल घरी पाहुने आले होते मला बघायला.. आणि त्या मुलाने होकार दिलाय रे.. आणि माझ्या घरचे सुद्धा कळवतीलच होकार.. कारण नकार द्यावं अस काहिच आणि कुठलेच कारण नाही आहे रे.. मुलगा छान शिकलेला आहे. कुठे तरी उच्च पदावर नोकरी ही करतोय.. छान पगार घेतोय,घरी नौकर चाकर. सगळ सगळ आहे.."

                  "एव्हान शंतनु तन्वीच्या पायाशी खाली टेकला होता.. जणू ही धरती दुभंगलीय, अकाश कोसळलय असच काहिस त्याला वाटत होतं.. हात पाय कापत होते..डोळे क्षणात डबडबून गेले.. ओठ थरथरले हजारो प्रश्नांनी मनाला वेढा घातला.. लाखोचे शब्द विणनारा तो आज एक एक शब्द मोठ्या मुश्किलीने ओठांवर आणन्याचा प्रयत्न करू लागला. आणि शेवटी "मंग तन्वी तु काय विचार केला...?" इतकच तो बोलु शकला...

" तु सांग ना मी काय करू...? तुला फक्त सिगरेट, प्रेम प्रेम इतकच माहित आहे. पण याच्या अधारे कस जिवण जगू शकतो...? फक्त प्रेमच्या अधारे नाही सगळ शक्य होत रे...? पण तु कधी बाकिच्या गोष्टींकडे लक्षच देत नाहिस.." तन्वीच्या डोळ्यांतुन पाणी वाहू लागलं.. तसा शंतनु ही अगदीच निशब्द होऊन बसला..जिच्यावर जिवापाड प्रेम केलय ती अता दुसर्या कुणाची होणार हा विचार मेल्याहुण मारणाराच आहे.. शब्द तरी कसे फुटतील त्याचे..? जिला तो स्वतःच आयुष्य बनवुन बसला आहे ती अता अगदी सहजच दुसर्या कोणाच आयुष्य सावरणार आहे..कसे हे तो सहण करू शकणार होता..? जि एक क्षण समोर नाही आली तरी अकाश कोसळाव अस होणारा तो, आज निशब्द तरी कसा होणार नाही..?

                 शंतनुच्या पायाखालची जमीनच दुभंगून गेली.. नजरेत फक्त आणि फक्त अश्रू दाटले होते.. ते मनभेदक धुके त्याला त्याचं एकट्याच तिच्याविणा अविरभाव झालेलं भविष्य दाखवू लागले.. काही क्षण ते शांततेतच गेले.. ना नजरा नजर होती. ना कोणता स्पर्श आणि,नाही अबोलपणाचे बोलके भाव.. काही वेळ तसाच जाऊन शंतनु उठला..त्याने स्वतःला सावरले. सावरतोय कसला..? एखादा पुरूष प्रेमात ढासाळला की एकतर त्याच आयुष्य बनतं नाही तर धुळिला मीळतं.. एकदा की त्याच्या डोळ्यांत अश्रू वाहिले की तो संपलेलाच असतो.. ती यातना, त्या वेदना त्याला फक्त आणि फक्त जिवंत सांगडा बनवुन ठेवतात.. सहसा पुरूष तेव्हाच रडतो जेव्हा त्याच्या हृदयाच्या जवळच कोणी त्याचा शेवटचा निरोप घेतो.. एखाद दुख: अभाळ कोसळावं अस अगदीच असहाय्य असेल तेव्हाच तो रडतो... आज शंतनुला ढायमोकलुन रडावसं वाटलं. पण तीतकं ते ही शक्य नव्हतं.. आज त्याला तन्वीला घट्ट अशी मिठी मारावीशी वाटली जी कधीच सुटणार नाही... पण आज तो सगळ्याच विचारांत हतबल झाला..

त्याने एक उंच श्वास भरला, डोळे बंद केले आणि सवयी प्रमाने खिशात हात घातले.. उंच श्वास भरत अकाशाकडे मान करत त्याने तो दिर्घ श्वास सोडला अर्थात् त्या नभाशी एक साद घातली आणि मनाच सगळ दुख: त्या असमंताकडे देऊ केलं.. आणि मागे फिरत तो तन्वीच्या रडवेल्या चेहर्याकडे पाहत......

"ना जिया ज़िन्दगी एक पल भी तुझसे होके जुदा, सुन ज़रा. बिन तेरे मुझसे नाराज़ था दिल तू मिली है तो कह रहा,

मैं तो तेरे रंग में रंग चूका हूँ ,,,!

बस तेरा बन चूका हूँ , मेरा मुझमें कुछ नहीं सब तेरा, मैं तो तेरे ढंग में ढल चुका हूँ, बस तेरा बन चुका हूँ,! मेरा मुझमे कुछ नहीं ..

सब तेरा, सब तेरा सब तेरा सब तेरा"

बस इतकच तो बोलु शकला आणि, अत्तापर्यंत मनावर ठेवलेला त्याचा ताबा सुटला... तन्वीच्या गळ्यात पडून तो शेवटी ढायमोकलुन रडला..

              "तुझ्या शिवाय मी मी नाही ग तन्वी.. मला थोडासा वेळ दे मी वाटेल ते करेल, पण काही तरी नक्की बनेल..आणि तुला माझी बनवेल.. या जगात तुला कोणीच माझ्यापासुन हेरावून नाही घेणार, बस मला थोडा वेळ दे.."

तन्वी निशब्द होऊन फक्त त्याच्या मिठीत स्वतःला सुरक्षित समजत होती.. पण तिच आज तिला सुरक्षित समजणं ही निष्फळच होतं...

बराच वेळ तशेच एकमेकांच्या मिठीत मनाने मनाशी जवळिक साधत ते राहिले, आणि पुढे तन्वी बोलते...

"फिर दिल के रास्तों पे तेरी आहट जो हुई, हर धड़कन जश्न में है, येह इनायत जो हुई .. मैं तो तुझे मिलके जी उठी हूँ,,तेरी धड़कन में छुपी हूँ ,, मेरा मुझमे कुछ नहीं ,,! सब तेरा, सब तेरा,सब तेरा, सब तेरा ..

जिस पल तू है साथ मेरे, उस पल में ज़िन्दगी है, तुझे पाके पाया सब कुछ कोई ख्वाहिश अब नहीं है..." आणि पुन्हा त्याला आपल्या मिठीत घट्ट करते..

एक ही क्षणाचा विलंब न करता शंतनु लगेचच..

             "मैं तो बस तुझसे ही बना हूँ,,! तेरे बिन मैं बेजुवां हूँ,! मेरा मुझे में कुछ भी नहीं.। सब तेरा, सब तेरा सब तेरा, सब तेरा,,,,,,,,,"

बराच वेळ असाच मिठीत जातो..

तितक्यात

 

"Hello... हा अवाज येतोय का...?

          मला यायला जरा उशीर होईल मी पावसात अडकलीये..."

एक लेडीज फोनवर बोलत त्या चहाच्या टपरीत शिरली.. आणि तिच्या त्या अवाजाने शंतनु त्या अठवणींच्या परड्यातुन दचकुणच बाहेर आला.. या सगळ्या आठवणींत त्याच्या हतातली ती अर्धी सिगारेट तशीच जळुन गेली.. त्याची तंद्री भंग झाली, नकळत पानावलेले डोळे त्याने मोठ्या चतुराईने पुसले.. आज तिच्या आठवणीं सोबत तो तना मनाने भिजुन गेला.. आज पाऊस ही बेभान कोसळला.. बाहेरचा मेघ ही आणि त्याच्या मनात, डोळ्यांत ही...

या सगळ्या विचारात त्याच्या पुन्हा तो अवाज लक्षात येतो आणि अरे हा अवाज....!

त्याची नजर भिरभिरली पण त्याला त्या महिलेचा त्याच्या विरूद्ध दिशेला असलेला चेहरा दिसेना.. "छे ती इथे कशी येणार..? मला ही त्याच त्या आठवणींनी भास व्हायला लागलेत.."

स्वतःवर हसत शंतनु खुर्चीतुन उठायला लागला..पण काय झाले कुणास ठाऊक त्याचा तोल गेला आणि तो खाली कोसाळला...

    

            अरे सांभाळून...! म्हणत ती गर्रररकन् मागे फिरली आणि, आ,,,, वासुन जागीच स्तब्ध झाली...

तीच हेअर स्टाईल...अगदी आज ही तशीच दाढी ड्रीम केलेली.. हातात तेच घड्याळ... डोक्यावर तेव्हा शाईन करणारे केस आज काहिसे पातळ झाले होते... त्याच्या हताकडे तीने जाणून पाहिले, आणि तिच्या डोळ्यांत पाणी तरळले....त्याने हाफ शर्ट घातल्याने त्याच्या हतावर तन्वी नाव आज ही तसच होतं.. ते पाहुन नकळतच तिच्या ओठांवर "शंतु..... " शब्द फुटले.... जणु दाही दिशा दणाणल्या.. चौफेर काही तरी धुमाकुळ उडावा..नाही, नाही शब्दच नाहीत त्या वेळेला मांडायला, ती वेळ शब्दबद्ध करायला.. खाली पडून सावरणारा शंतुन ही अगदीच स्तब्ध झाला. आज त्या भेटी नंतर किती तरी वर्षांनी दोघे समोर आले.. कशी मांडावी ती वेळ शब्दात...? अनंद होता पण तो व्यक्त करता येत नव्हता.. दुःख होतं पण मन हलकं करता येत नव्हतं... रडायचं होतं पण, पण ते ही जमत नव्हतं... तो तसाच पडून तिला पाहत राहिला.. तिने स्वतःला थोडे सावरले, हिम्मत करून पुढे सरसावली.. "कसा आहेस...?"

"हा काय असाच आहे.. धडपडतोय आयुष्य संपविण्यासाठी... माझ सोड तु सांग, तु कशी आहेस...?"

"मी,, मी ठिक आहे रे.. सॉरी त्या दिवशी नंतर माझ्या घरच्यांनी माझा मोबाईल,माझ बाहेर जाणं, सगळं सगळं बंद करून टाकलं होतं.. खुप प्रयत्न केले तुझ्यापर्यंत निरोप पोहचवायला.. तुझ्यापर्यंत यायला पण नियतीला ते मंजुरच नव्हतं बहुतेक.. माझे सगळेच प्रयत्न अयशस्वी झाले..." तिने अगदीच कसलाच विचार न करता गेली कित्येक दिवस मनात बाळगलेलं ओझ एकादमातच हालकं करू पाहिलं...

" जाऊदे ग त्या गोष्टी अता आज काहीच उपयोगाच्या नाही... सोड ते अता, शेवटी ती सोबत तितकीच नशिबी होती आपली..थोडा वेळ गेला मला..पण, सावरलो मी समजावलं स्वतःला आणि, जगलो हो पण शेवटची एक भेट कुठे तरी नक्कीच होईल या विश्वासाला ही आज पर्यंत जपलोच ग... तुझ्या समोर सोडलेली ती सिगारेट आज तुझ्या भेटीतच हातात आली... मरणा आधी तुला एकदा बघावं ही तळमळ सतत मनात होती.ती ही आज पुर्ण झाली.. राहिली उपेक्षा एकच ती शेवटची पण, ती अता मी मागु ही शकत नाही,नी तु देवू ही शकत नाही... हो पण नशिबी असेल तर ती ही होऊनच जाईल पुर्ण.." अस बोलतच होता की त्याने एक उंच असा दिर्घ श्वास भरला आणि आपले डोळे झाकले....

 " अरे शंतनु खुप भोगलय तु माझ्यामुळे, सांग काय इच्छा आहे तुझी..? आज सगळ्याच इच्छा तुझ्या पुर्ण करेन मी.. माझ्या चुकीचे प्रायश्चित म्हणून का होईना..."

                तन्वी बोलत राहिली पण शंतनु तीचे हे भाव ओळखण्या आणि ऐकण्या पलिकडे निघून गेला होता.. म्हणतात न खऱ्या प्रेमाच दुसरं नाव विरह, यातना च आहे..आयुष्यभर या विरहाच्या यातना भोगून शेवटी मात्र सोबत त्याच प्रेमाची त्याला लाभली होती.. आज जणू त्याच्या नशिबी त्याच्या सगळ्याच इच्छा पुर्तीचे वरदानच त्याला मिळाले होते....

तन्वी बोलतच राहिली. तीच्या मनातलं प्रेम इतक्या दिवसांनी व्यक्त करत राहिली.. शंतनु मात्र तीच्या मिठीत जाण्याची शेवटची इच्छा आपली पुर्ण करून या प्रेम भावनेतुन कायमचा मुक्त होऊन गेला...

                शेवटी उरली मात्र एक अधुरी सोबत जी कधीच पुर्ण नाही होऊ शकली... त्याला कवटाळून तन्वी मात्र आज धाय मोकलून रडली....!


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance